आता Amazon Prime वरही Live cricket streaming पाहायला मिळणार, भारतासह या देशांच्या सामन्यांचे प्रक्षेपण

| Updated on: Nov 10, 2020 | 8:16 PM

Amazon Prime Video ने आता त्यांचा लाईव्ह प्लॅटफॉर्म अजून मोठा केला आहे. अमेझॉनच्या व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मवर आता लाईव्ह क्रिकेट पाहता येणार आहे.

आता Amazon Prime वरही Live cricket streaming पाहायला मिळणार, भारतासह या देशांच्या सामन्यांचे प्रक्षेपण
Follow us on

मुंबई : अमेझॉन प्राईम व्हिडीओने (Amazon Prime Video) आता त्यांचा लाईव्ह प्लॅटफॉर्म अजून मोठा केला आहे. व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मवर आता लाईव्ह क्रिकेट (Live cricket streaming) पाहता येणार आहे. अमेझॉन प्राईमने मंगळवारी याबाबतची घोषणा केली आहे. अमेझॉन प्राईम व्हिडीओने न्यूझीलंड क्रिकेटसोबत भागिदारी केली आहे.

Amazon Prime ने पुढील सहा वर्षात न्यूझीलंडच्या संघाचे भारतात होणाऱ्या सर्व सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क खरेदी केले आहेत. लाईव्ह स्ट्रिमिंगसाठी एखाद्या देशाच्या क्रिकेट बोर्डासोबत भागिदारी करणारा अमेझॉन हा पहिलाच प्लॅटफॉर्म ठरला आहे. अमेझॉन आणि न्यूझीलंड क्रिकेट बोर्डामध्ये झालेल्या करारानुसार अमेझॉन प्राईमवर न्यूझीलंड पुरुष क्रिकेट संघाचे सर्व सामने लाईव्ह दाखवले जाणार आहेत.

मल्टी ईयर डीलमध्ये अमेझॉन प्राईम भारत आणि न्यूझीलंड दौऱ्यांतील सर्व सामन्यांचं लाईव्ह स्ट्रिमिंग करणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाऊ शकतो. लवकरच याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे.

अमेझॉन प्राईम व्हिडीओचे संचालक आणि कंट्री जनरल गौरव गांधी म्हणाले की, आम्ही न्यूझीलंड क्रिकेटसोबत काम करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहोत. न्यूझीलंड संघाचे जगभरात चाहते आहेत. न्यूझीलंड आणि भारत या दोन देशांमध्ये होणाऱ्या क्रिकेट मालिका पाहण्यात खूप मजा येईल. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डासोबत आम्ही ही भागिदारी करुन खूपच खूश आहोत. भारत आणि न्यूझीलंड संघात होणारे सामने लाईव्ह स्ट्रीम करण्यासाठी आम्ही खूप उत्सूक आहोत.

न्यूझीलंडच्या क्रिकेट सामन्यांसह अमेझॉन प्राईम गुरुवारपासून फुटबॉल, प्रिमियर लीग, एटीपी टूर इव्हेंट्स, डब्ल्यूटीए, यूएस ओपन (टेनिस), यूईएफए चॅम्पियन्स लीग आणि रग्बी सामने लाईव्ह स्ट्रीम करणार आहे.

संबंधित बातम्या

Diwali Sale : Realme 6 वर बंपर डिस्काऊंट, अवघ्या 9,999 रुपयांमध्ये खरेदी करा जबरदस्त फिचर्स असलेला स्मार्टफोन!

48MP कॅमेरा, 128 GB स्टोरेज आणि डुअल स्क्रीन असलेल्या ‘या’ स्मार्टफोनवर 5000 रुपयांचा डिस्काऊंट

Whatsapp वरुन पैसे ट्रान्सफर कसे कराल? जाणून घ्या नव्या फिचरची स्टेप बाय स्टेप माहिती

(Amazon prime Video gets into live cricket streaming; will stream India New Zealand matches)