Jioचा 84 दिवसांचा सर्वात स्वस्त प्लॅन, रिचार्ज करण्यापूर्वी जाणून घ्या किंमत

तुम्ही 500 पेक्षा कमी किमतीत 84 दिवसांची वैधता असलेला प्रीपेड प्लॅन शोधत आहात का? जर असेल तर आजच्या लेखात आपण रिलायन्स जिओच्या परवडणाऱ्या 84 दिवसांच्या प्लॅनबद्दल आणि कोणते फायदे मिळणार आहे ते जाणून घेऊयात.

Jioचा 84 दिवसांचा सर्वात स्वस्त प्लॅन, रिचार्ज करण्यापूर्वी जाणून घ्या किंमत
jio
| Edited By: | Updated on: Dec 23, 2025 | 4:48 PM

कमी किमतीत 84 दिवसांची वैधता हवी आहे का? पण तुम्हाला 500 रुपयांपेक्षा कमी किमतीत 84 दिवसांची वैधता असलेला प्लॅन सापडत नाहीये. तर काळजी करू नका. आज आम्ही तुमच्यासाठी एक असा प्लॅन शोधला आहे जो या किमतीत 84 दिवसांची वैधता देतो, तसेच कॉलिंग आणि एसएमएससह अनेक फायदे देतो. जर तुम्ही रिलायन्स जिओ प्रीपेड सिम वापरत असाल तर कमी किमतीत या प्लॅनचा फायदा घेता येणार आहे. तुम्हाला कोणता प्लॅन 500 रुपयांपेक्षा स्वस्त आहे आणि 84 दिवसांची वैधता देतो हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

जिओचा 448 रूपयांच्या प्लॅनची ​​माहिती

जिओच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 1000 एसएमएस मिळतात. ज्यांना कमी किंमत आणि 84 दिवसांची वैधता असलेला प्लॅन हवा असेल तर त्यांच्यासाठी हा प्लॅन उत्तम आहे.

येथे एक गोष्ट लक्षात ठेवावी की हा प्लॅन डेटा देत नाही, कारण हा फक्त व्हॉइस-ऑनली प्लॅन आहे. हा प्लॅन विशेषतः अशा लोकांसाठी डिझाइन केला आहे ज्यांना डेटाची नाही तर कॉलिंगची आवश्यकता आहे आणि 84 दिवसांची वैधता देते. या प्लॅनमध्ये काही अतिरिक्त फायदे देखील आहेत, जसे की जिओ टीव्ही आणि जिओ एआय क्लाउडचा मोफत प्रवेश तुम्हाला मिळणार आहे.

एअरटेलचा 449 प्लॅनची माहिती

एअरटेल कंपनीकडे 448 रुपयांचा प्लॅन नसून 449 रुपयांचा प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये 4 जीबी हाय-स्पीड डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस मेसेजेस मिळतात. या प्लॅनमध्ये गुगल वन (30 जीबी क्लाउड स्टोरेज), 28 दिवसांसाठी जिओ हॉटस्टार मोबाइल, अमर्यादित 5 जी डेटा आणि एअरटेल एक्सस्ट्रीम प्लेद्वारे 20 हून अधिक ओटीटी प्लॅटफॉर्मवर मोफत प्रवेश यांचा समावेश आहे. अ‍ॅपल म्युझिक देखील उपलब्ध आहे.

फरक: या दोन्ही प्लॅनच्या किमतीत फक्त 1 रुपयांचा फरक आहे. जर तुमच्याकडे दोन्ही कंपन्यांचे सिम कार्ड असतील तर तुम्हाला जास्त फायदे हवे आहेत की जास्त वैधता हे ठरवायचे आहे. जर तुम्हाला जास्त फायदे हवे असतील तर तुम्हाला एअरटेलचा प्लॅन आवडेल. तर जर तुम्हाला 84 दिवसांची वैधता हवी असेल तर तुम्हाला रिलायन्स जिओचा 448 रुपयांचा प्लॅन आवडेल.