‘ती’ माझी सर्वात मोठी चूक होती : बिल गेट्स

| Updated on: Jun 25, 2019 | 3:58 PM

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांच्या यशाच्या अनेक गोष्टी आपण ऐकल्या असतील. मात्र, प्रथमच त्यांनी त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक सांगितली आहे.

‘ती’ माझी सर्वात मोठी चूक होती : बिल गेट्स
Follow us on

मुंबई: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांच्या यशाच्या अनेक गोष्टी आपण ऐकल्या असतील. मात्र, प्रथमच त्यांनी त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक सांगितली आहे. गुगलला ‘अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम’ डेव्हलप करण्याची संधी देणं ही माझी सर्वात मोठी चूक असल्याची कबूली बिल गेट्स यांनी दिली.

बिल गेट्स म्हणाले, “मायक्रोसॉफ्ट आजही स्वतंत्र आणि मजबूत ओळख आहे. जर मला गुगलच्या अँड्रॉईडबाबतच्या नियोजनाचा सुरुवातीला अंदाज आला असता तर आज मायक्रोसॉफ्ट जगातील सर्वात मोठी कंपनी असती.” गेट्स ‘अर्ली स्टेज व्हेंचर कॅपिटल फर्म विलेज ग्लोबल’च्या एका कार्यक्रमात बोलत होते.

‘मोबाईल प्लॅटफॉर्ममध्ये जिंकणाराच बाजारावर राज्य करतो’

बिल गेट्स म्हणाले, “सॉफ्टवेअरच्या जगात मोबाईलच्या प्लॅटफॉर्ममध्ये जिंकणाराच बाजारावर राज्य करतो. त्यामुळेच गुगल अँड्रॉईडसाठी प्रयत्न करत असताना मला त्यांचा अंदाज न येणं आणि त्याप्रमाणे मी योग्य पाऊल न उचलणं ही माझी सर्वात मोठी चूक आहे. त्यामुळेच आज अँड्रॉईड जेथे पोहचले तेथे मायक्रोसॉफ्ट पोहचले नाही.”

‘अँड्रॉयड खरेदी न केल्याने अरबों रुपयांचे नुकसान’

टेक क्रंचच्या एका रिपोर्टनुसार गेट्स म्हणाले, “त्या काळात बाजारात अॅपलशिवाय फक्त एका ऑपरेटिंग सिस्टमला अवकाश होता. ही मोकळी जागा गूगल कोणताही वेळ जाऊ न जाता सहजपणे भरली. खरंतर ही जागा मायक्रोसॉफ्ट देखील भरु शकले असते. त्यावेळी अॅपलशिवाय केवळ एकाच ऑपरेटिंग सिस्टमला जागा होती आणि तिची किंमत 400 बिलियन डॉलर (जवळजवळ 27,76,500 कोटी रुपये) होती.