सोनं किती टक्के शुद्ध? ‘या’ अ‍ॅपवर कळणार माहिती, तक्रार करण्याचीदेखील व्यवस्था

| Updated on: Jan 02, 2021 | 10:51 PM

ग्राहकांना आता एका मोबाईल अ‍ॅपमार्फत सोनं किती शुद्ध आहे याची माहिती मिळणार आहे (BIS care app will tell how pure is gold).

सोनं किती टक्के शुद्ध? या अ‍ॅपवर कळणार माहिती, तक्रार करण्याचीदेखील व्यवस्था
सोन्याची किंमत त्याच्या कॅरेटनुसार असते आणि सोन्याची कॅरेट जितकी जास्त असेल तितके ते महाग असते. म्हणून, कॅरेट पाहून, त्याच्या मूल्याबद्दल माहिती ठेवा. वास्तविक, सोने खरेदी करताना आपल्याला 24 कॅरेट सोन्याच्या किंमती दिसतात आणि दागिन्यांसाठी 22 कॅरेटची खरेदी केली जाते, ज्याची किंमत फारच कमी आहे. यासाठी 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीत 24 ने विभाजन करा आणि 22 ने गुणाकार करा, यामुळे आपल्याला 22 कॅरेट सोन्याची किंमत मिळेल.
Follow us on

मुंबई : आपल्या देशात सोन्याला जास्त महत्त्व आहे. लग्न समारंभात सोन्याचे अभूषण परिधान केले जातात. विशेष करुन महिलांचं सोन्यावर प्रचंड प्रेम असतं. सोन्याचे दर आता गगणाला भिडले. मात्र, तरीदेखील सोन्याची बाजारपेठ तेजीत आहे. सोनं खरेदी केल्यानंतर ते सोनं किती शुद्ध आहे, 24 कॅरेट आहे का? असे प्रश्न अनेकांना पडतात. बऱ्याचदा सोन्यात वेगळ्या धातूंची भेसळ करुन ग्राहकांची फसवणूक देखील होते. मात्र, आता ग्राहकांना सोनं किती शुद्ध आहे याबाबत माहिती मिळणार आहे. कारण ग्राहकांना आता एका मोबाईल अ‍ॅपमार्फत सोनं किती शुद्ध आहे याची माहिती मिळणार आहे (BIS care app will tell how pure is gold).

केंद्रीय ग्राहक आणि अन्न मंत्रालयाने BIS-केअर मोबाईल अ‍ॅप लाँच केलं आहे. या अ‍ॅपद्वारे सोनं खरंच किती शुद्ध आहे, याबाबतची माहिती मिळणार आहे. त्यामुळे सोन्यात इतर धातूंच मिश्रण करुन लुबाडणाऱ्यांना चांगलाचा धडा मिळणार आहे. सोनं कितपत शुद्ध आहे, याची खरंच योग्य माहिती दिली तर या अ‍ॅपला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे (BIS care app will tell how pure is gold).

विशेष म्हणजे या अ‍ॅपद्वारे फक्त सोन्याची शुद्धता तपासता येणार नाही तर तक्रार करण्याची देखील सुविधा करण्यात आली आहे. या अ‍ॅपवर लायसन्स, रजिस्ट्रेशन आणि हॉलमार्क नंबरशी संबंधित तक्रार दाखल करता येऊ शकणार आहे.

सरकारने देशभरात गोल्ड हॉलमार्किंग अनिवार्य केलं आहे. 1 जुलै 2021 पासून हॉलमार्क शिवाय सोने किंवा दागिने विकल्यास बीआयएस कायद्याअंतर्गत संबंधित व्यापाऱ्याला एक लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. त्याचबरोबर एक वर्ष कारावासाची शिक्षा देखील भोगावी लागू शकते. दंड आणि कारावासाच्या शिक्षेबाबत कोर्ट निर्णय घेईल.

हेही वाचा : Gold-Silver Latest price: नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच सोने-चांदीच्या दरात घट, आजचे भाव…