Maharashtra News Live : महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना केलं अभिवादन
देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

LIVE NEWS & UPDATES
-
धाराशिव जिल्ह्यातील आधारभूत किंमत हमीभाव केंद्रे बारदाना नसल्याने पाच दिवसापासून बंद
धाराशिव जिल्ह्यातील आधारभूत किंमत हमीभाव केंद्रे बारदाना नसल्याने गेल्या पाच दिवसापासून बंद आहेत. जिल्ह्यात नाफेड आणि पणन मंडळाकडून 51 सोयाबीन हमीभाव केंद्रं सुरू करण्यात आली आहेत. पण 2 डिसेंबर पासून बारदान नसल्याने ही हमीभाव केंद्र ओस पडली आहेत. शेतकऱ्यांच्या सोयाबीनला हमीभाव मिळावा या उद्देशाने सुरू केलेले हमीभाव केंद्रे बारदान अभावी बंद आहेत. शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना कमी भावात सोयाबीन विकण्याची वेळ आल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतोय .
-
इंडिगो एअरलाइन्स विमान रद्द प्रकरणात सुप्रीम कोर्टात सुनावणीची मागणी
इंडिगो एअरलाइन्स विमान रद्द प्रकरणात सुप्रीम कोर्टात सुनावणीची मागणी करण्यात आली आहे. अडचणीच्या परिस्थिती सरकारकडे कोणते पर्याय आहेत, अशी विचारणा या याचिकेतून करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाकडून समन्स बाजवण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
-
-
शासनाचा थकीत दंड न भरल्यामुळे अंबडच्या तहसीलदारांकडून वाळू माफियांवर कारवाई, 30 लाखांचा दंड
जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यात अवैध वाळू वाहतूक प्रकरणी न्यायालयातून सुटलेली 2 वाहने तहसीलदार विजय चव्हाण यांच्या नेतृत्वात महसूल विभागाने ताब्यात घेत पुन्हा जप्त केली. वाळू माफियांवर मागच्या काही दिवसापासून कडक कारवाई केली जात आहे. 30 लाखांचा थकीत असलेला दंड न भरल्यामुळे कारवाईचा बडगा उगारण्यात आला.
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातील विषमता दूर केली – देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी चैत्यभूमीवर जाऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाज जागृत केला, समाजातील विषमता दूर केली, सर्वांना संधीची समानत दिला, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन. राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी चैत्यभूमीवर जाऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. पुण्याच्या शिरूर तालुक्यात बिबट्याचा रस्त्यावर वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे सावट आहे. भक्ष्याच्या शोधात बिबटे लोकवस्तीत येत आहेत त्यामुळे बिबट्याचा मुक्तसंचार दिसत असून नागरिक दहशतीखाली आहेत. जालना जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून तापमानात घट होत असल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. दोन दिवसांपासून जालना शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात थंडीचा जोर अधिकच वाढल्यामुळे ग्रामीण भागात जागोजागी शेकोट्या पेटवून नागरिक थंडीपासून बचाव करताना दिसत आहेत. यासह देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी वाचण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
Published On - Dec 06,2025 8:49 AM
