खिशाला परवडणारा नवा स्मार्टफोन बाजारात; 5000mAh बॅटरी, हटके कॅमेरा अन् बरंच काही

भारतात खिशाला परवडणारा नवा स्मार्टफोन बाजारात आला आहे. या मोबाईलमध्ये 5000mAh बॅटरी मिळते. त्याचबरोबर हटके कॅमेरा आणि इतर फिचर्सचा लाभ देखील मिळतो. या स्मार्टफोनविषयी जाणून घेऊयात.

खिशाला परवडणारा नवा स्मार्टफोन बाजारात; 5000mAh बॅटरी, हटके कॅमेरा अन् बरंच काही
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 29, 2026 | 11:05 AM

आयटेलने सिटी 300  फाइव्ह जी स्मार्टफोनसाठी दोन नवीन रंगांचे ऑप्शन समोर आणले आहेत. यात डार्क रुबी आणि मिस्ट बेज या हटके रंगांचा समावेश आहे. याधी हा स्मार्टफोन बोल्ड इंडिगो या रंगात उपलब्ध होता. आता या दोन नवीन रंगांमुळे स्मार्टफोनच्या डिझाइनला आकर्षक आणि प्रीमियम लूक मिळणार आहे. आता स्मार्टफोन निवडताना त्याचा रंग आणि डिझाइन यांनाही ग्राहक महत्त्व देताहेत. त्यामुळे आयटेलने हे नवीन रंग बाजारात आणले आहेत. सिटी ३०० फाईव्ह जी हा स्मार्टफोन आकर्षक डिझाइन, उत्तम परफॉर्मन्स आणि परवडणाऱ्या किमतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा अनुभव देतोय.

स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचांचा एचडी+ 120 हर्ट्झ पंच-होल डिस्प्ले देण्यात आलाय. तसेच 2.5डी ग्लास डिझाइनमुळे व्हिडिओ पाहताना चांगला अनुभव मिळतोय. त्याचबरोबर सोशल मीडिया आणि गेम खेळताना अधिक स्मूथ अनुभव मिळतोय. यामध्ये 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट देण्यात आलाय. केवळ 8.4 मिमी जाडीच्या स्लिम बॉडीमध्ये असलेला हा स्मार्टफोन टी8200 ऑक्टा-कोर 5जी प्रोसेसरसह येतोय. सिटी 300  फाईव्हजीचा 4जीबी रॅम  व्हेरिएंट अॅप्स वापरणे, व्हिडिओ कॉल करणे आणि व्हिडिओ स्ट्रीमिंग यांसारख्या दैनंदिन कामांसाठी स्मूथ अनुभव देण्यासाठी तयार करण्यात आलाय. यामध्ये अल्ट्रालिंक  फ्री कॉलिंगची सुविधाही देण्यात आलीये. यामुळे कमी बजेटमध्ये अधिक चांगली कनेक्टिव्हिटी मिळतंय.

Loading...

ग्राहकांच्या रोजच्या गरजा लक्षात घेऊन सिटी 300 5जी मध्ये 5000 एमएएच  क्षमतेची बॅटरी देण्यात आलीये. यामुळे ब्राउझिंग, व्हिडिओ पाहणे, कॉलिंग आणि मेसेजिंग यांसारखी कामे दिवसभर सहज करता येताहेत. या स्मार्टफोनमध्ये टाइप-सी चार्जिंगची सुविधा देण्यात आली आहे. तसेच 10 वॉट चार्जर देखील मिळतोय. फोटोग्राफीसाठी यामध्ये 13 एमपी ऑटोफोकस रिअर कॅमेरा देण्यात आलाय. तसेच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 8 एमपी फ्रंट कॅमेरा देण्यात आलाय. स्मार्टफोन हा 14,999 किंमतीत उपलब्ध होतोय. तसेच आयटेल सिटी 300  फाइव्ह जी आकर्षक डिझाइन, दैनंदिन वापरासाठी आवश्यक फीचर्स आणि परवडणारी किंमत देखील आहे. त्यामुळे नवीन स्मार्टफोन घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी चांगला पर्याय ठरू शकतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us