AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नीता अंबानींनी डान्स परफॉर्मन्ससाठी निवडला हटके पारंपरिक लुक, गोल्ड ज्वेलरी आणि राजेशाही अंदाजाने वेधले लक्ष

नीता अंबानी यांनी NMACC मधील नृत्य सादरीकरणादरम्यान आपल्या खास पारंपरिक लुकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. नारंगी रंगाचा साडी स्कर्ट, फ्युशिया गुलाबी ओढणी आणि गोल्ड ज्वेलरीमधील त्यांचा राजेशाही अंदाज चर्चेचा विषय ठरला. त्यांचा हा हटके लुक नेमका कसा होता, जाणून घेऊया.

नीता अंबानींनी डान्स परफॉर्मन्ससाठी निवडला हटके पारंपरिक लुक, गोल्ड ज्वेलरी आणि राजेशाही अंदाजाने वेधले लक्ष
| Edited By: | Updated on: Nov 29, 2026 | 10:56 AM
Share

नीता अंबानी यांना नृत्याची विशेष आवड असून त्या आपल्या कलेसोबतच फॅशन सेन्समुळेही नेहमी चर्चेत असतात. नुकतेच त्यांनी नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC) येथे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्य सादर केले. ‘द ग्रेट इंडियन म्युझिकल – सिव्हिलायझेशन टू नेशन’ या कार्यक्रमासाठी त्यांनी खास पारंपरिक पेहरावाची निवड केली होती. नारंगी रंगाचा साडी स्कर्ट, फ्युशिया पिंक ओढणी आणि सोन्याचे दागिने अशा लुकमध्ये त्यांचा राजेशाही अंदाज पाहायला मिळाला. त्यांच्या या पोशाखाची आणि दागिन्यांची सध्या चर्चा होत आहे. नारंगी आणि फ्युशिया पिंक रंगाचा हटके लुक या कार्यक्रमासाठी नीता अंबानी यांनी नारंगी आणि लालसर छटा असलेला साडी स्कर्ट परिधान केला होता. या पोशाखावर सोनेरी एम्ब्रॉयडरी करण्यात आली होती. स्कर्टच्या पुढील बाजूला असलेल्या प्लेट्स आणि खालच्या बाजूला असलेल्या रुंद बॉर्डरवरील सोनेरी नक्षीकामामुळे पोशाख अधिक आकर्षक दिसत होता. कमरेजवळील एम्ब्रॉयडरी आणि बुट्ट्यांचे डिझाइनही लक्षवेधी होते. या साडी स्कर्टसोबत त्यांनी फ्युशिया पिंक रंगाची ओढणी घेतली होती. ओढणीला प्लेट्स देऊन साडीच्या पदराप्रमाणे पुढील बाजूने ड्रेप केले होते. त्यासोबत मॅचिंग हाफ स्लीव्ह ब्लाउज परिधान केला होता. ब्लाउजच्या बाह्यांवरही सोनेरी नक्षीकाम होते. गोल्ड टेंपल ज्वेलरीने खुलला पारंपरिक अंदाज नीता अंबानी यांनी या पेहरावासोबत गोल्ड टेंपल ज्वेलरीची निवड केली होती. तीन पदरांचा नेकलेस, आकर्षक झुमके आणि मांगटिका यामुळे त्यांच्या लुकला पारंपरिक साज मिळाला होता. याशिवाय नारंगी रंगाच्या बांगड्यांनीही त्यांच्या पेहरावाला शोभा आणली. नृत्य सादरीकरण लक्षात घेऊन त्यांनी केस मागच्या बाजूला पिनच्या साहाय्याने व्यवस्थित सेट केले होते. कपाळावरील टिकलीमुळे त्यांचा लुक अधिक सुंदर दिसत होता. डान्स प्रॅक्टिससाठी मनीष मल्होत्रांचा खास घागरा नृत्याच्या सरावासाठीही नीता अंबानी यांनी खास पोशाख निवडला होता. प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी डिझाइन केलेला हाताने विणलेला घागरा त्यांनी परिधान केला होता. या घागऱ्यावर सोनेरी गोटा पट्टीचे काम करण्यात आले होते. त्यासोबत शिफॉन फॅब्रिकची ओढणी आणि पावडर पिंक रंगाची चुनरी मॅच केली होती. हाफ स्लीव्ह आणि झिरो नेकलाइन असलेल्या चोळी ब्लाउजमुळे हा पेहराव अधिक आकर्षक दिसत होता. या लुकसोबत त्यांनी कुंदन आणि झिरकॉनचे काम असलेले गुलाबी झुमके आणि मॅचिंग बांगड्या घातल्या होत्या. मधोमध भांग पाडून ठेवलेले केस, सॉफ्ट स्मोकी आय मेकअप आणि गुलाबी लिपस्टिकमुळे त्यांचा सरावादरम्यानचा लुकही उठून दिसत होता.

Follow Us
मोठी बातमी! समाजवादी पक्षाचा खासदारांना व्हिप, तीन विधेयकांविरोधात...
मोठी बातमी! समाजवादी पक्षाचा खासदारांना व्हिप, तीन विधेयकांविरोधात मतदानाचे आदेश
भिवंडीत प्रसिद्ध मॉलमध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या खजुरात अळ्या...
भिवंडीत प्रसिद्ध मॉलमध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या खजुरात अळ्या; ग्राहकांमध्ये संताप!
डिलिमिटेशन विधेयकाविरोधात काँग्रेसची मोठी तयारी! मल्लिकार्जुन खर्गें..
डिलिमिटेशन विधेयकाविरोधात काँग्रेसची मोठी तयारी! मल्लिकार्जुन खर्गें घेणार स्टॅलिन-पवारांची प्रत्यक्ष भेट
छत्रपती संभाजीनगरमध्ये FDA चा मोठा दणका! 12 हॉटेल्ससह ब्लिंकइट...
छत्रपती संभाजीनगरमध्ये FDA चा मोठा दणका! 12 हॉटेल्ससह ब्लिंकइट स्टोअर्सचे परवाने निलंबित
डिलिमिटेशन विधेयकावरून दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग; राजकीय पक्षांची
डिलिमिटेशन विधेयकावरून दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग; राजकीय पक्षांची आज महत्त्वाची बैठक!
एकनाथ शिंदेंनी जपली माणुसकी; विनोद कांबळींच्या कुटुंबाला मदतीचा हात!
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी जपली माणुसकी; विनोद कांबळींच्या कुटुंबाला मदतीचा हात!
'रेजिम चेंज'वरून फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा; संविधान आणि लोकशाहीबाबत
'रेजिम चेंज'वरून फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा; संविधान आणि लोकशाहीबाबत मोठं विधान!
NDA मध्ये यायचं असेल तर अधिकृत पत्र द्या; प्रफुल्ल पटेलांचा पवारांना..
NDA मध्ये यायचं असेल तर अधिकृत पत्र द्या; प्रफुल्ल पटेलांचा पवारांना सूचक संदेश!
सिंधुदुर्ग-मुंबई विमानात अचानक बिघाड! प्रवाशांना 2 वेळा उतरवलं, अखेर..
सिंधुदुर्ग-मुंबई विमानात अचानक बिघाड! प्रवाशांना 2 वेळा उतरवलं, अखेर... प्रवासाचा खोळंबा
सरकारी जमिनीवरील घरांना मिळणार कायदेशीर मालकी हक्क? शासनाचा निर्णय...
सरकारी जमिनीवरील घरांना मिळणार कायदेशीर मालकी हक्क? शासनाचा मोठा निर्णय, लाखो कुटुंबांना दिलासा