इन्व्हर्टर बॅटरीमध्ये पाणी कधी टाकावं? 90% लोकांना नाही माहिती योग्य वेळ

इन्व्हर्टर बॅटरीची निगा वेळेवर घेतली नाही, तर ती लवकर खराब होते. योग्य वेळी डिस्टिल्ड पाणी टाकणं, सुरक्षेचे उपाय पाळणं आणि नियमित तपासणी करणं ही बॅटरीच्या दीर्घायुष्यासाठी अत्यावश्यक बाब आहे.

इन्व्हर्टर बॅटरीमध्ये पाणी कधी टाकावं? 90% लोकांना नाही माहिती योग्य वेळ
Inverter Battery,
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 29, 2025 | 8:36 PM

उन्हाळा सुरू होताच विजेची सतत कटोती सामान्य बाब होते. अशा वेळी घरातील इन्व्हर्टर हा अत्यावश्यक भाग बनतो. मात्र, इन्व्हर्टर बॅटरीची योग्य निगा न घेतल्यास ती लवकरच निकामी होऊ शकते. अनेकांना याचा अंदाजही लागत नाही की बॅटरीमध्ये पाणी कधी आणि कसं टाकावं, ज्याचा थेट परिणाम पावर बॅकअपवर होतो.

डिस्टिल्ड पाणी का असतं आवश्यक?

इन्व्हर्टर बॅटरीमध्ये वापरलं जाणारं पाणी हे सामान्य पाणी नसतं, तर ते डिस्टिल्ड म्हणजेच आसुत (कमी खनिज असलेलं) पाणी असतं. हे पाणी बॅटरीतील केमिकल रिऍक्शनसाठी आवश्यक असतं. जेव्हा हे पाणी कमी होतं, तेव्हा बॅटरी “ड्राय” व्हायला लागते आणि तिची चार्जिंग क्षमता कमी होते. परिणामी, बॅटरीचा परफॉर्मन्स घसरतो आणि शेवटी ती खराब होते.

पाणी कधी बदलावं?

जर तुमचा इन्व्हर्टर फारसा वापरात नसेल, तर दर तीन महिन्यांनी पाण्याची पातळी तपासून त्यात नवीन डिस्टिल्ड पाणी टाकावं. मात्र, ज्या घरांमध्ये लोडशेडिंग जास्त होते आणि इन्व्हर्टर वारंवार वापरला जातो, तिथे दर १ ते १.५ महिन्यांनी बॅटरी तपासणं गरजेचं आहे.

सुरक्षेच्या उपाययोजना

बॅटरीमध्ये पाणी टाकताना किंवा ती तपासताना हमीने हातमोजे (gloves) आणि सुरक्षात्मक चष्मा (goggles) वापरणं आवश्यक आहे. बॅटरीमध्ये अ‍ॅसिड असतं आणि थोडासा निष्काळजीपणा गंभीर जळजळीत जखमा किंवा अपघात घडवू शकतो. त्यामुळं सुरक्षा हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे.

बॅटरीमध्ये पाणी नाही टाकलं तर काय होत ?

जर बॅटरीमध्ये वेळोवेळी पाणी न टाकलं गेलं, तर ती गरम होऊ लागते आणि तिची लाइफ कमी होते. बॅकअप क्षमतेवर याचा थेट परिणाम होतो. अशा परिस्थितीत बॅटरी लवकर निकामी होण्याची शक्यता असते आणि नवीन बॅटरी घेण्याचा खर्च वाढतो.

चुकीचं पाणी टाकल्यास काय?

काही लोक चुकीनं नळाचं पाणी किंवा RO पाणी बॅटरीत टाकतात, पण त्यात असलेल्या खनिजांमुळे बॅटरीतील प्लेट्सवर रसायनं साचतात आणि त्यामुळे बॅटरीमध्ये शॉर्टसर्किट किंवा क्रिस्टलायझेशनसारख्या समस्या होतात. त्यामुळे नेहमी फक्त डिस्टिल्ड पाणीच वापरावं.

इन्व्हर्टर बॅटरीची निगा वेळेवर घेतली नाही, तर ती लवकर खराब होते. योग्य वेळी डिस्टिल्ड पाणी टाकणं, सुरक्षेचे उपाय पाळणं आणि नियमित तपासणी करणं ही बॅटरीच्या दीर्घायुष्यासाठी अत्यावश्यक बाब आहे.