Xiaomi : चीनी मोबाईल फोन कंपनी शाओमी इंडिया आणि तीन बँकांना ईडीची नोटीस, फेमा उल्लंघन केल्याचा ठपका

| Updated on: Jun 09, 2023 | 11:15 PM

चीनी मोबाईल कंपनी शाओमी इंडिया आणि तीन बँका ईडीच्या रडारवर आल्या आहेत. ईडीने फेमा कलम 10 (4) आणि 10 (5) चे उल्लंघन केल्याप्रकरणी सीआयटीआय बँक, एचएसबीसी आणि डच बँक एजीला नोटीस पाठवली आहे.

Xiaomi : चीनी मोबाईल फोन कंपनी शाओमी इंडिया आणि तीन बँकांना ईडीची नोटीस, फेमा उल्लंघन केल्याचा ठपका
चीनी मोबाईल कंपनी शाओमी आणि तीन बँका ईडीच्या रडारवर, कोट्यवधींची हेराफेरी केल्याचा संशय
Follow us on

मुंबई : ईडीने 551 कोटी रुपयांच्या फेमा उल्लंघन प्रकरणी शाओमी टेक्नोलॉजी इंडिया, शाओमीचे वरिष्ठ अधिकारी आणि तीन बँकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यात सीएफओ समीर राव आणि माजी एमडी मनु जैन यांचाही समावेश आहे. शाओमी इंडियाने भारतात वर्ष 2014 पासून काम करण्यास सुरुवात केली. ही कंपनी मोबाईलचं उत्पादन करणाऱ्या चीनी कंपनीची उपकंपनी आहे. शाओमी इंडियाने 2015 पासून पॅरेंट कंपनीला पैसे पाठवण्यास सुरुवात केली. कंपनीने एकूण 5551.27 कोटी रुपये पाठवल्याचं तपास यंत्रणांनी सांगितलं आहे.

ईडीच्या म्हणण्यानुसार, सीआयटीआय बँक, एचएसबीसी बँक आणि डच बँक एजीला फेमाच्या कलम 10 (4) आणि 10 (5) चं उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस पाठवली आहे. परदेशात कंपनीकडून रॉयल्टीच्या रुपाने पैसे पाठवण्याची परवानगी देण्यात आली आहे आणि तसेच तडतोड केल्याचं प्राथमिक तपासात दिसून आलं आहे.

गेल्यावर्षी फेमाने चीन आधारित शाओमी ग्रुपच्या भारतीय उपकंपनीने 5551.27 कोटी रुपये जप्त केले होते. हे पैसा चिनी स्मार्टफोन कंपनीच्या बँक खात्यात होते आणि बेकायदेशीर व्यवहाराप्रकरणी फेब्रुवारीत जप्त करण्यात आले होते.

फेमा प्रकरणात दोषी आढळल्यास काय होतं?

फेमा प्रकरणाची तपासणी पूर्ण झाल्यानंतर कारणे दाखवा नोटीस पाठवली जाते. जेव्हा या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागतो तेव्हा आरोपींना उल्लंघन केलेल्या रकमेच्या तीन पट दंड भरावा लागू शकतो.