एकाच वेळी 46 राज्यांचा फेसबुकविरोधात खटला, केस हरल्यास Instagram आणि Whatsapp विकावं लागेल

| Updated on: Dec 10, 2020 | 5:15 PM

फेसबुकविरोधात अमेरिकन फेडरल ट्रेड कमिशन आणि अमेरिकेतील जवळपास प्रत्येक राज्याने खटला दाखल केला आहे.

एकाच वेळी 46 राज्यांचा फेसबुकविरोधात खटला, केस हरल्यास Instagram आणि Whatsapp विकावं लागेल
Follow us on

वॉशिंग्टन : फेसबुकवर (Facebook) एक मोठं संकट घोंगावतंय. कारण फेसबुकविरोधात अमेरिकन फेडरल ट्रेड कमिशन (American Federal Trade Commission) आणि अमेरिकेतील जवळपास प्रत्येक राज्याने खटला दाखल केला आहे. फेसबुक कंपनी या खटल्यात पराभूत झाली तर कंपनीला त्यांच्या मालकीचे Whatsapp आणि Instagram विकावं लागेल. अमेरिकन राज्यांनी फेसबुक या सोशल मीडिया कंपनीवर आरोप केला आहे की, नव्या आणि तरुण स्पर्धकांना मार्केटमधील शर्यतीपासून दूर ठेवण्यासाठी फेसबुकने ‘बाय अ‍ॅन्ड ब्यूरी’ (Buy and Bury) धोरण वापरले आहे. (Facebook faces US lawsuits that could force sale of instagram, whatsapp)

या अशा प्रकारच्या खटल्यांना सामोरी जाणारी फेसबुक ही दुसरी कंपनी ठरली आहे, यापूर्वी अमेरिकेत गुगलला अशा प्रकारच्या खटल्याला सामोरे जावे लागले होते. यापूर्वी अमेरिकेच्या न्याय विभागाने ऑक्टोबर महिन्यात गुगलविरोधात दावा दाखल केला होता. 1 ट्रिलियन डॉलर इतकी व्हॅल्यू असलेल्या गुगलवर लहान प्रतिस्पर्ध्यांना मार्केटमधून हटवण्यासाठी पैसा आणि बळाचा (Money and Power) वापर केल्याचा आरोप करण्यात आला होता.

फेसबुकने 2012 मध्ये 1 बिलियन डॉलर्स देऊन इंस्टाग्राम खरेदी केलं आहे. तर 2014 मध्ये फेसबुकने 19 बिलियन डॉलर्समध्ये व्हॉट्सअॅप खरेदी केलं होतं. फेसबुकने जेव्हा इंस्टाग्राम खरेदी केलं होतं तेव्हा आजच्या तुलनेत इंस्टाग्रामवर केवळ दोन टक्के युजर्स होते. तसेच कंपनीकडे केवळ 13 कर्मचारी होते. आज इंस्टाग्रामचे मासिक एक अब्ज सक्रीय युजर्स आहेत. तर संपूर्ण जगभरात व्हॉट्सअॅपचे मासिक दोन अब्ज सक्रीय युजर्स आहेत. त्यापैकी 40 कोटी युजर्स एकट्या भारतात आहेत.

अमेरिकन सरकारने फेसबुकविरोधात खटला दाखल करताच सोशल नेटवर्किंग कंपनी फेसबुकने त्वरित याबाबत त्यांचं म्हणणं मांडलं आहे. फेसबुकचे उपाध्यक्ष आणि जनरल काउन्सिल जेनिफर न्यूस्टेड यांनी बुधवारी सांगितले की, कंपनी न्यायालयात खटला लढण्यास तयार आहे, आम्ही त्या दिवसाची वाट पाहतोय. आम्ही न्यायालयात पूर्ण आत्मविश्वासाने पुरावे सादर करणार आहोत, आम्ही इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपसोबत आहोत. आम्ही या दोन्ही कंपन्यांना अधिक मोठं केलं आहे, तसेच योग्यतेच्या आधारावर आम्ही मार्केटमध्ये टिकून आहोत.

फेसबुकने यावेळी स्पष्ट केले की, इंस्टाग्राम जेव्हापासून फेसबुकचा एक भाग बनलं आहे, तेव्हापासून या अॅपचा अधिक विकास झाला आहे. कंपनीने कित्येक पटींनी नवे युजर्स मिळवले आहेत. आमच्या एकत्र येण्याचे ग्राहकांचा फायदाच झाला आहे. तसेच आमच्यामुळे इंस्टाग्राम अधिकच विश्वसनिय बनलं आहे. तसेच कंपनीसमोरील अनेक अडथळे आपोआप दूर झाले आहेत. मात्र आम्ही पुढे जात असताना इतर स्टार्टअप पटरीवरुन उतरले.

फेसबुकने म्हटले आहे की, इंस्टाग्रामप्रमाणे व्हॉट्सअॅप फेसबुकचा भाग झाल्यापासून युजर्सना त्याचा फायदाच झाला आहे. जगभरातील युजर्सना आम्ही एसएमएसऐवजी एक नवा आणि मोठा प्लॅटफॉर्म दिला आहे. मोबाईल ऑपरेटर कंपन्या एसएमएसच्या बदल्यात मोठ्या प्रमाणात शुल्क आकारत होत्या. परंतु व्हॉट्सअॅपने त्यावर लगाम बसवला.

संबंधित बातम्या

फेसबुकवरची ओळख पडली महागात; व्यापाऱ्याला 30 लाखाला गंडा, दापोली पोलिसात तक्रार

Instagram अकाउंट Facebook पासून वेगळं करण्यासाठी ‘या’ स्टेप्स फॉलो करा

(Facebook faces US lawsuits that could force sale of instagram, whatsapp)