Facebook Pay लाँच, आता मेसेंजर, WhatsApp आणि इन्स्टाग्रामने पेमेंट करता येणार

| Updated on: Nov 13, 2019 | 9:05 PM

फेसबुक कंपनीने फेसबुक, व्हॉट्सअॅप, मेसेंजर आणि इंस्टाग्राम या अॅप्लिकेशन्सवर पेमेंट सर्व्हिस ‘फेसबुक पे’ लाँच केलं आहे

Facebook Pay लाँच, आता मेसेंजर, WhatsApp आणि इन्स्टाग्रामने पेमेंट करता येणार
Follow us on

मुंबई : फेसबुक कंपनीने फेसबुक, व्हॉट्सअॅप, मेसेंजर आणि इन्स्टाग्राम या अॅप्लिकेशन्सवर पेमेंट सर्व्हिस ‘फेसबुक पे’ लाँच केलं आहे (Facebook Pay Launch). या आठवड्यात अमेरिकेत ही सुविधा सुरु करण्यात येणार आहे. यामध्ये फंडरेजिंग, इन-गेम खरेदी, कार्यक्रमांची तिकिटं, मेसेंजरवर लोकांचं एकमेकांशी पैशाची देवाणघेवाण या सुविधा सुरु करण्यात आल्या आहेत (Facebook Pay Launch).

फेसबुक मार्केट प्लेसवर पेज आणि व्यवसायांवर खरेदीलाही सुरुवात होईल. येत्या काळात ‘फेसबुक-पे’ला इतर जागी तसेच, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपवर सुरु करण्याची आमची योजना आहे, अशी माहिती फेसबुकमध्ये मार्केटप्लेस आणि कॉमर्स विंगचे वाईस प्रेसीडंट देबोराह लियू यांनी दिली.

‘फेसबुक पे’ विद्यमान आर्थिक संरचना आणि भागीदारीवर तयार केले गेले आहे आणि कंपनीच्या डिजीटल चलन लिब्रा नेटवर्कवर चालणार्‍या कॅलिब्रेट वॉलेटपेक्षा वेगळे आहे. फेसबुक आणि मेसेंजरवर काहीच स्टेप्समध्ये ‘फेसबुक-पे’चा वापर करता येणार आहे, असंही कंपनीने सांगितलं.

‘फेसबुक पे’चा वापर करण्यासाठी पहिल्यांदा फेसबुक अॅप किंवा वेबसाइटवर लॉग ऑन करा. त्यानंतर सेटिंग्जमध्ये जा. ‘फेसबुक पे’ जाऊन पेमेंट मेथडशी जोडा. त्यानंतर तुम्ही कधीही पेमेंट करण्यासाठी ‘फेसबुक पे’ (Facebook Pay) चा वापर करु शकता. तसेच, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामवर ‘फेसबुक-पे’ सुरु झाल्यानंतर तुम्ही त्यावरही ही सेटिंग करु शकता.