अवघ्या 45 मिनिटात किराणा घरपोच, Flipkart ची क्विक डिलीवरी सर्व्हिस सुरु

| Updated on: Feb 19, 2022 | 1:37 PM

ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी फ्लिपकार्ट (Flipkart) आता 'फ्लिपकार्ट क्विक डिलिव्हरी सर्व्हिस'द्वारे अवघ्या 45 मिनिटांत किराणा सामान वितरित करेल. ग्राहकांपर्यंत किराणा सामान जलद पोहोचवण्यासाठी क्विक डिलिव्हरी सर्व्हिसद्वारे (Quick Delivery Service) किराणा सामानाची डिलिव्हरी 90 मिनिटांवरून 45 मिनिटांपर्यंत कमी केली गेली आहे.

अवघ्या 45 मिनिटात किराणा घरपोच, Flipkart ची क्विक डिलीवरी सर्व्हिस सुरु
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

मुंबई : ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी फ्लिपकार्ट (Flipkart) आता ‘फ्लिपकार्ट क्विक डिलिव्हरी सर्व्हिस’द्वारे अवघ्या 45 मिनिटांत किराणा सामान वितरित करेल. ग्राहकांपर्यंत किराणा सामान जलद पोहोचवण्यासाठी क्विक डिलिव्हरी सर्व्हिसद्वारे (Quick Delivery Service) किराणा सामानाची डिलिव्हरी 90 मिनिटांवरून 45 मिनिटांपर्यंत कमी केली गेली आहे. ही सेवा सध्या बंगळुरूमध्ये उपलब्ध आहे. पुढील महिन्यापर्यंत ते आणखी शहरांमध्ये उपलब्ध होईल. फ्लिपकार्टचा हा निर्णय अशा वेळी आला आहे जेव्हा Blinkit, झेप्टो, स्विगी इंस्टामार्ट (Swiggy Instamart) आणि डंझो सारख्या ई-कॉमर्स कंपन्या केवळ 15-20 मिनिटांत ग्राहकांपर्यंत किराणा सामान पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. फ्लिपकार्टचे म्हणणे आहे की 10-20 मिनिटांत डोअर डिलिव्हरी हे परिपूर्ण मॉडेल नाही. म्हणूनच क्विक सर्व्हिसने डिलिव्हरीची वेळ 45 मिनिटांवर निश्चित केली आहे.

फ्लिपकार्टचे सीईओ कल्याण कृष्णमूर्ती म्हणाले की, त्यांच्या ग्राहकांना दर्जेदार सेवा देणे हे त्यांचे लक्ष्य आहे जेणेकरून स्थिर व्यवसायाला वाव मिळेल. तथापि, कंपनीने 45 मिनिटे आणि 90 मिनिटांची डिलीवरी सर्विस देखील आणली आहे. 90 मिनिटांची डिलिव्हरी सेवा सध्या 14 शहरांमध्ये उपलब्ध आहे. 2022 च्या अखेरीस, Flipkart ही सेवा 200 शहरांमध्ये विस्तारित करण्याची योजना आखत आहे.

कृष्णमूर्ती म्हणाले, “मला वाटत नाही (15-20 मिनिटांची डिलिव्हरी) हे योग्य दीर्घकालीन ग्राहक मॉडेल आहे. आम्ही चांगल्या किंमती आणि निवडीसह 30-45 मिनिटांत चांगली किंमत आणि निवडीसह अधिक टिकाऊ व्यवसायावर लक्ष केंद्रित करू. ग्राहकाची गरज जबरदस्तीने पूर्ण करण्याऐवजी, आम्ही सोयीस्कर व्यवसायाकडे पाहतो.”

फ्रूट डोर डिलीव्हरी सर्विस वाढवण्याचा प्रयत्न

फ्रेश व्हेजिटेबल ही सर्व्हिस सध्या फक्त हैदराबाद आणि बंगळुरूमध्ये उपलब्ध आहे, लवकरच अधिक शहरांमध्ये फ्रूट डोर डिलीव्हरी सर्विस विस्तारित करण्याची कंपनी योजना आखत आहे.

कंपनीने गेल्या वर्षी फ्लिपकार्ट क्विक लाँच केले होते, ज्या अंतर्गत किराणा, ताजी उत्पादने, डेअरी, मांस, मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, स्टेशनरी वस्तू आणि घरगुती वस्तू यांसारख्या कॅटेगरीमध्ये ग्राहकांसाठी 2000 हून अधिक उत्पादने उपलब्ध होती. ग्राहक त्यांची उत्पादने निवडू शकतात आणि पुढील 90 मिनिटे किंवा 2 तासांसाठी डिलिव्हरी स्लॉट बुक करू शकतात. त्यांना सकाळी 6 ते मध्यरात्री दरम्यान मालाची डिलिव्हरी मिळेल. यासाठी मिनिमम डिलीवरी चार्ज (किमान वितरण शुल्क) 29 रुपये निश्चित करण्यात आले होते.

इतर बातम्या

ओप्पोची दमदार एंट्री ! पॉवरफुल प्रोसेसर असलेल्या एक्स 5 फोनची नवी सीरीज, असे आहे फिचर्स…

घरबसल्या विका जुने स्मार्टफोन… जाणून घ्या फ्लिपकार्टचा नवीन प्रोग्राम

काय सांगता… चक्क या ब्रँडेड कंपनीच्या स्मार्टवॉच फक्त इतक्या रूपयांमध्ये मिळत आहेत? जाणून घ्या आणि लगेचच बूक करा!