स्मार्टफोन युजर्सना दणका, डेटा आणि कॉलिंगसाठी 1 एप्रिलपासून जास्त पैसे मोजावे लागणार?

| Updated on: Feb 17, 2021 | 6:56 PM

टेलिकॉम कंपन्यांनी ग्राहकांना जोरदार धक्का देण्याची योजना आखली आहे. (smartphone users have to pay more for data and calls)

स्मार्टफोन युजर्सना दणका, डेटा आणि कॉलिंगसाठी 1 एप्रिलपासून जास्त पैसे मोजावे लागणार?
Follow us on

नवी दिल्ली : टेलिकॉम कंपन्यांनी ग्राहकांना जोरदार धक्का देण्याची योजना आखली आहे. 1 एप्रिलपासून आता स्मार्टफोन वापरकर्त्यांना (युजर्सना) डेटा आणि कॉलसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. इन्व्हेस्टमेंट इन्फॉर्मेशन अँड क्रेडिट रेटिंग एजन्सी म्हणजेच ICRA ने एका अहवालात म्हटले आहे की, टेलिकॉम कंपन्या त्यांचा महसूल वाढविण्यासाठी आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 1 एप्रिलपासून पुन्हा एकदा शुल्क (टॅरिफ) वाढवू शकतात. (From 1st of april smartphone users have to pay more for data and calls)

1 एप्रिलपासून आपल्या खिशाला कात्री बसणार आहे की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. परंतु ही बाब येत्या काळात स्पष्ट होईल. कोरोनाच्या प्रभावामुळे दूरसंचार कंपन्यांवर फारसा परिणाम झालेला नाही. उलट प्रति ग्राहक सरासरी महसूल सुधारला आहे. परंतु कंपन्यांच्या वाढत्या खर्चाची भरपाई करण्यासाठी दूरसंचार कंपन्यांनी शुल्कवाढ कररण्याचा निर्णय घेतला आहे.

लॉकडाऊनमध्ये लोकांनी इंटरनेटचा अधिक वापर केला

कोरोनामुळे देशभरात गेल्या वर्षी लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. कोट्यवधी लोक घरात बसून होते, तर काहींचं वर्क फ्रॉम होम सुरु होतं. विद्यार्थ्यांचा अभ्यासही ऑनलाईन सुरु होता. अशा परिस्थितीत देशभरात इंटरनेटचा वापर अनेक पटींनी वाढला आहे. त्यातही प्रामुख्याने लॉकडाऊन काळात मोठ्या प्रमाणात लोकांनी इंटरनेट डेटा वापरला. आयसीआरए म्हणते की टॅरिफ दरातील वाढ आणि ग्राहकांनी 2 जी वरून 4 जी मध्ये अपग्रेडेशन केल्याने प्रत्येक ग्राहकाकडून कंपनीला मिळणाऱ्या सरासरी महसुलात वाढ झाली आहे. परिणामी कंपनीचा एकूण महसूल वाढू शकतो.

1.69 लाख कोटी रुपयांचा महसूल थकीत

टेलिकॉम कंपन्यांवरील एकूण थकीत महसूल 1.69 लाख कोटी रुपये इतका आहे. दरम्यान, केवळ 15 दूरसंचार कंपन्यांनी केवळ 3054 कोटी रुपये दिले आहेत. एअरटेल 25,976 कोटी, व्होडाफोन-आयडियावर 50,399 कोटी आणि उर्वरित कंपन्यांकडून इतर पैसे असा मिळून 1.69 लाख कोटी रुपयांचा महसूल थकीत आहे.

हे ही वाचा 

भारतात आता मेड इन इंडिया Appsचा बोलबाला, चिनी कंपन्यांची सद्दी संपली

आता परवानगीशिवाय Facebook Profile पाहता येणार नाही, फेसबुकचं नवं फीचर

देसी ट्विटर Koo App मधून चिनी गुंतवणूकदाराचा काढता पाय

Twitter update | ट्विटरचे नवे फिचर लॉंच, पाठवता येणार व्हाईस मेसेज

(From 1st of april smartphone users have to pay more for data and calls)