Airtel Family Plan | एकाने रिचार्ज करा, 8 जणांना कॉलिंग आणि डेटा मिळणार

जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एयरटेल (Airtel) कंपनी सातत्याने नवनव्या ऑफर्स सादर करत आहे.

Airtel Family Plan | एकाने रिचार्ज करा, 8 जणांना कॉलिंग आणि डेटा मिळणार
एअरटेलचे शानदार रिचार्ज प्लान, केवळ 300 रुपयात हाय स्पीड डेटासह विमा कवच

मुंबई : जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एयरटेल (Airtel) कंपनी सातत्याने नवनव्या ऑफर्स सादर करत आहे. कंपनीने त्यांच्या ग्राहकांसाठी आता अजून एक जबरदस्त ऑफर सादर केली आहे. कंपनीने एक पोस्ट पेड प्लॅन सादर केला आहे, ज्याचा वापर अनेक युजर्स एकाच वेळी करु शकतील. सोबतच कंपनी प्रीपेड आणि पोस्ट पेड ग्राहकांसाठी युट्यूब प्रिमियम आणि डिज्नी+हॉटस्टार व्हीआयपीचं मोफत सब्सक्रिप्शन ऑफर देत आहे. (Airtel family plan 8 people can get the benefit of calling and data in single recharge plan)

कंपनीने 399 रुपयांपासून ते 1599 रुपयांपर्यंतचे एकूण 5 पोस्ट पेड प्लॅन्स सादर केले आहेत. कंपनीच्या पोस्ट पेड प्लॅन्सच्या अटींनुसार एयरटेल युजर सिंगल पोस्टपेड नंबरसह 8 अॅड-ऑन कनेक्शन घेऊ शकतो. एयरटेलच्या इनफिनिटी फॅमिली पोस्टपेड प्लॅन्सच्या किंमतीबाबत दिलेल्या माहितीनुसार यामध्ये 749 रुपये आणि 999 रुपयांच्या प्लॅन्सचा समावेश आहे. सोबत कंपनीने स्टँडर्ड 399 रुपये, 499 रुपये आणि 1,599 रुपयांचे प्लॅन्सही सादर केले आहेत. सुरुवातीच्या दोन प्लॅन्ससोबत तुम्ही फ्री फॅमिली अॅड-ऑन कनेक्शन्स बेनिफिट मिळवू शकता आणि याद्वारे पैसे वाचवू शकतात.

अपडेटेड टर्म्स अँड कंडीशन्सनुसार 749 रुपये आणि 999 रुपयांचे प्लॅन घेतल्यास युजर्स त्यांच्या कनेक्शनसह 8 अॅड-ऑन नंबर्स जोडू शकतात. 749 रुपयांच्या फॅमिली पोस्टपेड प्लॅनमध्ये तुम्हाला दोन फ्री अॅड-ऑन कनेक्शन्स मिळतील. ज्यामध्ये एक रेग्युलर (वॉइस+डेटा) आणि दुसरं केवळ डेटा ओन्ली कनेक्शन असेल. 999 रुपयांच्या फॅमिली पोस्ट पेड प्लॅनसोबत ग्राहकांना चार फ्री अॅड-ऑन नंबर जोडता येतील. यापैकी 3 रेग्युलर (वॉइस+डेटा) आणि एक डेटा ओन्ली कनेक्शन असेल. या डेटा अॅड ऑन्सशिवाय युजर्सना रेग्युलर अॅड ऑनसाठी 249 रुपये आणि केवळ डेटा अॅड ऑनसाठी 99 रुपये द्यावे लागतील. या प्लॅन्समध्ये तुम्ही जास्तीत जास्त 8 युजर्सना जोडू शकता.

749 रुपयांच्या फॅमिली प्लॅनमध्ये तुम्हाला 125 जीबी डेटा मिळेल आणि त्यामध्ये 200 जीबीपर्यंत डेटा रोलओव्हर फंक्शनही मिळेल. तर 999 रुपयांच्या प्लॅनमध्ये 150 जीबीपर्यंत डेटा मिळेल.

730 जीबी डेटासह Airtel चा प्रीपेड प्लॅन

एयरटेल (Airtel ) कंपनीने त्यांच्या प्रीपेड युजर्ससाठी खास प्लॅन सादर केला आहे. जर तुम्ही लाँग टर्म डेटा बेनिफिट प्लॅन शोध असाल तर एअरटेल कपनी तुम्हाला असा प्लॅन देत आहे. एअरटेलच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला 730 जीबी हाय-स्पीड डेटा ऑफर केला आहे. या प्लॅनची वैधता 365 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 2 जीबी डेटा दिला जाईल. दैनिक डेटा संपला तर युजर्स अॅड-ऑन पॅकचा वापर करु शकतात.

सोबतच या प्लॅनमध्ये युजर्सना वर्षभर दररोज 100 एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे. या प्लॅनची किंमत 2,498 रुपये इतकी आहे. या प्लॅनसोबत कंपनीने एक्स्ट्रा बेनिफिट ऑफरही दिल्या आहेत. त्यामध्ये एयरटेल एक्स्ट्रीम प्रीमियम, मोबाईल एडिशन फ्री ट्रायल, फ्री हॅलो ट्युन, एयरटेल एक्स्ट्रीम अॅपमध्ये लाईव्ह टीव्ही अॅक्सेस, फ्री ऑनलाईन कोर्स आणि विंक म्युझिक सब्सक्रिप्शनचा समावेश आहे.

हेही वाचा

आता केवळ 2 मिनिटात मिळणार हेल्थ पॉलिसी, कोरोनापासून कँसरपर्यंत होणार इलाज

आता परवानगीशिवाय Facebook Profile पाहता येणार नाही, फेसबुकचं नवं फीचर

(Airtel family plan 8 people can get the benefit of calling and data in single recharge plan)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI