Airtel च्या ‘या’ प्रीपेड प्लॅनवर तब्बल 730 जीबी डेटा, वर्षभर अनलिमिटेड कॉलिंग आणि एक्स्ट्रा बेनिफिट्स

एयरटेल (Airtel) कंपनीने त्यांच्या प्रीपेड युजर्ससाठी खास प्लॅन सादर केला आहे. (Airtel launches new Prepaid Plan)

Airtel च्या 'या' प्रीपेड प्लॅनवर तब्बल 730 जीबी डेटा, वर्षभर अनलिमिटेड कॉलिंग आणि एक्स्ट्रा बेनिफिट्स
Follow us
| Updated on: Feb 10, 2021 | 12:58 PM

मुंबई : एयरटेल (Airtel ) कंपनीने त्यांच्या प्रीपेड युजर्ससाठी खास प्लॅन सादर केला आहे. जर तुम्ही लाँग टर्म डेटा बेनिफिट प्लॅन शोध असाल तर एअरटेल कपनी तुम्हाला असा प्लॅन देत आहे. एअरटेलच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला 730 जीबी हाय-स्पीड डेटा ऑफर केला आहे. या प्लॅनची वैधता 365 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 2 जीबी डेटा दिला जाईल. दैनिक डेटा संपला तर युजर्स अॅड-ऑन पॅकचा वापर करु शकतात. (Airtel Prepaid Plan of rs 2399 get 730 GB data unlimited calling for a year)

सोबतच या प्लॅनमध्ये युजर्सना वर्षभर दररोज 100 एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे. या प्लॅनची किंमत 2,498 रुपये इतकी आहे. या प्लॅनसोबत कंपनीने एक्स्ट्रा बेनिफिट ऑफरही दिल्या आहेत. त्यामध्ये एयरटेल एक्स्ट्रीम प्रीमियम, मोबाईल एडिशन फ्री ट्रायल, फ्री हॅलो ट्युन, एयरटेल एक्स्ट्रीम अॅपमध्ये लाईव्ह टीव्ही अॅक्सेस, फ्री ऑनलाईन कोर्स आणि विंक म्युझिक सब्सक्रिप्शनचा समावेश आहे.

दरम्यान, दोन आठवड्यांपूर्वी एयरटेलने ग्राहकांसाठी दोन नवीन Airtel Data Add-On Pack लाँच केले आहेत. या प्लॅन्सची किंमत 78 रुपये आणि 248 रुपये इतकी आहे. 78 रुपयांच्या Data Add-On Pack मध्ये युजर्सना 5 जीबी डेटासह Wynk Premium चं एक महिन्याचं सब्सक्रिप्शन मोफत दिलं जाईल. तर 248 रुपयांच्या डेटा अ‍ॅड ऑन पॅकमध्ये युजर्सना 25 जीबी डेटा आणि एक वर्षभरासाठी Wynk Premium चं मोफत सब्सक्रिप्शन दिलं जाईल. कंपनीने अशा प्रकारचा प्लॅन लाँच करावा, अशी ग्राहकांची मागणी होती. कंपनीने हा प्लॅन लाँच केला असल्यामुळे आज आम्ही तुम्हाला या डेटा अ‍ॅड ऑन पॅकबाबतची माहिती देणार आहोत.

कमी पैशात जास्तीत जास्त इंटरनेटसाठी हे दोन प्लॅन्स वापरा!

78 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 5 जीबी डेटा दिला जाईल. या डेटाचा वापर ग्राहक त्यांच्या सध्याच्या प्लॅनप्रमाणे करु शकतील. याचाच अर्थ या प्लॅनची वैधता ही तुमच्या सध्याच्या प्लॅनइतकीच असेल. तसेच तुम्ही हा प्लॅन काळजीपूर्वक वाचलात तर तुमच्या लक्षात येईल की, वैधतेपूर्वीच तुमचा डेटा संपला, त्यानंतर तुम्ही Airtel Data Add-On Pack मध्ये मिळालेला डेटादेखील संपवलात तर तुम्हाला प्रति Mb डेटासाठी 50 पैसे मोजावे लागतील. म्हणजेच तुम्ही केवळ 1 जीबी डेटा वापरलात तर तुम्हाला 500 रुपये मोजावे लागतील. सोबतच कंपनीने तुम्हाला एक महिन्यासाठी मोफत Wynk Premium चं सब्सक्रिप्शन देऊ केलं आहे.

दुसऱ्या बाजूला कंपनीने 248 रुपयांचा डेटा अ‍ॅड ऑन पॅक सादर केला आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना त्यांच्या सध्याच्या डेटा प्लॅनसोबत 25 जीबी डेटा दिला जातोय. सोबतच एक वर्षभरासाठी Wynk Premium चं मोफत सब्सक्रिप्शन दिलं आहे. हा प्लॅनही युजर्सच्या सध्याच्या प्लॅनमध्ये समाविष्ट केला जाईल. म्हणजेच तुमचा सध्याचा डेटा संपला की तुम्ही 25 जीबीमधील डेटाचा वापर करु शकाल. याची वैधतादेखील तुमच्या सध्याच्या प्लॅनइतकीच असेल. तसेच तुम्ही तुमचा सध्याच्या प्लॅनमधील डेटा संपवलात आणि त्यानंतर डेटा अ‍ॅड ऑन पॅकमध्ये मिळालेला 25 जीबी डेटादेखील संपवलात तर तुम्हाला प्रति एमबी 50 पैसे मोजावे लागतील.

हेही वाचा

डेबिट कार्ड स्वाईप न करता आता घड्याळाद्वारे भरा बिल, एसबीआयची ग्राहकांसाठी नवी सुविधा

भारतात आता मेड इन इंडिया Appsचा बोलबाला, चिनी कंपन्यांची सद्दी संपली

भारतात 5G सेवा सुरु होणार, सरकारकडून जोरदार तयारी

(Airtel Prepaid Plan of rs 2399 get 730 GB data unlimited calling for a year)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.