डेबिट कार्ड स्वाईप न करता आता घड्याळाद्वारे भरा बिल, एसबीआयची ग्राहकांसाठी नवी सुविधा

डेबिट कार्ड स्वाईप न करता आता घड्याळाद्वारे भरा बिल, एसबीआयची ग्राहकांसाठी नवी सुविधा (now pay sbi debit card bill on titan pay watch)

  • Updated On - 11:35 am, Wed, 10 February 21
डेबिट कार्ड स्वाईप न करता आता घड्याळाद्वारे भरा बिल, एसबीआयची ग्राहकांसाठी नवी सुविधा
डेबिट कार्ड स्वाईप न करता आता घड्याळाद्वारे भरा बिल

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेली भारतीय स्टेट बँके(एसबीआय)ने आपल्या ग्राहकांसाठी विशेष सुविधा आणली आहे. खातेधारकांना आता डेबिट कार्ड बिलच्या दीर्घ प्रोसेसमधून दिलासा मिळणार आहे. एसबीआयच्या ग्राहकांना आता घड्याळाद्वारे आपले डेबिट कार्डचे बिल भरता येणार आहे. घड्याळामध्ये अग्रेसर असलेली देशातील सर्वात मोठी कंपनी टायटनने ही सुविधा उपलब्ध केली आहे. टायटन कंपनीने ‘टायटन पे वॉच’ (Titan Pay Watch) हे नवीन घड्याळ आता बाजारात लाँच केले आहे. गतवर्षी सप्टेंबरमध्ये टायटन कंपनीने एसबीआयसोबत कॉन्टॅक्टलेस पेमेंट वॉचचा करार केला होता. या करारानुसार टायटन आणि एसबीआय यांनी संयुक्त पहिल्यांदा वॉच फंक्शनसह स्टायलिश घड्याळांची सिरीज बाजारात आणली आहे. (now pay sbi debit card bill on titan pay watch)

घड्याळाद्वारे कसे भराल बिल?

शॉपिंग केल्यानंतर जेव्हा तुम्ही बिल काऊंटरवर जाल तेव्हा तुम्हाला केवळ PoS मशीनजवळ जाऊन टायटन पे पॉवर वॉच(Titan Pay Powered Watch)ला टॅप करायचे आहे. असे केल्यानंतर तुमचे कॉन्टॅक्टलेस पेमेंट पूर्ण होईल. टायटन पे वॉचची सुविधा केवळ एसबीआय खातेधारकांसाठी आहे. या घड्याळात दिलेले पेमेंट फंक्शन खास सिक्युअर्ड सर्टिफाईड नियर-फिल्ड कम्युनिकेशन चिप (NFC)च्या माध्यमातून काम करते, जे या घड्याळाच्या स्ट्रॅपमध्ये लावण्यात आले आहे.

विना पिनकोड करा 5 हजाराचे पेमेंट

टायटन पे च्या माध्यमातून पेमेंट करताना वापरकर्त्यांना पिनकोड टाकण्याची आवश्यकता नाही. वापरकर्ता 5 हजार रुपयांपर्यंतचे पेमेंट पिनकोडशिवाय करु शकतात. मात्र 5 हजारांपेधा अधिक पेमेंटकरीता पिनकोड आवश्यक आहे. याआधी विना पिनकोड पेमेंटची मर्यादा 2 हजार रुपये होती. भारतीय रिझर्व्ह बँकेने याची मर्यादा 5 हजार रुपये इतकी वाढवली आहे.

घड्याळाची किंमत किती?

या खास घड्याळांच्या सिरीजमध्ये पुरुषांसाठी 3 आणि महिलांसाठी 2 स्टाईलमध्ये घड्याळ बनवले आहे. याची किंमत 2,995 रुपयांपासून 5,995 रुपयांपर्यंत आहे. पुरुषांच्या घड्याळाची किंमत 2,995 रुपये, 3,995 रुपये आणि 5,995 रुपये इतकी आहे. तर महिलाच्या घड्याळाची किंमत 3,895 आणि 4,395 रुपये इतकी आहे.

घड्याळाच्या खरेदीवर 10 टक्के सूट

एसबीआयने ट्विटमध्ये घड्याळाच्या खरेदीवर 10 टक्के डिस्काऊंट जाहिर केले आहे. यासाठी तुम्हाला योनो एसबीआय(YONO SBI)वर लॉग इन करायचे आहे. लॉग इन केल्यानंतर शॉप अँड ऑर्डरवर जा. त्यानंतर फॅशन आणि लाईफस्टाईलवर क्लिक करा आणि टायटन पे सिलेक्ट करा. घड्याळ सिलेक्ट केल्यानंतर पेमेंट ऑप्शनमध्ये कूपन कोड TITANPAY10 टाईप करा आणि पेमेंट करा. तुम्हाला 10 टक्के डिस्काऊंट मिळेल. (now pay sbi debit card bill on titan pay watch)

 

इतर बातम्या

दरमहा 10 हजारांची बचत; 16 लाखांचा फायदा, पोस्टाची जबरदस्त योजना

Mahindra Thar प्रेमींसाठी वाईट बातमी, उत्पादन मंदावलं, वेटिंग पिरियड वाढणार?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI