AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता केवळ 2 मिनिटात मिळणार हेल्थ पॉलिसी, कोरोनापासून कँसरपर्यंत होणार इलाज

आता केवळ 2 मिनिटात मिळणार हेल्थ पॉलिसी, कोरोनापासून कँसरपर्यंत होणार इलाज (Now you will get a health policy in just 2 minutes)

आता केवळ 2 मिनिटात मिळणार हेल्थ पॉलिसी, कोरोनापासून कँसरपर्यंत होणार इलाज
Insurance
| Updated on: Feb 15, 2021 | 4:37 PM
Share

मुंबई : सध्याच्या डिजिटल युगात प्रत्येक काम ऑनलाईन पद्धतीने केले जातेय. घरगुती सामान मागवण्यापासून ते ऑफिस वर्कपर्यंत सर्व ऑनलाईन होते. विमा क्षेत्रात आतापर्यंत असा कोणताही बदल दिसला नाही. मात्र या पेपरलेस प्रक्रियेला चालना देत आता विमा क्षेत्रातही ऑनलाईन प्रणाली राबवण्यास सुरुवात झाली आहे. विमा क्षेत्रात, विशेषत: आरोग्य विमा क्षेत्रात अनेक कागदाच्या प्रक्रियेनंतरच पॉलिसी उपलब्ध होते. पण आता मोबाईल अ‍ॅपद्वारे ग्राहकांना केवळ 2 मिनिटांत आरोग्य विमा पॉलिसी मिळू शकेल. नवी जनरल इन्शुरन्सने ‘2 मिनिट’ ऑनलाईन रिटेल हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी सुरू केली आहे. ग्राहक अॅपद्वारे जलद आणि पूर्णपणे पेपरलेस प्रक्रियेद्वारे ग्राहक केवळ 2 मिनिटांत आरोग्य विमा खरेदी करू शकतात आणि हे त्वरित पॉलिसी अ‍ॅपवर जारी केले जाते. (Now you will get a health policy in just 2 minutes)

2 लाखापासून 1 कोटीपर्यंत विमा उपलब्ध

या विमा पॉलिसीअंतर्गत 2 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंत व्यक्तीगत किंवा कुटुंबासाठी आरोग्य विमा उपलब्ध आहेत. विमाधारक हेल्पलाईनवरुन फोनवर क्लेम प्रक्रिया करु शकतात. बहुतांश कॅशलेस क्लेम 20 मिनिटांच्या आत मंजुर केले जातात. नवी हेल्थ इन्शुरन्स कंपनी या क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांपैकी एक असून कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशिओ 98 टक्के आहे. या कंपनीचे देशभरात 400 हून अधिक ठिकाणी 10 हजाराहून अधिक हॉस्पिटलमध्ये नेटवर्क आहे. ग्राहक नवी हेल्थ इन्शुरन्स अॅप गुगल प्ले स्टोरमधून डाऊनलोड करु शकतात.

कोविडचेही क्लेम करु शकता

या हेल्थ पॉलिसीमध्ये रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याआधी आणि दाखल झाल्यानंतरचा खर्च, कोविड 19 अंतर्गत हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झालेला खर्च, डोमिसिलरी हॉस्पिटलायझेशन, 393 डे केअर प्रोसिजर, रोड अॅम्ब्युलन्स कव्हर, वेक्टर बॉर्न डिसीज कव्हर, ऑप्शनल क्रिटिकल आजार कव्हर, मॅटर्निटी आणि नवजात शिशु कव्हरचा समावेश आहे.

4 तासाच्या आत क्लेम सेटलमेंट होणार

ग्राहक वर्षभरात कितीही वेळा क्लेम करु शकतात. याव्यतिरिक्त विमा कंपनीच्या नेटवर्कमध्ये नसलेल्या देशभरातील कोणत्याही हॉस्पिटलमधील उपचाराचा खर्च क्लेम करु शकतात. विमा कंपनीकडे सर्व डॉक्युमेंट सादर केल्यानंतर 4 तासाच्या आत क्लेम सेटलमेंट होते. या योजनेंतर्गत आजीवन नूतनीकरण केले जाऊ शकते आणि नूतनीकरण करताना प्रत्येक वेळी वैद्यकीय तपासणी करण्याची आवश्यकता नाही. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असते. मात्र जर ग्राहकाला नूतनीकरण करताना सम अॅश्युरन्समध्ये वाढ करायची असेल तर वैद्यकीय तपासणी आवश्यक आहे.

गंभीर आजारामध्ये उपयुक्त

या पॉलिसीमध्ये एक ‘एक्स्ट्रा केअर’ कवरही उपलब्ध आहे. यात डेंग्यू, मलेरीया, स्वाईन फ्लू आणि अन्य वेक्टर बोर्न डिसीजमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यास 20 हजार रुपयांचे अतिरिक्त सम अॅशुरन्सचा समावेश आहे. याचा बेस अ‍ॅश्युरन्सवर परिणाम होत नाही.

काय म्हणाले कंपनीचे एमडी?

आमच्या आरोग्य विमा ऑफरद्वारे लोकांचे आणि त्यांच्या कुटुंबासाठी आरोग्य विम्याचे व्यापक सरलीकरण करणे हे आमचे ध्येय आहे, असे नवी जनरल इंश्युरन्सचे एमडी आणि सीईओ रामचंद्र पंडित म्हणाले. आरोग्य विमा खरेदी करणे आणि मिळवणे ही फार जटिल आणि अवघड प्रक्रिया आहे, ही ग्राहकांची धारणा पूर्णपणे बदलणे हे नवी इन्शुरन्सचे उद्दिष्ट आहे. अ‍ॅपद्वारे काही मिनिटांत कागदविरहित पद्धतीने पॉलिसी खरेदी करण्यापासून, सहज समजण्यायोग्य सेटलमेंट प्रक्रिया आणि सर्वसमावेशक धोरण राबवण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. (Now you will get a health policy in just 2 minutes

इतर बातम्या

Harmful | स्मार्टफोनच्या अति वापरामुळे खुंटतो मुलांच्या मेंदूचा विकास, भविष्यात होऊ शकतात अनेक मोठे तोटे!

128GB स्टोरेज, तगडा बॅटरी बॅकअप, ‘हा’ स्मार्टफोन किफायतशीर दरात मिळणार

आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?.
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका.
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?.