128GB स्टोरेज, तगडा बॅटरी बॅकअप, ‘हा’ स्मार्टफोन किफायतशीर दरात मिळणार

शाओमी कंपनी लवकरच भारतात रेडमी नोट 10 सिरीज स्मार्टफोन लाँच करु शकते. (Redmi is launching note 10 series)

128GB स्टोरेज, तगडा बॅटरी बॅकअप, 'हा' स्मार्टफोन किफायतशीर दरात मिळणार
Follow us
| Updated on: Feb 15, 2021 | 3:54 PM

मुंबई : शाओमी कंपनी लवकरच भारतात रेडमी नोट 10 सिरीज स्मार्टफोन लाँच करु शकते. स्मार्टफोन मेकर कंपनी नुकतीच घोषणा केली आहे की, हा स्मार्टफोन मार्चमध्ये लाँच केला जाऊ शकतो. नोट 10 सिरीजबाबत अनेकदा लीक्सच्या माध्यमातून बरीच माहिती समोर आली आहे. शाओमीचा हा पहिला असा स्मार्टफोन आहे जो स्मूद रिफ्रेश रेटसह सादर केला जाईल. शाओमीची नोट सिरीज देशात खूपच लोकप्रिय ठरली आहे. दरम्यान, असं म्हटलं जातंय की, या स्मार्टफोनमध्ये कंपनी अनेक दमदार फीचर्स देणार आहे. (Redmi is launching note 10 series next month, here are the all specs)

रेडमी नोट 10 सिरीज भारतात बजेट रेंजमध्ये सादर केली जाईल. या फोनला रियलमी आणि ओप्पोसारख्या ब्रँड्सकडून टक्कर मिळणार आहे. कंपनीने लाँचिंगपूर्वीच नोट 10 चं प्रमोशन सुरु केलं आहे. एका टीझरमधून माहिती मिळाली आहे की, फोन मार्चमध्येच लाँच केला जाऊ शकतो. परंतु कंपनीने या फोनची लाँचिंग डेट जाहीर केलेली नाही.

फीचर्स

शाओमीने गेल्या वर्षी मार्च महिन्यात रेडमी नोट 9 प्रो आणि प्रो मॅक्स हे दोन स्मार्टफोन भारतात लाँच केले होते. स्पेक्सबाबत बोलायचे झाल्यास यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 732 प्रोसेसर देण्यात आला आहे. रेडमी नोट सिरीजमध्ये 90Hz चा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. शाओमी कंपनीचं म्हणणं आहे की, हा स्मार्टफोन 120Hz स्क्रीन्ससह सादर केला जाऊ शकतो.

या फोनच्या कॅमेराबाबत बोलायचे झाल्यास यामध्ये 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला जाऊ शकतो. त्यामध्ये अल्ट्रा वाइड लेंस, डेप्थ सेंसर और मॅक्रो सेंसर दिला जाईल. या फोनमध्ये NFC सपोर्टही दिला जाईल. रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, या फोनमध्ये 5050mAh क्षमतेची बॅटरी, 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज स्पेस दिली जाऊ शकते. या फोनची किंमत 10,000 ते 15,000 रुपयांच्या दरम्यान असू शकते.

हेही वाचा

OnePlus Nord, Realme X7 5G ला टक्कर, Samsung चा Galaxy F62 लाँच, जाणून घ्या फीचर्स

फेब्रुवारी-मार्चमध्ये लाँच होणार हे पाच स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत आणि फिचर्सची माहिती

‘हे’ आहेत देशातील बेस्ट 5G स्मार्टफोन्स, किंमती 19999 रुपयांपासून…

(Redmi is launching note 10 series next month, here are the all specs)

Non Stop LIVE Update
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.