AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

OnePlus Nord, Realme X7 5G ला टक्कर, Samsung चा Galaxy F62 लाँच, जाणून घ्या फीचर्स

क्षिण कोरियाई स्मार्टफोन निर्माती कंपनी सॅमसंगने आज त्यांच्या F सिरीजमधील नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy F62 लाँच केला आहे.

OnePlus Nord, Realme X7 5G ला टक्कर, Samsung चा Galaxy F62 लाँच, जाणून घ्या फीचर्स
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Feb 15, 2021 | 3:01 PM
Share

मुंबई : दक्षिण कोरियाई स्मार्टफोन निर्माती कंपनी सॅमसंगने आज त्यांच्या F सिरीजमधील नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy F62 लाँच केला आहे. हा स्मार्टफोन कंपनीने Exynos 9825 प्रोसेसर आणि 7000mAh क्षमतेच्या बॅटरीसह सादर केला आहे. सोबतच 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 23999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. (Samsung Galaxy F62 smartphone launched in india with 7000mah battery and Exynos 9825 processor, know features and specification)

या स्मार्टफोनमध्ये 8GB रॅम देण्यात आला असून हा One UI 3.1 वर चालतो. सोबतच फोनच्या बॅक पॅनलवर युनिक पॅटर्न मेटॅलिक ग्रेडेशन फिनिश देण्यात आलं आहे. कंपनीचं म्हणणं आहे की, Samsung Galaxy F62 स्मार्टफोनची OnePlus Nord, Realme X3 SuperZoom आणि Realme X7 5G या स्मार्टफोनसोबत मार्केटमध्ये टक्कर होणार आहे.

सॅमसंगच्या या फोनमध्ये पंचहोल डिझाईनचा डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच याच्या रियर पॅनेलवर ग्रेडियंट फिनिश आणि एलईडी फ्लॅश सोबत स्क्वेयर शेप कॅमेरा मॉड्यूल देण्यात आला आहे. फोनमध्ये तुम्हाला साईड फेसिंग फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. या फोनमध्ये 7000mAh क्षमतेची बॅटरी आणि 6.7 इंचाचा sAMOLED डिस्प्ले दिला जाणार आहे. हा फोन 8 जीबी रॅम प्लस 128 जीबी इंटर्नल स्टोरेजसोबत लाँच करण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy F62 या फोनमध्ये 64 मेगापिक्सलचा क्वाड कॅमेरा सेटअप असेल, तर सेल्फीसाठी यामध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनची किंमत 23999 रुपये इतकी आहे. या स्मार्टफोनची विक्री Flipkart आणि Samsung.com या वेबसाईटवर केली जाणार आहे.

Samsung Galaxy F62 स्पेसिफिकेशन्स

परफॉर्मन्स Exynos 9611 (10nm)
डिस्प्ले 6.5 inches (16.51 cm)
स्टोरेज 128 GB
कॅमरा 64 MP + 12 MP + 5 MP + 5 MP
बॅटरी 4500 mAh
किंमत 23999
रॅम 6 GB, 8 GB

फास्ट परफॉर्मिंग स्मार्टफोन

Samsung फ्लॅगशिप 7nm Exynos 9825 प्रोसेसर हा दमदार असल्याचे याआधीही अनेकदा स्पष्ट झाले आहे. हा प्रोसेसर अधिक वेगवान, सक्षम आणि फास्ट परफॉर्मिंग आहे. 7nm EUV टेक्नोलॉजी हा फक्त चांगला परफॉर्मन्सचं देत नाही, तर प्रोसेसरची क्षमताही वाढवतो. Exynos 9825 प्रोसेसर हा इतर सर्व प्रोसेसरच्या तुलनेत 32 टक्के जास्त क्षमतेने काम करतो. हा प्रोसेसर चांगला व्हिडीओ Viewing experience देतो. त्यामुळे Samsung Galaxy F62 हा फोन ऑल राऊंडर #FullOnSpeedy स्मार्टफोन ठरण्याची शक्यता आहे. तसेच या फोनला 7nm EUV टेक्नोलॉजीमुळे या स्मार्टफोनला दमदार बॅटरी बॅकअप देण्यात आलं आहे. त्यामुळे फोनचा जास्त वापर करणाऱ्यांसाठी हा फोन उत्तम पर्याय ठरु शकतो.

हेही वाचा

‘रिअल मी’चा 5 जी स्मार्टफोन लवकरच बाजारात, ग्राहकांना परवडणाऱ्या किंमतीत अत्याधुनिक सुविधा मिळणार

भारतात लवकरच लाँच होणार सॅमसंगचा नवा फोन, कमी किंमतीत मिळणार हे शानदार फिचर्स

अ‍ॅपल वॉचला टक्कर देणार फेसबुकचे स्मार्टवॉच, पुढील वर्षी स्मार्टवॉच बाजारात आणण्याची फेसबुकची योजना

(Samsung Galaxy F62 smartphone launched in india with 7000mah battery and Exynos 9825 processor, know features and specification)

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?