
सर्च इंजिन गुगलवर आपण अनेक गोष्टी सर्च करत त्याबद्दल माहिती मिळवत असतो. अशातच वर्षाभरात भारतीयांनी सर्वात जास्त काय सर्च केल हे गुगल आपल्याला वर्षाच्या शेवटी सांगत असतं. तर गुगलने क्रिकेट मॅचेस,स्पोर्टस इवेंट, टॉप साँग, चित्रपट, शो, भारतीय व्यक्ती, शब्दांचे किंवा वाक्यांचे अर्थ, निअर मी, पर्यटनाची ठिकाणी, रेसिपी यासारख्या कॅटेगरीत कोणत्या गोष्टी सर्च केल्या गेल्या याची माहिती देत असतो. तर यंदा दरवर्षीप्रमाणे गुगलने भारतासाठी त्यांचा ‘Year in Search’ हा लेख प्रसिद्ध केला आहे. ‘इयर इन सर्च’ चा 2025 हे ॲडिशन आले आहे ज्यामध्ये ट्रेंडिंग, ओव्हरऑल एआय आणि इतर श्रेणींमध्ये टॉप ट्रेंडिंग सर्च दाखवतो. गुगलने ट्रेंडिंग सर्चचा “ए ते झेड” देखील सादर केला आहे, ज्यामध्ये अल्फाबेट यातील प्रत्येक अक्षर वेगळ्या लोकप्रिय क्वेरीचे प्रतिनिधित्व करते. आमच्याकडे तुमच्यासाठी सर्व तपशील आहेत; चला जाणून घेऊया.
Google Year in Search 2025: 2025 मध्ये भारतात सर्वाधिक ट्रेंडिंग सर्च कोणते होते?
-आयपीएल
-गुगल जेमिनी
-आशिया कप
-आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी
-प्रो कबड्डी लीग
-महाकुंभ
-महिला विश्वचषक
-ग्रोक
-सैयारा
-धर्मेंद्र
गुगलने सांगितले आहे की इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) हा शब्द भारतात सर्वाधिक शोधला गेला. गुगलवर जेमिनी दुसऱ्या क्रमांकावर, त्यानंतर आशिया कप तिसऱ्या क्रमांकावर, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी चौथ्या क्रमांकावर, प्रो कबड्डी लीग पाचव्या क्रमांकावर, महाकुंभ सहाव्या क्रमांकावर, महिला विश्वचषक सातव्या क्रमांकावर, GROK आठव्या क्रमांकावर, सैयारा नवव्या क्रमांकावर आणि धर्मेंद्र दहाव्या क्रमांकावर आहे.
एआय कॅटेगिरीमध्ये गुगल जेमिनी सर्वात लोकप्रिय आहे
गुगलने एआयशी संबंधित टॉप ट्रेंडिंग सर्च देखील जारी केले. गुगल जेमिनी अव्वल स्थानावर आहे, त्यानंतर Gemini AI Photo दुसऱ्या स्थानावर, GROK तिसऱ्या स्थानावर, DeepSeek चौथ्या स्थानावर, Perplexity पाचव्या स्थानावर, Google AI Studio सहाव्या स्थानावर, ChatGPT सातव्या स्थानावर,ChatGPT Ghibli Art आठव्या स्थानावर, Flow नवव्या स्थानावर आणि Ghibli Style Image Generator दाहाव्या स्थानावर आहे.
भारतातील टॉप ट्रेंड्सबद्दल बोलायचे झाले तर, जेमिनी ट्रेंड प्रथम, घिबली ट्रेंड दुसऱ्या, थ्रीडी मॉडेल ट्रेंड तिसऱ्या, जेमिनी साडी ट्रेंड चौथ्या आणि अॅक्शन फिगर ट्रेंड पाचव्या स्थानावर आहे.