डबल डोअरपेक्षा सिंगल डोअर फ्रीजमुळे जास्त वीज वाचते का ? जाणून घ्या तथ्य…

| Updated on: Mar 24, 2023 | 1:38 PM

बाजारात आजकाल अनेक डोअरवाले फ्रीज उपलब्ध आहेत. पण, घरांमध्ये सहसा फक्त सिंगल किंवा डबल-डोअर फ्रीज वापरले जातात. या दोघांपैकी कोणती खरेदी करायची याबाबत तुम्ही गोंधळात असाल तर ते जाणून घ्या.

डबल डोअरपेक्षा सिंगल डोअर फ्रीजमुळे जास्त वीज वाचते का ? जाणून घ्या तथ्य...
Image Credit source: freepik
Follow us on

नवी दिल्ली : आजकाल सर्व घरांमध्ये रेफ्रिजरेटरचा (refrigerators) वापर केला जातो. उन्हाळा (summer season) आला की त्याची मागणी आणखी वाढते. अशा परिस्थितीत जर तुम्ही या हंगामात तुमच्या घरासाठी नवीन फ्रीज (fridge) घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे प्रामुख्याने सिंगल डोअर आणि डबल डोअरचा पर्याय असेल. दोघांपैकी कोणता फ्रीज घेणे तुमच्यादृष्टीने सोयीस्कर ठरेल हे जाणून घेऊया.

सर्वात पहिले सिंगल डोअर रेफ्रिजरेटर्सबद्दल बोलायचे तर त्यांची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते डबल डोअर रेफ्रिजरेटर्सपेक्षा 30 ते 40 टक्के कमी वीज वापरतात. तसेच त्यांचा आकारही लहान असतो. अशा परिस्थितीत त्यांना कुठेही ठेवणे सोपे जाते. जर तुमचे कुटुंब लहान असेल तर सिंगल डोअर फ्रीज तुमच्यासाठी चांगला ठरेल.

सिंगल डोअर रेफ्रिजरेटर अन्न थंड आणि ताजे ठेवण्यासाठी थेट कूलिंग तंत्रज्ञान वापरतात. पण जर तुमचे कुटुंब मोठे असेल, तर तुम्हाला सिंगल डोअर फ्रीज वापरताना समस्या येऊ शकते. कारण, त्यांच्यात जागा कमी असते. अशा परिस्थितीत, मोठ्या कुटुंबासाठी, सामान पुरणार नाही. तसेच सिंगल डोअर फ्रीजमध्ये फ्रीजर आतमध्ये असतो. अशा परिस्थितीत, तुम्हाला तो वापरण्यासाठी फ्रीज वारंवार उघडावा लागू शकतो, ज्यामुळे फ्रीजचे तापमान वाढू शकेल.

डबल डोअर फ्रीज

डबल-डोअर फ्रीज मोठ्या क्षमतेसह येतात. अशा स्थितीत भाजीपाला किंवा इतर गोष्टी त्यामध्ये बराच काळ ठेवता येतात. तसेच, फ्रीझरसाठी स्वतंत्र दरवाजा आहे. अशा परिस्थितीत, फ्रीजर वापरण्यासाठी करण्यासाठी तुम्हाला सारखा फ्रीज उघडण्याची गरज नाही आणि यामुळे त्याचे तापमान वाढत नाही. यामध्ये फ्रीझरचा आकारही मोठा असतो.

मात्र, डबल डोअर फ्रीजची किंमत जास्त आहे. यासोबतच त्यांची क्षमता जास्त असल्याने ते जास्त वीज वापरतात. डबल-डोअर रेफ्रिजरेटर्स सहसा फ्रॉस्ट-फ्री तंत्रज्ञानासह येतात, ज्यांना ऑपरेट करण्यासाठी 30-40 टक्के जास्त वीज लागते. तुमच्या घरात कमी जागा असल्यास, त्यामुळे अधिक समस्या निर्माण होऊ शकते.

कोणता फ्रीज विकत घेणे योग्य ?

तुम्हाला दोघांपैकी कोणता फ्रीज खरेदी करायचा आहे, हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते. तुमच्या कुटुंबात किती सदस्य आहेत, तुम्हाला फ्रीजरची जास्त गरज आहे की नाही आणि तुमच्या घरात किती जागा आहे, यावर फ्रीजचा आकार ठरवू शकता. जर तुमचे बजेट जास्त असेल आणि तुमचे कुटुंब मोठे असेल तर तुम्ही डबल-डोअर फ्रीज घेऊ शकता. तुमचे कुटुंब लहान असेल तर खर्च वाचवण्यासाठी आणि कमी वीज वापरण्यासाठी सिंगल डोअर फ्रीज तुमच्यासाठी उत्तम ठरेल.