BGMIचा खेळ संपला! या तीन गेम्सला कोट्यवधी लोकांची पसंती, काय कारण? जाणून घ्या….

BGMI BAN झाल्यानंतर त्याला गुगल प्ले स्टोअर्स आणि अ‍ॅपल स्टोरमधून हटवण्यात आलंय. आम्ही तुम्हाला तीन गेमबद्दल माहिती देणार आहोत. हे गेम्स तुम्ही मित्रांसोबत आरामात खेळू शकता.

BGMIचा खेळ संपला! या तीन गेम्सला कोट्यवधी लोकांची पसंती, काय कारण? जाणून घ्या....
या तीन गेम्सला कोट्यवधी लोकांची पसंती
Image Credit source: tv9
शुभम कुलकर्णी

|

Jul 30, 2022 | 6:01 AM

मुंबई : सगळ्यात आधी पब्जी  हा गेम बॅन (PUBG Mobile Ban) करण्यात आला. मात्र, तोपर्यंत तो गेम अनेकांची आवड बनला होता. प्लेअर्सला पब्जी अधिक आवडायला लागला होता. त्यानंतर Kraftonने पब्जी मोबाईलला नव्या अवतारात बीजीएमआई म्हणजेच (BattleGrounds Mobile India) या नावानं बाजारात आणलं. प्लेअर्सला हा गेम प्रचंड आवडायला लागला होता. पण, पुन्हा एकदा केंद्र सरकारच्या आदेशानंतर BattleGrounds Mobile India गेमला गुगल प्लेस्टोअर्स (google play store)आणि अ‍ॅपल स्टोअरमधून काढून टाकण्यात आला आहे. तुम्ही पण जर या गेमला खेळण्याच्या विचारात असला तर आम्ही तुम्हाला अशा तीन पर्यायांची माहिती सांगणार आहोत. यामुळे तुम्हाला गेम खेळण्याचा आनंद मिळू शकेल. कोणताही गेम खेळायचा अल्यास त्याची अधिक माहिती असेल तर तुम्हाला तो गेम सोपा जाऊ शकतो. खेळतानाही आनंद मिळतो. चला तर पाहूया आम्ही तुम्हाला अशा तीन इतर गेम्सविषयी अधिक महिती देणार आहोत. जे गेम लोकप्रिय असून तुम्हाला देशील ते गेम्स खेळल्यानं आनंद मिळेल.

Call of Duty Mobile

हा गेम खेळाडूंमध्ये खूप लोकप्रिय आहे. परंतु जर तुम्ही आतापर्यंत बीजीएमआय गेम खेळत असाल तर आता तुम्ही हा गेम वापरून पाहू शकता. या गेमला Google Play Store वर 5 पैकी 4.3 रेटिंग या गमला मिळाले आहेत आणि एक कोटींहून अधिक लोकांनी हा गेम डाउनलोड देखील केला आहे. या गेममध्ये, खेळाडूंना बॅटल रॉयलमध्ये नवीन हवाई लढाई मिळेल. आपण गेममध्ये आपले स्वतःचे अल्टिमेट वेपन डिझाइन करण्यास सक्षम असाल. याच्या मदतीनं तुम्ही कंट्रोल्स कस्टमाइज देखील करू शकता. बॅटल पास पूर्ण करून, तुम्ही गेममध्ये सीझनल रिवॉर्ड्स देखील जिंकू शकता.

New State Mobile

हा बॅटल रॉयल गेम आहे आणि तो पूर्वी PUBG न्यू स्टेट म्हणून ओळखला जात होता. PUBG आणि BGMI प्रमाणे हा गेम देखील Crafton ने विकसित केला आहे. या गेममध्ये तुम्हाला मम्मी वॉरियर्सचा पराभव करायचा आहे. या गेममध्ये तुमच्याकडे भविष्यवादी घटक आहेत.

Apex Legends Mobile

पौराणिक वर्ण-आधारित गेमप्ले, सर्वोत्तम-इन-क्लास स्कॅव्हेंज्ड लढाया आणि जलद-वेगवान लढाईसह हा एक रणनीतिक युद्ध रॉयल शूटिंग गेम आहे. तुम्ही या गेममध्ये तुमच्या दोन मित्रांसह टीम बनवू शकता आणि इतर खेळाडूंशी स्पर्धा करू शकता.

आम्ही तुम्हाला अशा पद्धतीनं तिन पर्यायांची माहिती दिली आहे. यामुळे तुम्हाला गेम खेळण्याचा आनंद मिळू शकेल. कोणताही गेम खेळायचा अल्यास त्याची अधिक माहिती असायला हवी. तर तुम्हाला तो गेम सोपा जाऊ शकतो. खेळतानाही आनंद मिळतो.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें