
बहुप्रतिक्षित आयफोन 17 सिरीज ( Apple iPhone 17 Series) सप्टेंबरमध्ये लाँच होण्याची आशा आहे. परंतू जसा जसा वेळ जात आहे तस तसे अपकमिंग सिरीजची नवनवीन माहीती समोर येत आहे. आता अलिकडेच आलेल्या नव्या रिपोर्टनुसार iPhone 17 Series च्या सर्व मॉडेल्सचे प्रोडक्शन आता भारतात केले जाणार आहे. या सिरीजला पाच स्थानिक फॅक्टरीत तयार केले जात आहे. ज्यातील दोन फॅक्टरीनेच अलिकडेच काम सुरु केले आहे. कर्नाटकातील बंगळुरू येथे हे काम सुरू करण्यात आलं आहे.
ब्लुमबर्ग यांनी सूत्रांच्या आधारे सांगितले की यंदा पहिल्यांदा जेव्हा प्रीमियम प्रो व्हेरिएंट्स सहत सर्व नवीन iPhone मॉडल्सना भारतात मॅन्युफॅक्चर केले जात आहे. Apple कंपनीचे हे पाऊल व्यापक रणनितीचा भाग आहे. म्हणजे अमेरिकेला जाणाऱ्या शिपमेंटसाठी चीनवर आपले अवलंबित्व कमी करण्याचा आणि टॅरिफ रिस्क पासून वाचण्याचा डाव खेळला जात आहे. कंपनीने आधीच अमेरिकन बाजारपेठेसाठीचा आयफोन प्रोडक्शनचा एक मोठा हिस्सा चीनहून भारतात शिफ्ट केला आहे. फॉक्सकॉनने कर्नाटकातील बंगळुरूतील देवणहल्ली येथे आयफोन 17चे उत्पादन सुरू केलं आहे. चीनच्या बाहेरचा हा सर्वात मोठा प्रकल्प आहे. त्यामुळे आयफोनला आता देसी टच मिळणार आहे.
दरम्यान, केंद्रीय मंत्री एम बी पाटील यांनी याबाबतचं ट्विट केलं आहे. आनंदाने सांगतो की, फॉक्सकॉनने बंगळुरूतील देवणहल्ली येथील त्यांच्या नवीन प्रकल्पात आयफोन 17 चे उत्पादन सुरू केले आहे. हे युनिट चीनच्या बाहेरील सर्वात मोठी फॉक्सकॉन युनिट बनलं आहे. २५,००० कोटींच्या गुंतवणुकीसह उभारलेले हे अत्याधुनिक प्रकल्प हजारो रोजगार निर्मिती करेल, पुरवठा साखळी मजबूत करेल आणि भारताच्या निर्यात महत्त्वाकांक्षेला बळ देईल.
हा महत्त्वाचा टप्पा कर्नाटकाच्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनातील जागतिक केंद्र म्हणून उदयास अधोरेखित करतो, जिथे बंगळुरू Apple च्या भारतातील वाढीचे नेतृत्व करत आहे आणि आपल्या राज्याला जगाच्या तंत्रज्ञान व उत्पादन क्षेत्रात महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त करून देत आहे.
Karnataka at the Heart of Apple’s Global Supply Chain & Manufacturing
Delighted to share that Foxconn has commenced production of the latest iPhone 17 at its new facility in Devanahalli, Bengaluru — now the largest Foxconn unit outside China. With an investment of ₹25,000… pic.twitter.com/gRZo3AnxLE
— M B Patil (@MBPatil) August 20, 2025
ब्लुमबर्गच्या मते तामिळनाडू येथील होसूरमध्ये टाटा समुहाचा प्लांट आणि बंगळुरु विमानतळाच्या शेजारी फॉक्सकॉनचा हब या विस्ताराचे केंद्र आहे.या प्रकरणाशी संबंधित लोकांच्या मते टाटाने दोन वर्षांच्या आता भारताच्या सुमारे अर्ध्या आयफोन निर्मिती हँडल केली आहे. या बदलाने भारताच्या निर्यात आकड्यात वाढ झाली आहे. या वर्षी एप्रिल ते जुलै दरम्यान भारतातून 7.5अब्ज डॉलर मुल्याचे आयफोन निर्यात झाले तर गेल्या संपूर्ण आर्थिक वर्षात हा आकडा 17 अब्ज डॉलर इतका होता.
ट्रम्प प्रशासन चीनी वस्तूंवर मोठा टॅरिफ लावण्याच्या दिशेने पुढे जात आहे. त्यामुळे आयफोन कंपनी अनिश्चित अमेरिकन व्यापार मोहोलशी लढत आहे. तरीही आयफोन सारख्या स्मार्टफोनला आतापर्यंत व्यापक टॅरिफपासून वाचवण्यात आले आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की जर एप्पल अमेरिकेसाठी आयफोन तयार करु इच्छीत असेल तर त्यांनी अमेरिकेतच त्याची निर्मिती केली पाहीजे, चीन किंवा भारतात नाही !