गुगलकडून खास डुडलच्या माध्यमातून मतदान करण्याचं आवाहन

| Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. देशातील 20 राज्यांमधील 91 मतदारसंघांमध्ये, तर महाराष्ट्रात 7 मतदारसंघांमध्ये आज मतदान पार पडेल. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशातील सर्वात मोठ्या लोकसभा निवडणुकांना आता सुरुवात झाली आहे. देशासोबतच संपूर्ण जगाचं लक्ष भारतातील लोकसभा निवडणुकांकडे लागलेलं आहे. भारताच्या लोकसभा निवडणुकांची दखल घेत गुगलनेही भारतीयांना मतदान करण्याचं […]

गुगलकडून खास डुडलच्या माध्यमातून मतदान करण्याचं आवाहन
Follow us on

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. देशातील 20 राज्यांमधील 91 मतदारसंघांमध्ये, तर महाराष्ट्रात 7 मतदारसंघांमध्ये आज मतदान पार पडेल. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशातील सर्वात मोठ्या लोकसभा निवडणुकांना आता सुरुवात झाली आहे. देशासोबतच संपूर्ण जगाचं लक्ष भारतातील लोकसभा निवडणुकांकडे लागलेलं आहे. भारताच्या लोकसभा निवडणुकांची दखल घेत गुगलनेही भारतीयांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.

गुगलने एका खास डुडलच्या माध्यमातून लोकांना मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन केलं. गुगलने मतदान केल्यानंतर मतदाराच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाहीला आपल्या डुडलमध्ये स्थान दिलं आहे. यासोबतच गुगलकडून लोकांना मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलं. तसचे, तुम्ही कशाप्रकारे मतदान करु शकता याबाबतची संपूर्ण प्रक्रियाही सांगण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यात एकूण 116 उमेदवार असून 14 हजार 919 मतदान केंद्र आहेत. तर 1 कोटी 30 लाख 35 हजार मतदार आज मतदानाचा हक्क बजावतील.  वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर आणि यवतमाळ-वाशिम या सात मतदारसंघामध्ये आज मतदान होत आहे.

पहिल्या टप्प्यात मतदान होणारे मतदार संघ :

  • वर्धा- 2026 मतदान केंद्र (एकूण मतदार 17 लाख 41 हजार).
  • रामटेक – 2364 मतदान केंद्र (एकूण मतदार 19 लाख 21 हजार)
  • नागपूर – 2065 मतदान केंद्र, (एकूण मतदार 21 लाख 60 हजार),
  • भंडार-गोंदिया – 2184 मतदान केंद्र (एकूण मतदार 18 लाख 8 हजार)
  • गडचिरोली-चिमूर – 1881 मतदान केंद्र (एकूण मतदार 15 लाख 80 हजार)
  • चंद्रपूर – 2193 मतदान केंद्र (एकूण मतदार 19 लाख 8 हजार)
  • यवतमाळ-वाशिम – 2206 मतदान केंद्र (एकूण मतदार 19 लाख 14 हजार)

मतदानासाठी आवश्यक 11 दस्तावेज

मतदानासाठी भारत निवडणूक आयोगाचे ओळखपत्र नसेल आणि मतदार यादीत नाव असेल तर अशा वेळी अन्य अकरा प्रकारे आयोगाने ग्राह्य केलेल्या ओळखपत्रांच्या माध्यमातून मतदारास आपला हक्क बजावता येईल.

मतदान ओळखपत्र नसेल तर हे ओळखपत्र चालेल

  • पासपोर्ट (पारपत्र),
  • वाहन चालक परवाना,
  • छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (राज्य/केंद्र शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे ओळखपत्र),
  • छायाचित्र असलेले बँकांचे पासबूक,
  • पॅनकार्ड,
  • राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर)
  • अंतर्गत महसूल निर्मिती निर्देशांक (रेव्हेन्यू जनरेशन इंडेक्स) द्वारे दिलेले स्मार्टकार्ड,
  • मनरेगा कार्यपत्रिका,
  • कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड,
  • छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज,
  • खासदार/आमदार/विधानपरिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र
  • आधारकार्ड यांचा समावेश आहे.