Google Chrome : गुगल क्रोम ताबडतोब अपडेट करा, सरकारच्या युर्जसला सूचना

| Updated on: Feb 09, 2024 | 9:38 PM

CERT-In ने Google Chrome अपडेट करणे आवश्यक आहे. कारण त्यात काही त्रुटी असू शकतात ज्यामुळे युजर्सच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो. गुगल क्रोम अपडेट न केल्यास, हॅकर्स त्याचा फायदा घेऊन युजर्सची वैयक्तिक माहिती चोरू शकतात. त्यामुळे Chrome अपडेट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Google Chrome : गुगल क्रोम ताबडतोब अपडेट करा, सरकारच्या युर्जसला सूचना
Follow us on

Chrome Update : भारत सरकारच्या कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) ने Google Chrome वापरणाऱ्या युजर्संना एक गंभीर महत्त्वाचा इशारा दिला आहे. Chrome OS बाबत ही सूचना जारी करण्यात आली आहे. या सरकारी संस्थेने गुगल क्रोम अपडेट करण्यास सांगितले आहे.

Google Chrome ताबडतोब करा अपडेट

एलटीएस चॅनेलवर 114.0.5735.350 पूर्वीच्या Google Chrome OS आवृत्त्यांशी संबंधित गंभीर भेद्यतेकडे सुरक्षेच्या कारणास्तवर लक्ष वेधले गेले आहे. गुगल क्रोम अपडेट करण्याची आवश्यकता असल्याचे सरकारी एजन्सीकडून सांगण्यात आले आहे. कारण त्यात काही त्रुटी असू शकतात ज्यामुळे युजर्सला सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो. गुगल क्रोम अपडेट न केल्यास, हॅकर्स त्याचा फायदा घेऊन युजर्सची वैयक्तिक माहिती चोरू शकतात. अशा परिस्थितीत सर्व युजर्सने Chrome अपडेट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Chrome कसे अपडेट करायचे

  1. Google Chrome अपडेट करण्यासाठी सर्व प्रथम Google Chrome उघडा.
  2. विंडोच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात जा आणि नंतर तीन बिंदूंवर टॅप करा.
  3. येथे Help चा पर्याय दिसेल आणि नंतर Google Chrome निवडा.
  4. अपडेट उपलब्ध असल्यास त्यावर क्लिक करा.

सुरक्षेची घ्या काळजी

तुमचा ब्राउझर वापरताना कोणत्याही अज्ञात वेबसाइटला भेट देऊ नका. अज्ञात स्त्रोतांकडून आलेल्या लिंक्स आणि ईमेलवर अजिबात क्लिक करू नका. असे केल्याने तुमची पर्सनल माहिती लिक होऊ शकते.

सुरक्षेची विशेष काळजी घ्या. यासाठी चांगला अँटीव्हायरस वापरा, सर्व सॉफ्टवेअर अपडेट ठेवा आणि फायरवॉल चालू ठेवा. यामुळे कोणताही मालवेअर किंवा व्हायरस तुमच्या सिस्टममध्ये प्रवेश करू शकणार नाही.