गुगल प्ले स्टोअरवरुन ‘हे’ सहा अॅप हटवले, तुम्हीही तातडीने डिलिट करा

| Updated on: Sep 24, 2019 | 2:23 PM

आतापर्यंत गुगलने असे अनेक फेक अॅप प्ले स्टोअरवरुन (Google play store delete app) हटवले आहेत. नुकतेच गुगलने पुन्हा सहा अॅप आपल्या स्टोअरमधून डिलिट केलेत.

गुगल प्ले स्टोअरवरुन हे सहा अॅप हटवले, तुम्हीही तातडीने डिलिट करा
Follow us on

मुंबई : गुगल प्ले स्टोअरवर (Google play store delete app) सध्या नवनवीन अॅप पाहायला मिळत आहेत. जे आपल्या फोनसाठी घातक ठरत असून आतापर्यंत गुगलने असे अनेक फेक अॅप प्ले स्टोअरवरुन (Google play store delete app) हटवले आहेत. नुकतेच गुगलने पुन्हा सहा अॅप आपल्या स्टोअरमधून डिलिट केलेत. जर तुमच्याही मोबाईलमध्ये हे अॅप (App) असतील तर तातडीने डिलीट करा, असंही गुगलने सांगितले आहे.

गुगल सर्टिफिकेशननंतरच अॅप प्ले स्टोअरवर आणले जातात. पण प्ले स्टोअरवर आणल्यानंतर यामध्ये व्हायरस येतो. गुगलनेही आता हटवलेल्या सहा अॅपमध्ये मॅलिशिअस कटेंट सापडला होता. त्यामुळे गुगलने हे अॅप हटवले.

या VPN अॅपमध्ये हॉटस्पॉट व्हीपीएन (Hostspot VPN), फ्री व्हीपीएन मास्टर (Free VPN Master), सिक्युर व्हीपीएन (Secure VPN) आणि सीएम सिक्युरिटी अॅप लॉक अँटीव्हायरस (CM Security App lock Antivirus) अॅपचा समावेश आहे.

हे सर्व अॅप चीनमध्ये डेव्हलप केले आहेत. या सर्व अॅपमध्ये मोठ्या प्रमाणात फसवणुकीच्या जाहिराती आहेत, असं म्हटलं जात आहे. या सर्व अॅपला 50 कोटी वेळा डाऊनलोड केलेले आहे.

गुगलकडून दोन ब्युटी अॅप डिलिट करण्याचा सल्ला

गेल्या आठवड्यात मोबाईल सिक्युरिटी फर्म वांडेरा रिसर्चर्सने (mobile security firm wandera) आणि Sun Pro Beauty आणि Funny Sweet Beauty Selfie Camera नावाच्या सॉफ्टवेअरमध्ये अॅडवेअर स्पॉट केला आहे. हे दोन्ही अॅप गुगल प्ले स्टोअरवर खूप प्रसिद्ध आहेत. या अॅपला 15 लाखांपेक्षा अधिक डाऊनलोड केलेले आहे. हे दोन्ही अॅप पॉपच्या माध्यमातून पैसे कमवत आहे.

गुगलने सर्व युजर्संना हे अॅप डिलिट करण्यासाठी सांगितले आहे. वांडेराने दावा केला की, दोन्ही अॅपमध्ये अनवॉटेंड जाहिराती शिवाय बऱ्याच मॅलिसिअस कोडचाही समावेश आहे. तसेच दोन्ही अॅप ऑडिओ रेकॉर्डिंगच्या परवानगीसह इतर गोष्टींचीही परवानगी मागते.

संबधित बातम्या :

गुगल प्ले स्टोअरवरील अॅन्टी-व्हायरस अॅपमधून युजर्सची मोठी फसवणूक