आता Google Meet साठी दरमहा 750 रुपये मोजावे लागणार, अमर्यादित ग्रुप व्हिडिओ कॉलची सुविधा बंद

| Updated on: Jul 14, 2021 | 5:10 PM

कंपनीने अपडेटमध्ये म्हटले आहे की, वापरकर्ते कॉल वाढविण्यासाठी आपले गूगल खाते अपग्रेड करू शकतात, अन्यथा कॉल 60 मिनिटांनंतर संपेल. वन-ऑन-वन कॉलला 24 तास आणि तीन किंवा अधिक लोकांसोबत 60 मिनिटांपर्यंत कॉल उपलब्ध असेल.

आता Google Meet साठी दरमहा 750 रुपये मोजावे लागणार, अमर्यादित ग्रुप व्हिडिओ कॉलची सुविधा बंद
गूगल 9 नोव्हेंबरपासून करणार मोठा बदल
Follow us on

नवी दिल्ली : आपण गूगल मीट (Google Meet) नियमितपणे वापरत असल्यास, आपल्यासाठी महत्वाची बातमी आहे. गुगलने आपले व्हिडिओ कॉलिंग अॅप ‘मीट’वर फ्री अकाऊंटसाठी अनलिमिटेड ग्रुप व्हिडिओ कॉल सुविधा बंद केली आहे. ग्रुप कॉलिंगसाठी आता वापरकर्त्यांना फक्त एक तासाचा वेळ मिळेल. गुगल सपोर्ट पेजवरील अपडेटनुसार, मीट वापरकर्त्यांना ग्रुप व्हिडिओ कॉलिंग दरम्यान 55 मिनिटांनी सूचना मिळेल की त्यांचा कॉल आता समाप्त होणार आहे. (Google Meet now charges Rs 750 per month, unlimited group video calls)

कंपनीने अपडेटमध्ये म्हटले आहे की, वापरकर्ते कॉल वाढविण्यासाठी आपले गूगल खाते अपग्रेड करू शकतात, अन्यथा कॉल 60 मिनिटांनंतर संपेल. वन-ऑन-वन कॉलला 24 तास आणि तीन किंवा अधिक लोकांसोबत 60 मिनिटांपर्यंत कॉल उपलब्ध असेल. तथापि, गूगल वर्क प्लेसचे वैयक्तिक सदस्य 24 तास तीन किंवा अधिक लोकांसह वन टू वन कॉल आणि ग्रुप कॉल करू शकतात.

सदस्यता घेण्यासाठी किती खर्च येईल?

तथापि, आपल्याला असे वाटत असेल की आपल्यासाठी 60 मिनिटे पुरेसे नाहीत, तर आपण Google वर्कस्पेस सदस्यता खरेदी करू शकता. वर्कप्लेस मेंबरशिप वैयक्तिक स्तरावर $9.99 (अंदाजे 750 रुपये) दरमहा उपलब्ध आहे. आपण प्लान खरेदी केल्यास, आपले व्हिडिओ कॉल मर्यादित राहणार नाहीत.

कोरोना काळात लाँच झाले गूगल मीट

गूगल मीट एप्रिल 2020 मध्ये लाँच करण्यात आले होते आणि नंतर ती वापरकर्त्यांसाठी जीमेल खात्यात इंटिग्रेट केले होते. लॉन्च झाल्यापासून गुगलने ब्लर बॅकग्राउंड, नॉइज कॅन्सलेशन, अधिक लोकांना जोडण्याची क्षमता यासारख्या अनेक वैशिष्ट्यांची घोषणा केली आहे. वापरकर्त्याचा अनुभव वाढवण्यासाठी सर्च दिग्गजांनी विद्यमान वैशिष्ट्ये देखील सुधारीत केले. अर्थात, कोरोना कालावधीत गूगल मीटचा ट्रेंड बर्‍याच प्रमाणात वाढला आहे आणि लोकांनी ऑनलाईन मीटिंगसाठी या सुविधेचा अधिकाधिक वापर करण्यास सुरवात केली आहे.

गुगलने गेल्या वर्षी जाहीर केले होते की गूगल खात्यासह कोणालाही महामारी काळात कोणत्याही वेळेच्या मर्यादेशिवाय 100 लोकांपर्यंत विनामूल्य बैठक घेता येऊ शकते आणि त्याचे इंटीग्रेटेड कम्युनिकेशन आणि हेल्प सर्विस वर्क प्लेस आता गूगल खात्यासह प्रत्येकासाठी उपलब्ध आहे. (Google Meet now charges Rs 750 per month, unlimited group video calls)

इतर बातम्या

बाप्पा पावला! गणेशोत्सावात कोकणात जाण्यासाठी 72 स्पेशल गाड्या सोडणार; रावसाहेब दानवे यांची घोषणा

पोस्टाच्या ‘या’ योजनेत FD पेक्षा अधिक व्याज, अवघ्या 5 वर्षांत 7 लाख मिळण्याची संधी, पटापट तपासा