Video : लाईट्स, कॅमरा, अ‍ॅक्शन श्रीलंकेविरुद्ध सामन्यांपूर्वी टीम इंडियाचं धांसू फोटोशूट, बीसीसीआयने शेअर केला व्हिडीओ

भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यांना काही दिवसांत सुरुवात होणार आहे. आधी 13 जुलैला सुरु होणारे सामने कोरोनाच्या संकटामुळे 18 जुलैपासून सुरु करण्यात येणार आहेत.

Video : लाईट्स, कॅमरा, अ‍ॅक्शन श्रीलंकेविरुद्ध सामन्यांपूर्वी टीम इंडियाचं धांसू फोटोशूट, बीसीसीआयने शेअर केला व्हिडीओ
संपूर्ण भारतीय संघ श्रीलंकेवर मात मिळवण्यासाठी सज्ज झाला आहे.

कोलंबो : भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) सध्या नवनिर्वाचित कर्णधार शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्त्वाखाली श्रीलंका क्रिकेट संघाला त्यांच्याच भूमित मात देण्यासाठी श्रीलंकेला पोहोचला आहे. पण अचानक श्रीलंकेच्या संघात काही कोरोनाबाधित आढळल्याने 13 जुलै रोजी सुरु होणारी एकदिवसीय सामन्यांची मालिका पुढे ढकलून 18 जुलैपासून सुरु करण्यात येणार आहे. दरम्यान मालिका सुरु होण्यापूर्वी टीम इंडियाच्या युवा शिलेदारांच फोटोशूट आणि मजामस्ती सुरु आहे. बीसीसीआयने शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये हे सर्व दिसून येत आहे.

या व्हिडीओमध्ये सर्व खेळाडूंचे एक-एक करुन फोटो काढले जात आहेत. फोटोमध्ये प्रत्येक खेळाडू त्याच्या खेळाप्रमाणे पोज देत आहे. जसेकी हार्दीक पांड्या बॅट घेऊन पोज देत आहे. तर भुवनेश्वर कुमार हातात चेंडू घेऊन पोज देत आहे. तसेच यष्टीरक्षक संजू सॅमसन विकेटकिपिंगचे हातमोजे घालून पोज देत आहे. तसेच या व्हिडीओमध्ये खेळाडू इनडोअर गेम्स देखील खेळत आहेत. ज्यात टेबल-टेनिस, स्नूकर, व्हिडीओ गेम्स असे गेम खेळताना खेळाडू दिसत आहेत.

भारतीय संघाचा दौरा

या संपूर्ण दौऱ्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात मर्यादीत षटकांचे सामने पार पडणार आहेत. ज्यामध्ये तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामन्यांचा समावेश आहे. आधी 13 जुलै रोजी सामन्यांना सुरुवात करण्यात येणार होती. पण कोरोनाच्या संकटामुळे सामने पुढे ढकलण्यात आले आहेत.

असे असेल नवे वेळापत्रक

  • पहिला एकदिवसीय सामना – 18 जुलै
  • दुसरा एकदिवसीय सामना –  20 जुलै
  • तिसरा एकदिवसीय सामना – 23 जुलै
  • पहिला टी-20 सामना –  25 जुलै
  • दुसरा टी-20 सामना –  27 जुलै
  • तिसरा टी-20 सामना –  29 जु

हे ही वाचा :

भारत-श्रीलंका मालिकेपूर्वीच ‘हा’ दिग्गज घेतोय निवृत्ती, 90 टेस्‍ट आणि 218 वनडे खेळलेल्या खेळाडूची मोठी घोषणा

Sri Lanka Tour : भारतीय संघाचा सराव जोमात सुरु, आपआपसांत सामना खेळून रणनीती मजबूत करण्याचे काम सुरु, पाहा फोटो

भारताचा धाकड अष्टपैलू क्रिकेटर पुन्हा मैदानावर अवतरणार, श्रीलंकेत करणार पुनरागमन

(Indian Players on Sri lanka Tour did PhotoShoot Before Matches BCCI Shares Video)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI