भारत-श्रीलंका मालिकेपूर्वीच ‘हा’ दिग्गज घेतोय निवृत्ती, 90 टेस्‍ट आणि 218 वनडे खेळलेल्या खेळाडूची मोठी घोषणा

भारताचे युवा भारतीय क्रिकेटपटू असणारी भारतीय टीम श्रीलंका दौऱ्यावर गेली आहे. दोन्ही संघ मर्यादीत षटकांच्या सामन्यांसाठी सज्ज झाले असून यापूर्वीच एक मोठी बातमी समोर आली आहे.

भारत-श्रीलंका मालिकेपूर्वीच 'हा' दिग्गज घेतोय निवृत्ती, 90 टेस्‍ट आणि 218 वनडे खेळलेल्या खेळाडूची मोठी घोषणा
एंजेलो मैथ्‍यूज
Follow us
| Updated on: Jul 07, 2021 | 1:27 PM

कोलंबो : भारतीय क्रिकेट युवा खेळाडू असलेली तरुण तडफदार भारतीय टीम कर्णधार शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्त्वाखाली श्रीलंका सर करण्यासाठी सज्ज झाली आहे. श्रीलंका दौऱ्यावर 13 जुलै रोजी पहिला एकदिवसीय सामना खेळला जाईल. दरम्यान ही एकदिवसीय मालिका सुरु होण्यापूर्वी श्रीलंकेच्या एका दिग्गज खेळाडू निवृत्ती घेणार असल्याची महिती समोर येत आहे. श्रीलंकेकडून 90 टेस्‍ट, 218 वनडे आणि 78 टी-20 सामने खेळलेल्या या खेळाडूचे नाव आहे एंजेलो मैथ्‍यूज (Angelo Mathews). (Before India vs Sri Lanka Series Angelo Mathews Thinking to Take Retirement from International Cricket Says Reports)

मागील काही काळापासून श्रीलंका क्रिकेट (Sri Lanka Cricket) आणि खेळाडूंमध्ये वाद असल्याची अनेक वृत्त समोर येत आहेत. अनेक खेळाडूंनी याबाबत माहिती दिली आहे. याच पार्श्वभूमीवरील ताज्या माहितीनुसार श्रीलंकेचा दिग्‍गज अष्टैपलू एंजेलो मैथ्‍यूज हा देखील आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणायाचा विचार करत असल्याचं समोर आलं आहे. 34 वर्षीय मैथ्‍यूजने श्रीलंकेकडून एप्रिल 2020 मध्ये आपली अखेरची टेस्ट मॅच खेळली होती. न्‍यूजवायर या वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, मैथ्‍यूजने श्रीलंका क्रिकेटला याबाबतची निवृत्ती घेण्याचा विचार करत असल्याची माहिती दिली आहे.

मैथ्‍यूजची कारकिर्द

एंजेलो मैथ्‍यूजने श्रीलंका संघाकडून 90 टेस्‍ट मध्ये 44.86 च्या सरासरीने  6 हजार 236 धावा केल्या आहेत. ज्यात 11 शतकांसह 36 अर्धशतकांचा समावेश आहे.  नाबाद 200 हा त्याचा सर्वोच्च स्कोर आहे. एकदिवसीय सामन्यांचा विचार करता एंजेलोने 218 वनडेमध्ये 41.67  च्या सरासरीने 3 शतक आणि 40 अर्धशतकांच्या मदतीने 5 हजार 835 रन्स केले आहेत. मैथ्‍यूजने 78 टी-20 सामन्यात 25.51 च्या सरासरीने 5 अर्धशतक ठोोकत 1 हजार 148 रन्स केले आहेत. यासोबतच गोलंदाजीमध्ये मैथ्‍यूजने टेस्‍टमध्ये  33, वनडेमध्ये 120 आणि टी-20 मध्ये 38 विकेट्स पटकावले आहेत.

हे ही वाचा :

IND vs SL : राहुल द्रविड देतोय युवा खेळाडूंना धडे, श्रीलंकेवर विजयासाठी भारतीय संघाचा सराव, बीसीसीआयने शेअर केला Videoभारतीय क्रिकेटर्सना अच्छे दिन, मॅच फी वाढवण्याचा BCCI चा निर्णय, पाहा आता किती पैसे मिळणार?

भारताचा धाकड अष्टपैलू क्रिकेटर पुन्हा मैदानावर अवतरणार, श्रीलंकेत करणार पुनरागमन

IND vs SL : कुरवीला आणि मोहंती टीम इंडियासोबत श्रीलंका दौऱ्यावर, नेमकं कारण काय?

(Before India vs Sri Lanka Series Angelo Mathews Thinking to Take Retirement from International Cricket Says Reports)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.