AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता Google Photos मोफत वापरता येणार नाही, अनलिमिटेड स्टोरेज ऑफर बंद

आता गुगल फोटोज वापरण्यासाठी पैसे द्यावे लागणार आहेत. कंपनीने त्यांच्या सर्व युजर्सना याबाबत एक अधिकृत मेल पाठवला आहे,

आता Google Photos मोफत वापरता येणार नाही, अनलिमिटेड स्टोरेज ऑफर बंद
Google Photos
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: May 08, 2021 | 6:05 PM
Share

कॅलिफोर्निया : तुम्ही जर तुमचे फोटो आणि व्हिडीओज गुगल फोटोजवर (Google Photos) सेव्ह करुन ठेवत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कारण आता गुगल फोटोज वापरण्यासाठी पैसे द्यावे लागणार आहेत. कंपनीने त्यांच्या सर्व युजर्सना सहा महिन्यांपूर्वी याबाबत एक मेलदेखील पाठवला होता, कंपनीने पाठवलेल्या मेलमध्ये म्हटलं होतं की, तुम्ही गुगल फोटोज अ‍ॅपमध्ये अपलोड केलेले कोणतेही फोटो तुमच्या अकाऊंटसोबत दिलेल्या 15 जीबी स्टोरेज स्पेसमध्ये काऊंट होतील. (Google Photos will no longer be free from 1st june 2021)

मेलमध्ये पुढे नमूद केलं आहे की, 1 जून 2021 पासून हाय क्वालिटीमध्ये सेव्ह करण्यात आलेले सर्व नवे फोटो आणि व्हिडीओज गुगल अकाऊंटसह मिळणाऱ्या 15GB स्टोरेज स्पेस किंवा तुम्ही खरेदी केलेल्या अॅडिशनल स्टोरेज स्पेसमध्ये काऊंट केले जातील. कंपनीने गुगलच्या अन्य सर्व्हिसेस जसे की गुगल ड्राईव्ह आणि जीमेलप्रमाणे गुगल फोटोज स्पेसदेखील काऊंट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गुगलची गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेली अनलिमिटेड स्टोरेज ऑफर 31 मे 2021 पासून अस्तित्वात नसेल.

जे युजर्स गुगलवर सक्रिय नाहीत, त्यांच्यासाठी हे नवे धोरण आहे. तसेच जे जी-मेल, ड्राईव्हवर (गूगल डॉक्स, शीट्स, स्लाईड, ड्रॉईंग, फॉर्म आणि जॅमबोर्ड फाईल्स) स्टोरेज कपॅसिटीची लिमीट क्रॉस करत आहेत, त्यांच्यासाठीही हे नवे धोरण लागू होणार असल्याचे कंपनीने यापूर्वीच स्पष्ट केलं आहे.

1 जून 2021 पूर्वीचे फोटोज काऊंट केले जाणार नाहीत

गुगलने म्हटलं आहे की, 1 जून 2021 पूर्वी अपलोड केलेले कोणतेही फोटोज, व्हिडीओज काऊंट केले जाणार नाहीत. दरम्यान, असं म्हटलं जात आहे की, कंपनी त्यांच्या पेड सर्व्हिसेसना वाढवण्याच्या तयारीत आहे. त्यादृष्टीने कंपनीने हा निर्णय घेतला आहे. सध्या कंपनी Google One द्वारे पेड सर्व्हिसेस पुरवत आहे.

स्टोरेज क्षमतेची माहिती दिली जाणार

कंपनीने पाठवलेल्या ई-मेलमध्ये म्हटलं आहे की, आम्ही हा निर्णय विचार करुन घेतला आहे. हा एक मोठा बदल आहे. परंतु असे बदल करत असताना आम्ही तुम्हालाही यात सामील करुन घेत आहोत. आम्ही तुमच्या मदतीसाठी एक नवं टूल जनरेट करत आहोत. या टूलद्वारे तुम्हाला माहिती मिळत राहील की, तुम्ही किती स्टोरेज स्पेस वापरली आहे. हे टूल तुम्हाला तुमचे फोटोज, व्हिडीओ आणि अन्य कॉन्टेंटच्या बॅकअपच्या हिशेबाने माहिती देत राहील.

गुगलची नवी पॉलिसी; मेल, फोटो, व्हिडिओ डिलीट होणार

सतत अपडेट असलेल्या गुगलने आपल्या ग्राहकांसाठी नवीन पॉलिसी (Google Might Delete Your All Content ) आणण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 1 जूनपासून ही पॉलिसी लागू करण्यात येणार आहे. त्यानुसार दोन वर्षांपासून इनअॅक्टिव्ह असलेले अकाऊंट्स डिलीट करण्याचा निर्णय गुगलने घेतला आहे. ज्या ग्राहकांचे अकाउंट गेल्या दोन वर्षांपासून वापरात नाही. त्यांचे जीमेल आणि गुगल ड्राइव्ह डिलीट होणार असल्याने ग्राहकांचे फोटो, व्हिडीओ आणि महत्त्वाचे मेसेजही डिलीट होणार आहेत

गूगल वन सर्व्हिस

Google One कंपनीचा पेड मेंबरशीप प्लॅन आहे. याचा वापर तुम्ही स्टोरेज वाढवण्यासाठी तसेच, फोन बॅकअपसाठी करु शकता. त्याशिवाय, यामध्ये तुम्हाला वेगवेगळे गूगल एक्सपर्ट्स आणि फॅमिली शेअरिंगचा एक्सेस देखील मिळतो. नुकतीच गूगलने VPN सुविधा सुरु केली आहे. त्याशिवाय, कंपनीने प्रो सेशनची सुरुवातही केली आहे. या माध्यमातून मेंबर्स गूगल एक्सपर्टसोबत वन-टू-वन संपर्क साधू शकतात, असंही कंपनीने स्पष्ट केलं.

इतर बातम्या

बोंबला! PUBG खेळण्यासाठी मोबाईल नंबरसह पालकांची परवानगी आवश्यक, गेमर्समध्ये नाराजी

स्वस्तातला 5G फोन हवाय? Xiaomi चे दोन स्मार्टफोन लाँचिंगच्या मार्गावर

(Google Photos will no longer be free from 1st june 2021)

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?