AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PhonePe आणि Google Pay खाते सहज तयार करायचं… पण कसं? जाणून घ्या….

सध्या भारतात डिजिटल पेमेंटच युग आहे, पण तुम्ही अजूनही PhonePe किंवा Google Pay वापरत नाही? UPI पेमेंट इतकं सोपं असू शकतं, हे तुम्हाला माहीत आहे का? फक्त एक अ‍ॅप डाउनलोड करा, आणि सुरू होते एक सोपी पण महत्त्वाची प्रक्रिया. तुमचा मोबाइल नंबर – जो बँकेशी लिंक आहे – टाका, OTP टाका आणि अ‍ॅपला आवश्यक परवानग्या द्या. मग काय? अ‍ॅप तुमचं बँक खाते ओळखेल आणि डेबिट कार्डच्या काही माहितीसह तुम्ही UPI पिन सेट करू शकता.

PhonePe आणि Google Pay खाते सहज तयार करायचं... पण कसं? जाणून घ्या....
Google PayImage Credit source: tv9 marathi
साक्षी कणसे
साक्षी कणसे | Edited By: | Updated on: Apr 11, 2025 | 4:28 PM
Share

सध्याच्या काळात भारतामध्ये डिजिटल पेमेंटचा वापर झपाट्याने वाढत आहे. चहाच्या टपरीपासून ते मोठमोठ्या शॉपिंग मॉलपर्यंत सर्वत्र UPI पेमेंटसाठी QR कोड लावलेले दिसतात. त्यामुळे PhonePe आणि Google Pay सारख्या अ‍ॅप्सद्वारे ऑनलाइन पेमेंट करणे आवश्यक बनले आहे. या लेखात आपण PhonePe आणि Google Pay मध्ये खाते कसे जोडायचे आणि UPI आयडी कसा तयार करायचा हे पाहणार आहोत.

स्टेप-१

PhonePe आणि Google Pay वर खाते आणि UPI आयडी तयार करण्याची प्रक्रिया साधारणपणे एकसारखीच असते. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला Google Play Store किंवा Apple App Store वर जाऊन PhonePe किंवा Google Pay हे अ‍ॅप डाऊनलोड करावे लागेल. म्हणजेच, जर तुम्ही अँड्रॉइड युजर असाल तर Google Play Store वापरावा, आणि जर आयफोन युजर असाल तर Apple App Store चा उपयोग करावा.

स्टेप-२

अ‍ॅप डाउनलोड आणि इंस्टॉल केल्यावर, ते उघडा आणि आपला मोबाइल नंबर टाका. लक्षात ठेवा की तुम्ही जो नंबर टाकता तोच नंबर तुमच्या बँक खात्याशी जोडलेला असावा, कारण PhonePe किंवा Google Pay हे अ‍ॅप्स त्या नंबरचा वापर करून तुमचे खाते व्हेरिफाय करतात.

स्टेप-३

तुमचा मोबाइल नंबर टाकल्यानंतर, तुम्हाला SMS द्वारे एक OTP (वन टाइम पासवर्ड) मिळेल. तुमचा मोबाइल नंबर व्हेरिफाय करण्यासाठी तो OTP टाका आणि पुढे जा. व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर अ‍ॅपमध्ये तुमची पसंतीची भाषा निवडा आणि SMS, कॉन्टॅक्ट्स आणि लोकेशनसारख्या अ‍ॅक्सेसला परवानगी द्या.

स्टेप-४

यानंतर तुम्हाला तुमचे बँक खाते अ‍ॅपमध्ये जोडावे लागेल. PhonePe/Google Pay अ‍ॅप तुम्हाला सपोर्ट करणाऱ्या बँकांची यादी दाखवेल. त्या यादीतून तुमची बँक निवडा, आणि अ‍ॅप तुम्ही आधी व्हेरिफाय केलेल्या मोबाइल नंबरचा वापर करून तुमचे बँक खाते आपोआप शोधून काढेल. जर सर्व माहिती जुळत असेल, तर तुमचे खाते ओळखले जाईल आणि तुम्ही UPI पिन सेट करण्यासाठी पुढे जाऊ शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या डेबिट कार्डची गरज भासेल.

स्टेप-५

आता तुम्हाला तुमच्या डेबिट कार्डच्या शेवटच्या ६ अंकांची संख्या आणि कार्डची एक्सपायरी डेट भरावी लागेल. त्यानंतर बँकेकडून तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एक OTP पाठवला जाईल. हा OTP भरल्यानंतर तुम्ही तुमचा UPI पिन सेट करू शकाल. पुढे जेव्हा जेव्हा तुम्ही PhonePe किंवा Google Pay द्वारे पेमेंट कराल, तेव्हा हाच पिन वापरावा लागेल.

स्टेप-६

एकदा तुमचा UPI पिन सेट झाला की, तुमचे PhonePe/Google Pay खाते पूर्णपणे अ‍ॅक्टिव्ह होईल आणि वापरासाठी सज्ज होईल. आता तुम्ही या अ‍ॅपच्या मदतीने पैसे पाठवू किंवा स्वीकारू शकता, बिलांचे पेमेंट करू शकता, मोबाइल रिचार्ज करू शकता किंवा ऑनलाईन खरेदीही करू शकता.

Follow Us
मतदार यादीतील फेरफारवरून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर साधला निशाणा
उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप: महाराष्ट्रातून दोन कोटी मतदार वगळले, भविष्यात बनावट मतदारांचा धोका
डीजे परवानगीशिवाय वाजवला, पुण्यातील मंडळाला कोर्टाकडून दोषी ठरवून दंड
पुण्यात जुलूसदरम्यान अनधिकृत डीजे; अल मदिना यंग बॉईज सर्कलला कोर्टाचा दणका
जोरदार पावसामुळे दिल्लीतील प्रमुख मार्गांवर पाणी साचले, वाहतूक मंदावली
दिल्लीत मुसळधार पाऊस: सुब्रतो पार्क परिसरात भीषण वाहतूक कोंडी, जनजीवन विस्कळीत
सोनिया गांधी आत्मचरित्र बिलॉन्गिंग हार्परकॉलिन्स इंडिया प्रकाशित करणार
सोनिया गांधींच्या बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव आत्मचरित्राचा मार्ग मोकळा, हार्परकॉलिन्स करणार प्रकाशन
नागपूरनंतर आता सोलापूर आणि संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
नागपूरनंतर आता सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
गद्दार कोण आणि... हे जनतेनं दाखवलं, सरनाईकांचा विरोधकांना टोला
Pratap Sarnaik | गद्दार कोण आणि खुद्दार कोण हे जनतेनं दाखवलं, प्रताप सरनाईकांचा विरोधकांना टोला
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा भुजबळांना थेट इशारा
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना थेट इशारा
परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? बापटांचा सवाल
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? विद्यानंद बापटांचा धंगेकरांना थेट सवाल
जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा..
Satej Patil on Manoj Jarange Protest | जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा थेट इशारा; मराठा आरक्षणावरून सरकारवर घणाघात
पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर-बापट यांच्यात खडाजंगी
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर- विद्यानंद बापट यांच्यात खडाजंगी,  व्हिडीओ बघाच