AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुगल हिस्ट्री कशी डिलीट कराल? सोप्या ट्रिक्स; त्यामुळे मोठा धोका…

अगर आप भी गूगल का यूज करते हैं तो ये ट्रिक जानना आपके लिए जरूरी है. आपकी गूगल हिस्ट्री कोई भी देख सकता है. इससे बचने के लिए आपको पता होना चाहिए कि गूगल हिस्ट्री कैसे डिलीट करते हैं. इसके लिए आपको इन स्टेप्स को फॉलो करना चाहिए.

गुगल हिस्ट्री कशी डिलीट कराल? सोप्या ट्रिक्स; त्यामुळे मोठा धोका...
| Edited By: | Updated on: Jan 04, 2025 | 3:24 PM
Share

गुगलमध्ये एखादी गोष्ट सर्च केल्यानंतर आपण ती गोष्ट डिलीट करतो. पण ती गोष्ट खरोखरच डिलीट झालेली असते का? गुगलची सर्च हिस्ट्री कशी डिलीट करायची हा प्रश्न आपल्याला पडतो. पण तुम्ही Google Search History काही मिनिटांत डिलीट करू शकता. जर तुम्ही तुमची Google Search History डिलीट केली नाही, तर डेटा म्हणून कायम सेव्ह राहील. त्यामुळे, जर तुमची गुगल हिस्ट्री उघडली गेली, तुम्ही दिवसभरात काय शोधलंत हे दुसरे लोक सहजपणे पाहू शकतात. यामुळे तुमची गोपनीयता धोक्यात येऊ शकते. म्हणून, गुगल हिस्ट्री डिलीट करणे महत्त्वाचे आहे.

लॅपटॉपवरून Google Search History कशी डिलीट कराल :

तुमच्या संगणकावर Chrome ब्राउझर उघडा.

ब्राउझरच्या कोपऱ्यातील More Option वर क्लिक करा.

नंतर History पर्यायावर क्लिक करा.

तुम्हाला जे हिस्ट्री हटवायचं आहे, त्याच्या समोर असलेल्या बॉक्सवर टाक करा.

आता, उजव्या बाजूस दिसणाऱ्या Delete पर्यायावर क्लिक करा.

फोन किंवा टॅबलेटवरून हिस्ट्री कशी डिलीट कराल :

तुम्ही तुमच्या Android स्मार्टफोनवरून गुगल हिस्ट्री डिलीट करू शकता.

यासाठी, गूगल अॅप्लिकेशन उघडा.

नंतर, Search History वर क्लिक करा.

आता, Delete My Activity पर्यायावर क्लिक करा.

त्यानंतर, एक विशिष्ट तारीख निवडा आणि त्या कालावधीत Delete Activity क्लिक करून हिस्ट्री डिलीट करा.

Google App मध्ये, तुमच्या प्रोफाइल चित्रावर क्लिक करा :

गुगल अॅपमधील प्रोफाइल चित्रावर क्लिक करा.

नंतर Search History मेनू निवडा.

आता Delete all पर्याय निवडा.

यामुळे तुमची सर्व Google Search History एका क्लिकवर डिलीट होईल.

जर तुम्हाला विशिष्ट दिवसाची Search History डिलीट करायची असेल तर :

त्या दिवसाच्या सर्व Activity वर क्लिक करा.

तुम्हाला All Delete पर्याय दिसेल, ज्याद्वारे तुम्ही त्या दिवसाच्या सर्व शोध इतिहासाला डिलीट करू शकता.

या सर्व स्टेप्सचे अनुसरण करून तुम्ही तुमची गुगल हिस्ट्री सहज डिलीट करू शकता आणि तुमची गोपनीयता सुरक्षित ठेवू शकता.

जर तुम्ही गुगलचा वापर करत असाल तर तुम्हाला त्यातील काही ट्रिक्स समजल्या पाहिजे. तुमची गुगल हिस्ट्री कोणीही पाहू शकतो. त्यामुळे तुम्ही सातत्याने तुमची गुगल सर्च हिस्ट्री डिलीट केली पाहिजे. तुम्ही जर गुगल सर्च हिस्ट्री डिलीट केली नाही तर तुमचे मेसेज कोणीही सहज पाहील आणि तुम्ही दिवसभरात काय शोधलं ते त्यांना कळेल.

Follow Us
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक साद! केली मोठी मागणी
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणें
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणेंसोबतचा फोटो शेअर करत दिला सूचक संदेश!
श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी जोरात! श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
रोहित पवारांचा डेटा सेंटर प्रकल्पाला विरोध; रद्द न केल्यास तीव्र आंदोल
रोहित पवारांचा डेटा सेंटर प्रकल्पाला विरोध; रद्द न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा!
सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त 700 वर्षांपूर्वीचे गंगा गोदावरी मंदिर उघडले
12 वर्षांची प्रतीक्षा संपली! सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त 700 वर्षांपूर्वीचे गंगा गोदावरी मंदिर भाविकांसाठी खुले
शंखांच्या गजराने दुमदुमलं त्र्यंबकेश्वर; गंगा-गोदावरीच्या महाआरतीने...
Nashik Simhastha Kumbh Mela : शंखांच्या गजराने दुमदुमलं त्र्यंबकेश्वर; गंगा-गोदावरीच्या महाआरतीने सिंहस्थ कुंभमेळ्याला सुरुवात
त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! ध्वजारोहण अन्...
त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! ध्वजारोहण अन् गोदावरीच्या महाआरतीने मंगलमय वातावरण