निवडणुकीतील व्हॉट्सअॅप मेसेज खरे की खोटे, कसं ओळखायचं?

मुंबई : देशात सध्या लोकसभा निवडणुकांची धामधूम आहे. यातच खोट्या बातम्या पसरु नये यासाठी व्हॉट्सअॅपने ‘चेकपॉईंट टिपलाईन’ फीचर लाँच केलं. याच्या माध्यमातून व्हॉट्सअॅपवर निवडणुकांसंबंधी येणाऱ्या बातम्या खऱ्या आहेत की खोट्या हे तपासता येणार आहे.  व्हॉट्सअॅपने सांगितलं की, “या सेवेला भारतातील एका मीडिया स्टार्टअप ‘प्रोटो’ने तयार केलं आहे. ही टिपलाईन चुकीची माहिती तसेच अफवांचा डाटाबेस तयार […]

निवडणुकीतील व्हॉट्सअॅप मेसेज खरे की खोटे, कसं ओळखायचं?
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:06 PM

मुंबई : देशात सध्या लोकसभा निवडणुकांची धामधूम आहे. यातच खोट्या बातम्या पसरु नये यासाठी व्हॉट्सअॅपने ‘चेकपॉईंट टिपलाईन’ फीचर लाँच केलं. याच्या माध्यमातून व्हॉट्सअॅपवर निवडणुकांसंबंधी येणाऱ्या बातम्या खऱ्या आहेत की खोट्या हे तपासता येणार आहे.  व्हॉट्सअॅपने सांगितलं की, “या सेवेला भारतातील एका मीडिया स्टार्टअप ‘प्रोटो’ने तयार केलं आहे. ही टिपलाईन चुकीची माहिती तसेच अफवांचा डाटाबेस तयार करण्यात मदत करेल. यामुळे निवडणुकांदरम्यान ‘चेकपॉईंट्स’साठी या महितीची वापर केला जाईल. एक शोध प्रकल्प म्हणून चेकपॉईंट सुरु करण्यात आलं आहे, यामध्ये व्हॉट्सअॅप तांत्रिक मदत देणार आहे.”

देशातील नागरिक त्यांना मिळणाऱ्या चुकीच्या माहितीला किंवा अफवांना व्हॉट्सअॅपच्या +91-9643-000-888 या नंबरवर चेकपॉईंट टिपलाईन पाठवू शकतात. त्यानंतर प्रोटो प्रमाणित केंद्रावर ही माहिती पोहोचवेल. तिथे ही माहिती खरी की, खोटी याबाबत तपास केला जाईल. त्यानंतर वापरकर्त्याला ही माहिती किती खरी आहे याबाबत सांगितलं जाईल.

याद्वारे वापरकर्त्याला त्याच्या व्हॉट्सअॅपवर आलेली माहिती ही खरंच विश्वास करण्यायोग्य आहे का, याची माहिती होईल. प्रोटो फोटो, व्हिडीओ तसेच लिखित मेसेजची तपासणी करण्यात सक्षम आहे. प्रोटो इंग्रजी, हिंदी, तेलुगू, बंगाली आणि मल्याळम या भाषांमधील माहितीची तपासणी करु शकतो.

व्हॉट्सअॅप आणि प्रोटोच्या या पुढाकाराने निवडणुकांच्या काळात मतदारांना भ्रमित करण्यासाठी पसरवण्यात येणाऱ्या खोट्या बातम्यांवर आळा बसण्याची शक्यता आहे.