HP ने लाँच केला HyperX Omen 15 गेमिंग लॅपटॉप, जाणून घ्या उपलब्धता आणि किंमत

Intel Core i7-14650HX प्रोसेसरसह HP चा HyperX Omen 15 हा गेमिंग लॅपटॉप भारतीय बाजारपेठेत लाँच करण्यात आला आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण हा लॅपटॉप कोणत्या साईटवरून तुम्हाला खरेदी करता येणार आहे. तसेच किंमत आणि फिचर्स देखील जाणून घेऊयात.

HP ने लाँच केला  HyperX Omen 15 गेमिंग लॅपटॉप, जाणून घ्या उपलब्धता आणि किंमत
hp-hyperx-omen-15-gaming-laptop
Image Credit source: Tv9 Network
| Edited By: | Updated on: Jan 29, 2026 | 5:40 PM

HP ने मंगळवारी भारतात त्यांचा नवीन HyperX Omen 15 गेमिंग लॅपटॉप लाँच केला, जो CES 2026 मध्ये सादर केलेल्या कंपनीच्या नवीन गेमिंग सिरीजचा भाग आहे. हा भारतातील पहिला HyperX-ब्रँडेड लॅपटॉप आहे. पॉवरफूल Intel Core i7-14650HX प्रोसेसर, नवीनतम RTX 5060 GPU आणि उच्च-रिफ्रेश रेट डिस्प्लेसह, हा लॅपटॉप हार्डकोर गेमर आणि कंटेंट क्रिएटर्सना लक्षात घेऊन डिझाइन केला आहे. HP कंपनीचा दावा आहे की हा लॅपटॉप अधिक गेमिंग सेशंस मध्ये देखील स्थिर आणि सातत्यपूर्ण कामगिरी देईल. चला तर या जबरदस्त लॅपटॉपची किंमत आणि उपलब्धता तसेच स्पेसिफिकेशन बद्दल जाणून घेऊयात.

किंमत आणि उपलब्धता

HP HyperX Omen 15 ची किंमत भारतात 1 लाख 49 हजार 999 रूपयांपासून सुरू होते. हा लॅपटॉप शॅडो ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये तुम्हाला खरेदी करता येणार आहे. कंपनी फ्लिपकार्ट आणि निवडक ऑफलाइन रिटेल स्टोअर्सद्वारे ऑनलाइन विक्री करत आहे. HP हा लॅपटॉप प्रीमियम गेमिंग आणि उच्च-कार्यक्षमता असलेल्या वापरकर्त्यांसाठी आहे.

पॉवरफूल डिस्प्ले आणि प्रीमियम डिझाइन

या लॅपटॉपमध्ये 15.3-इंचाचा WQXGA IPS डिस्प्ले आहे ज्याचे रिझोल्यूशन 2560×1600 पिक्सेल आहे. स्क्रीन 180Hz रिफ्रेश रेट, 3ms रिस्पॉन्स टाइम आणि 500 निट्स पर्यंत ब्राइटनेसला सपोर्ट करते. 16:10 आस्पेक्ट रेशो, 100 टक्के sRGB कलर कव्हरेज आणि कमी निळ्या प्रकाशाचा सपोर्ट यामुळे गेमिंग तसेच व्यावसायिक कामासाठी हा लॅपटॉप उत्तम ठरेल.

प्रोसेसर, ग्राफिक्स आणि एआय पॉवर

HP HyperX Omen 15 मध्ये 16 कोर आणि 24 थ्रेड्ससह 14व्या-जनरल इंटेल कोर i7-14650HX प्रोसेसर आहे.

ग्राफिक्स बद्दल बोलायचे झाले तर त्यात 8GB GDDR7 मेमरीसह Nvidia GeForce RTX 5060 लॅपटॉप GPU आहे. लॅपटॉपमध्ये OMEN AI अनलीश्ड मोड आहे, जो अधिक जास्त वेळ गेमिंग सेशंन दरम्यान देखील थ्रॉटलिंग टाळण्यासाठी स्वयंचलितपणे कार्यप्रदर्शन आणि थर्मल नियंत्रण संतुलित करतो.

कीबोर्ड, कनेक्टिव्हिटी आणि बॅटरी

या लॅपटॉपमध्ये 4-झोन आरजीबी लाइटिंगसह पूर्ण आकाराचा आरजीबी कीबोर्ड, 26-की अँटी-घोस्टिंग आणि 8के पोलिंग रेट टेक्नॉलॉजी आहे. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये वाय-फाय 6, ब्लूटूथ 5.4, यूएसबी टाइप-सी, एचडीएमआय 2.1 आणि इथरनेट पोर्ट यांचा समावेश आहे. यात 70Wh बॅटरी आहे जी जलद चार्जिंग सपोर्टसह येते, जी सुमारे 30 मिनिटांत 50 टक्के चार्ज होतो.