Netflix वर 13 वर्षे जुना चित्रपट चर्चेत; मनोरंजनाचा फुल पॅकेज आहे हा 2 तास 14 मिनिटांचा सिनेमा
सध्या नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर जुन्या तसंच नव्या चित्रपटांचा दबदबा पहायला मिळतोय. यादरम्यान 13 वर्षे जुना एक चित्रपट नेटफ्लिक्सवर दाखल झाला असून प्रेक्षक पुन्हा एकदा त्याचा आनंद घेत आहेत. यामध्ये शाहरुख खान, दीपिका पादुकोण यांच्या मुख्य भूमिका आहेत.

2013 मध्ये हिंदी सिनेसृष्टीत एक अत्यंत उत्तम रोमँटिक कॉमेडी चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट जवळपास महिनाभरापेक्षाही जास्त काळ थिएटरमध्ये टिकून राहिला होता. या चित्रपटाने दमदार कथा, उत्तम दिग्दर्शक आणि तगड्या स्टारकास्टच्या जोरावर प्रेक्षक-समीक्षकांची मनं जिंकली होती. इतकंच नव्हे तर कमाईच्या बाबतीतही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. एखाद्या मसालापटासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक असतात, त्या सर्व गोष्टी एकाच पॅकेजमध्ये या चित्रपटातून बघायला मिळतात. आता 13 वर्षे जुना हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर चर्चेत आला आहे. 2 तास 14 मिनिटांचा हा चित्रपट सध्या ओटीटीवर स्ट्रीम होतोय. या चित्रपटाला पुन्हा ऑनलाइन पाहण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत.
ओटीटी प्लॅटफॉर्मवर नेटफ्लिक्सवर नुकतीच एक नवीन गोष्ट पहायला मिळतेय. या प्लॅटफॉर्मवर फक्त नवीन चित्रपट आणि वेब सीरिजच नाही तर जुने थ्रिलर, कॉमेडी, रंजक चित्रपटसुद्धा पुन्हा स्ट्रीम होत आहेत. याच यादीत या 13 वर्षे जुन्या चित्रपटाचा समावेश झाला आहे. ज्या चित्रपटाबद्दल आम्ही इथे बोलत आहोत, त्यामध्ये एका अशा तरुणाची कथा दाखवण्यात आली आहे, जो त्याच्या मित्रासोबत गोव्याला फिरायला जातो. परंतु त्या प्रवासादरम्यान त्याच्यासोबत असं काही घडतं, की तो थेट दक्षिण भारतात येऊन पोहोचतो. तिथे तो एका तरुणीमध्ये संकटात सापडतो. पुन्हा घरी जाण्याचा तो असंख्य प्रयत्न करतो, परंतु त्यात त्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यामध्ये असे अनेक सीन्स आहेत, जे पाहून तुम्ही पोट धरून हसाल. यासोबतच या चित्रपटात रोमान्स आणि अॅक्शनचाही तडका आहे. या चित्रपटात शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.
रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटाचं नाव आहे ‘चेन्नई एक्स्प्रेस’. नेटफ्लिक्सवर हा चित्रपट मस्ट वॉच मूव्ही म्हणून चर्चेत आला आहे. शाहरुख आणि दीपिका यांचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. या चित्रपटाने भारतात तब्बल 227 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. यामध्ये शाहरुख, दीपिकासोबतच निकितीन धीर, लेख टंडन, कामिनी कौशल, मनोरमा, मुकेश तिवारी, सत्यराज यांच्याही भूमिका आहेत.
