AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक नेमकं काय आहे? विधानसभेत फडणवीसांनी दिली A टू Z माहिती

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडलं आहे. या विधेयकावर विधानसभेत चर्चा सुरू आहे. हे विधेयक नेमकं काय आहे? याबाबत फडणवीस यांनी माहिती दिली आहे.

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक नेमकं काय आहे? विधानसभेत फडणवीसांनी दिली A टू Z  माहिती
Devendra Fadnavis Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 16, 2026 | 6:29 PM
Share

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडलं आहे. या विधेयकावर विधानसभेत चर्चा सुरू आहे. हे विधेयक नेमकं काय आहे? या विधेयकांतर्गत नेमक्या काय तरतुदी आहेत? याबाबत यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे. धर्मस्वातंत्र्य विधेयक मांडणारे महाराष्ट्र पहिले राज्य नाही, 12 राज्यात ते लागू करण्यात आलं आहे. हे विधेयक कुठल्याही एका धर्मासाठी किंवा धर्माविरुद्ध नाही. हे विधेयक सर्व धर्मांना लागू आहे, असं यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले फडणवीस?

धर्मस्वातंत्र्य विधेयक मांडणारे महाराष्ट्र पहिले राज्य नाही, 12 राज्यात ते लागू करण्यात आलं आहे. हे विधेयक कुठल्याही एका धर्मासाठी किंवा धर्माविरुद्ध नाही. हे विधेयक सर्व धर्मांना लागू आहे. राज्यात अनेक वेळा धर्मांतर मुद्द्यावर, विवाह विषयामुळे कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होते. आता आपल्याकडे जी काय न्याय संहिता आहे, त्यामध्ये त्याबाबत सुस्पष्टता नाही.  मात्र जर  स्पेसिफिक तरतूद असली तर अशा अडचणी निर्माण होत नाहीत.  दोन बाजूंची लोक एकमेकांसमोर येऊन कायदा सुव्यवस्था परिस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून ही तरतूद करण्यात आली आहे.

हे राज्याच्या अधिकार कक्षेत येते म्हणून राज्याने कायदा करावा असे केंद्राने सांगितले आहे. १९६८ पासून हे कायदे झाले आहेत.  बळजबरी, फसवणूक व बेकायदेशीर धर्मांतरापासून संरक्षण करण्यासाठी हे विधेयक आहे. नागरिकांचे रक्षण करण्यासाठी हे विधेयक आणले आहे. या विधेयकात व्याख्या स्पष्ट केल्या आहेत, ज्यामध्ये आमीष, जबरदस्ती, लबाडी, बळजबरी किंवा अल्पवयीन असेल, अशा धर्मांतराला या विधेयकात बेकायदेशीर धर्मांतर ठरवण्यात आलं आहे. अशा पद्धतीने कोणी वागू नये म्हणून या विधेयकात तरतुदी करण्यात आल्या आहेत.  या तरतुदीचं उल्लंघन करून जर धर्मांतर झालं तर ती व्यक्ती किंवा संस्था जे यात सामील असतील त्याप्रमाणे ते शिक्षेस पात्र असतील असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसेच हे धर्मांतर झालं असं मानलं जाणार नाही, हे देखील यावेळी फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.

बेकायदेशीर धर्मांतर करून लग्न होतात.  त्यानंतर काय करायचे याबाबत न्यायालयाने वेळोवेळी निर्णय दिले आहेत.  त्यानुसार तरतूद केली आहे, बेकायदेशीर धर्मांतराद्वारे केलेला विवाह रद्द घोषित केला जाईल.  त्यातून जन्माला आलेलं बालक हा आई ज्या पूर्वाश्रमीच्या धर्माची असेल तो मुलगा त्याच धर्माचा मानला जाईल. वडिलांकडे उत्तराधिकार मिळवण्याचा हक्क मात्र त्याचा कायम असेल.  तसेच पोटगीसाठी ते हक्कदार असतील. बाळाचा ताबा मात्र आईकडे असेल, असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Follow Us
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते...
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते नागपूरमध्ये AI लॅबचे भव्य उद्घाटन
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं...
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं आव्हान, थेट कोर्टात...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट म्हणाले, शिंदेंनी त्यांच्या नेत्यांना...
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या पुढाऱ्याने अखेर सांगितलंच
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता म्हणाला..
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील...
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील पवारांच्या नेत्याचा भाजपला पाठिंबा?
संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
Pune | संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा देशभराचं लक्ष वेधणार?
थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत...
Eknath Shinde | थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत खडाजंगी
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा...
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा भलामोठा फोटो पाहून राऊत संतापले