AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar plane crash : अजितदादांच्या विमानाचा अपघात कसा झाला? शेवटच्या क्षणी नेमकं काय घडलं? धक्कादायक माहिती समोर

अजित पवार यांच्या विमानाचा बुधवारी भीषण अपघात झाला, या अपघातामध्ये अजित पवार यांचं निधन झालं, दरम्यान अपघाताच्या शेवटच्या क्षणी तिथे नेमकं काय घडलं? याबाबत आता नवी माहिती समोर आली आहे.

Ajit Pawar plane crash : अजितदादांच्या विमानाचा अपघात कसा झाला? शेवटच्या क्षणी नेमकं काय घडलं? धक्कादायक माहिती समोर
अजित पवारांचा विमान अपघात Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 29, 2026 | 8:23 PM
Share

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा बुधवारी भीषण अपघात झाला, या अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान अपघाताच्या शेवटच्या क्षणी नेमकं काय घडलं होतं? याबाबत आता माहिती समोर आली आहे. अजित पवार यांच्या विमानाच्या पायलटनं शेवटच्या क्षणी एटीसीला प्रतिसादच दिला नाही, असं नागरी हवाई उड्डाण मंत्रालयानं म्हटलं आहे, याबाबत नागरी हवाई उड्डाण मंत्रालयानं एक प्रसिद्ध पत्रक जारी केलं आहे. अजित पवार यांच्या विमानाचं कंट्रोल हवेतच सुटल्याचं सीसीटव्हीमधून स्पष्ट झालं आहे. नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाच्या स्पष्टीकरणानुसार अपघाताच्या शेवटच्या क्षणी पायलटने एटीसीला प्रतिसादच दिला नाही. विमानानं सकाळी 8 वाजून 18 मिनिटांनी बारामती विमानतळापासून 30 नॉटिकल मैलावर असताना बारामती एटीसी सोबत संपर्क साधला होता. बारामती एटीसी नं त्यांना व्हीएमसी कंडिशन म्हणजेच दृश्य हवामान परिस्थितीनुसार लँडिंग करण्याचा सल्ला दिला.

दरम्यान त्यानंतर पायलटनं बारामती एटीसीला वाऱ्याचा वेग आणि दृश्यमानतेबद्दल विचारलं. त्यानंतर एटीसीने पायलटला वारं शांत असल्याचं आणि तीन हजार मीटरपर्यंत दृश्यमानता असल्याचं सांगितलं, त्यानंतर पायलटनं आपण लँडिंगसाठी तयार आहोत, मात्र रनवे दिसत नाही, असं सांगितलं. पायलटनं त्यानंतर लँडिंग रद्द करुन विमान पुन्हा हवेत नेलं. विमानानं विमानतळाजवळ एक घिरटी मारली, त्यानंतरही बारामती एटीसी आणि वैमानिकात संवाद सुरुच होता.

विमान घिरटी मारुन पुन्हा आल्यानंतर पायलटनं पुन्हा आपण लँडिंगसाठी तयार आहोत, मात्र रन वे दिसत नसल्याचं सांगितलं. रन वे दिसेन तेव्हा सांगेन असं पायलट म्हणाला. काही सेकंदानंतर पायलटनं रनवे दिसत असल्याचं सांगितलं. त्यानंतर आठ वाजून 43 मिनिटांनी विमानाला लँडिंगची परवानगी देण्यात आली. पण त्यानंतर पायलटनं एटीसीला कसलाही प्रतिसाद दिला नाही. सर्वसाधारणपणे एटीसी नं लँडिंगची परवानगी दिली तर पायलट समोरुन प्रतिसाद देतो. पायलटला संदेश समजाला आहे की नाही? हे तो एटीसीला सांगतो. पण अजितदादांच्या विमानाच्या पायलटनं एटीसीला कोणताही प्रतिसाद दिला नाही, अन् त्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये हा अपघात झाल्याचं नागरी हवाई उड्डाण मंत्रालयानं  जारी केलेल्या प्रसिद्ध पत्रकात म्हटलं आहे.

Follow Us
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, बंगाल...
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, नेमकं प्रकरण काय?
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठवताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट.... बंगालमध्ये राजकीय हालाचाली वाढल्या?
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी