57 मिनिटात चार्जिंग, 425 किमी चालण्याची क्षमता, Hyundai ची दमदार कार

| Updated on: Jul 09, 2019 | 4:23 PM

Electric SUV Hyundai KONA भारतात अखेर लाँच झाली आहे. ही गाडी 50 किलोवॅट DC फास्ट चार्जरने फक्त 57 मिनिटांत फूल चार्ज होते.

57 मिनिटात चार्जिंग, 425 किमी चालण्याची क्षमता, Hyundai ची दमदार कार
Follow us on

मुंबई : Electric SUV Hyundai KONA भारतात अखेर लाँच झाली आहे. या गाडीची एक्स-शोरुम किंमत 25.30 लाखापासून सुरु होते, या किमतीत वाढही होऊ शकते. या गाडीची विशेषता म्हणजे चार्जिंग.  Electric SUV Hyundai KONA ही 50 किलोवॅट DC फास्ट चार्जरने फक्त 57 मिनिटांत फूल चार्ज होते. याला नॉर्मल AC सोर्सने चार्ज केल्यास फूल चार्ज होण्यासाठी 6 तास 10 मिनिटं लागतात.

Electric SUV Hyundai KONA या गाडीसोबत कंपनी होम चार्जरही देत आहे. Hyundai च्या शोरुममध्ये सध्या हे चार्जिंग पॉईंट लावले जातील. देशातील चार बड्या शहरांमध्ये इंडियन ऑईलच्या पेट्रोल पंपावरही याचे चार्जिंग स्टेशन असतील. त्यामुळे ग्राहकांना गाडी चार्ज करण्यास कुठलीही समस्या येणार नाही. Hyundai KONA ला एकदा फूल चार्ज केलं, की ही गाडी तब्बल 425 किलोमीटर धावेल.

या गाडीमध्ये वन स्पीड ऑटोमॅटीक गिअरबॉक्स देण्यात आला आहे. पण यात मॅनुअली गिअर बदलण्याचं सिस्टीम देण्यात आलेलं नाही. ही गाडी एसयूव्ही ईको, कम्फर्ट आणि स्पोर्ट म्हणजेच तीन ड्राईव्ह मोडमध्ये उपलब्ध आहे. सुरक्षेच्या दृष्टीने यामध्ये 6 एअरबॅग लागलेले आहेत. तसेच, या गाडीत हिल असिस्ट, डिस्क ब्रेक, व्हर्चुअल इंजिन, साऊंड सिस्टीम सारखे फीचर्सही देण्यात आले आहेत. यामध्ये 100 किलोवॅटच्या मोटरसोबत  फ्रन्ट व्हिल ड्राई देण्यात आलं आहे. 131 Bhp पावरसोबत ही गाडी 9.7 सेकंदांमध्ये 0 ते 100 इतका वेग धरु शकते, असा दावा कंपनीने केला आहे.

KONA च्या समोरील बाजुला एलईडी-डे टाईम रनिंग लाईट लावण्यात आली आहे. तसेच यामध्ये माऊंटेड हेड लॅम्प देण्यात आले आहेत. या गाडीचं इंटिरिअरही विशेष आहे. यामध्ये ड्रायव्हिंग मोडसोबतच 8 इंचाचा टचस्क्रिन इन्फोटेनमेंट सिस्टीमही दिलं जात आहे. मोबाईल चार्ज करण्यासाठी यामध्ये व्हायरलेस चार्जिंग सिस्टीम दिलेलं आहे. त्याशिवाय, लेदर सीट, इलेक्ट्रीक सन रुफ, इलेक्ट्रीक पार्किंग ब्रेक, अॅपल कार प्ले आणि अँड्रॉईड ऑटोसारखे फीचर्सही देण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या :

Triumph कंपनीची Rocket 3 TFC ही बाईक लाँच, किंमत तब्बल…

जूनमध्ये 7 सीटर वॅगन आर कारचं लाँचिंग, पाहा किंमत…

डुकाती बाईकच्या खरेदीवर तब्बल 6 लाखांची सवलत, मर्यादित ऑफर

मुंबईत सचिनच्या हस्ते BMW लाँच, किंमत तब्बल…