फोन स्टोरेज वारंवार भरतोयं तर ‘या’ पद्धतीने मिळवा मोफत 2TB क्लाउड स्टोरेज

जिओ त्यांच्या MyJio ॲपद्वारे निवडक रिचार्ज प्लॅनवर गुगल जेमिनी प्रो चे मोफत सबस्क्रिप्शन देत आहे. या ऑफरमध्ये २TB क्लाउड स्टोरेज देखील समाविष्ट आहे, ज्यामुळे वापरकर्ते त्यांचे फोन स्टोरेज मोकळे करू शकतात. हे फीचर क्लाउडमध्ये मोठ्या फाइल्स, फोटो आणि व्हिडिओ सुरक्षितपणे स्टोअर करण्यास मदत करते. ज्या वापरकर्त्यांचा फोन स्टोरेज वारंवार भरतो त्यांच्यासाठी हे अत्यंत फायदेशीर आहे, ज्यामुळे डेटा वारंवार डिलीट करण्याचा त्रास कमी होतो.

फोन स्टोरेज वारंवार भरतोयं तर या पद्धतीने मिळवा मोफत 2TB क्लाउड स्टोरेज
phone-storage
Image Credit source: Tv9 Network
| Edited By: | Updated on: Jan 30, 2026 | 2:13 PM

स्मार्टफोन हा आपल्या जगण्याचा ए‍क अविभाज्य भाग झाला आहे. मात्र अनेकदा इंटरनल स्टोरेज फुल झाल्यास फोन स्लो होतो. तुमच्या फोनवरील सतत येणाऱ्या “स्टोरेज फुल” नोटिफिकेशन्समुळे तुम्ही व्हिडीओ आणि फोटो डिलीट करून कंटाळला आहात? त्यातसोबतच तुमच्या फोनमध्ये फोटो, व्हिडिओ किंवा महत्त्वाच्या फाइल्ससाठी जागा शिल्लक नसेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. जिओ त्यांच्या MyJio ॲपद्वारे काही रिचार्ज प्लॅनवर वापरकर्त्यांना मोफत गुगल जेमिनी प्रो सबस्क्रिप्शन देत आहे.

कंपनी या सबस्क्रिप्शनसह कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय 2TB क्लाउड स्टोरेज देखील देत आहे. याचा अर्थ असा की या ऑफरसह तुम्ही तुमच्या स्मार्टफोनची स्टोरेज स्पेस वाढवून मोठ्या फाइल्स, फोटो आणि व्हिडिओ क्लाउडवर सुरक्षित ठेवू शकता. चला खास स्टोरेज ऑफरबद्दल अधिक जाणून घेऊयात.

2TB मोफत स्टोरेज कसे मिळवायचे?

रिलायन्स जिओ त्यांच्या MyJio ॲपमध्ये निवडक वापरकर्त्यांना जेमिनी प्रो मोफत ॲक्सेस देत आहे. तर फोनमध्ये ऑफर आधीच एक सक्रिय जिओ पोस्टपेड प्लॅन रिचार्ज केला असला तरी ही खास ऑफर आता ॲपमध्ये दिसत आहे. ही ऑफर कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय उपलब्ध करून दिली जात आहे.

वापरकर्ते MyJio ॲप उघडून आणि ऑफर्स किंवा बेनिफिट्स विभागात जाऊन त्यांच्या अकांउटमध्ये हे सबस्क्रिप्शन सक्रिय करू शकतात. एकदा ही ऑफर सक्रिय झाल्यानंतर, क्लाउड स्टोरेज फोन, टॅब्लेट आणि लॅपटॉपवर सहजपणे वापरता येते.

सर्वप्रथम MyJio ॲप उघडा

आता टॉपवर दिसणाऱ्या Gemini ऑफरवर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला गुगलच्या पेजवर रिडायरेक्ट केले जाईल.

येथे तुम्हाला Google AI Pro सबस्क्रिप्शनशी संबंधित सर्व माहिती मिळेल.

येथून ॲक्टिव्ह प्लॅन पर्यायावर क्लिक करा.

काही मिनिटातंच तुम्हाला मोफत क्लाउड स्टोरेजचा ॲक्सेस दिला जाईल. आणि अशाप्रकारे तुम्ही मोबाईलमध्ये स्टोरेज स्पेस वाढवू शकता.

तुम्हाला तुमच्या फोनचा डेटा पुन्हा पुन्हा डिलीट करावा लागणार नाही

ही ऑफर विशेषतः अशा वापरकर्त्यांसाठी फायदेशीर आहे ज्यांचे फोन स्टोरेज नेहमीच भरलेले असते. जर तुम्ही खूप फोटो आणि व्हिडिओ शूट करत असाल तर ही ऑफर खूप उपयुक्त ठरेल. ज्यांना कामासाठी किंवा अभ्यासासाठी मोठ्या फाइल्स साठवायच्या आहेत त्यांनाही खूप फायदा होऊ शकतो. 2TB स्टोरेजसह वापरकर्त्यांना त्यांच्या फोनमधून वारंवार डेटा डिलीट करण्याची आवश्यकता राहणार नाही.