50MP ट्रिपल कॅमेरा, स्ट्राँग बॅटरीसह Infinix Note 11 स्मार्टफोन बाजारात

| Updated on: Nov 03, 2021 | 2:45 PM

स्मार्टफोन ब्रँड Infinix ने आपला नवीन मोबाईल Infinix Note 11 लॉन्च केला आहे, हा एक ग्लोबल लाँच आहे. या लॉन्च दरम्यान, कंपनीने या फोनचे फीचर्स, स्पेक्सबाबतची माहिती शेअर केली आहे.

50MP ट्रिपल कॅमेरा, स्ट्राँग बॅटरीसह Infinix Note 11 स्मार्टफोन बाजारात
Infinix Note 11
Follow us on

मुंबई : स्मार्टफोन ब्रँड Infinix ने आपला नवीन मोबाईल Infinix Note 11 लॉन्च केला आहे, हा एक ग्लोबल लाँच आहे. या लॉन्च दरम्यान, कंपनीने या फोनचे फीचर्स, स्पेक्सबाबतची माहिती शेअर केली आहे. या फोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सेलचा आहे. कंपनीने गेल्या महिन्यात Infinix Note 11 Pro लाँच केला होता. (Infinix Note 11 smartphone with 50MP triple camera, Strong battery launched in global market, know details)

Infinix Note 11 चे स्पेसिफिकेशन्स

Infinix Note 11 मध्ये 6.7 इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे, जो Waterdrop Notch सह येतो. तसेच, या फोनमध्ये फुल एचडी प्लस रिझोल्यूशन 1080 x 2400 पिक्सेल आहे. या फोनचा पीक ब्राइटनेस 650 nits आहे. त्याचा स्क्रीन टू बॉडी रेशो 91 टक्के इतका आहे. हे डिव्हाईस स्लिम डिझाइनसह येते. तसेच, त्याची जाडी 7.9 मिमी आहे.

Infinix Note 11 चा प्रोसेसर आणि रॅम

Infinix Note 11 Pro मध्ये Helio G96 चिपसेट देण्यात आला आहे, तर Infinix Note 11 मध्ये Helio G88 प्रोसेसर देण्यात आला आहे. हे डिव्हाइस 4GB RAM आणि 64GB इंटर्नल स्टोरेजसह सादर करण्यात आलं आहे. तसेच कंपनीने याचं आणखी एक व्हेरिएंट आणलं आहे ज्यामध्ये 6GB RAM आणि 128GB इंटर्नल स्टोरेज स्पेस देण्यात आली आहे. तसेच, यामध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे, सोबत 33W फास्ट चार्जर देण्यात आला आहे.

Infinix Note 11 चा कॅमेरा सेटअप

Infinix Note 11 च्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर, याच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सलचा आहे, जो f/1.6 अपर्चर सह येतो. यात 2 मेगापिक्सेल बोकेह लेन्स आणि तिसरी एआय लेन्स आहे. तसेच, या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.

Infinix Note 11 जागतिक बाजारपेठेत सादर करण्यात आला आहे, मात्र त्याची किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. हा फोन लवकरच आशियाई आणि आफ्रिकन देशांमध्ये लॉन्च होईल. Celestial Snow, Glacier Green आणि Graphite Black अशा तीन रंगांमध्ये हे डिव्हाईस उपलब्ध आहे.

इतर बातम्या

Twitter:”ट्विटरने लोकांच्या भावनांचा आदर करणे गरजेचं,” दिल्ली उच्च न्यायालयचे आदेश

दिवाळीत अवघ्या 1999 रुपयांत खरेदी करा JIOPHONE NEXT, सोबत सोपे EMI पर्याय

Metaverse म्हणजे काय? Virtual Reality द्वारे जग बदलून Facebook कोणती क्रांती करु पाहतंय?

(Infinix Note 11 smartphone with 50MP triple camera, Strong battery launched in global market, know details)