iPhone च्या चाहत्यांसाठी खूशखबर! ‘या’ तीन स्मार्टफोनच्या किमतीत मोठी कपात

| Updated on: Oct 14, 2020 | 10:54 PM

मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणं बनवणारी अमेरिकेतील मोठी कंपनी असलेल्या अॅप्पलने काल (मंगळवारी) त्यांच्या बहुप्रतीक्षित आयफोन 12 सिरीजचं अनावरण केलं. यामध्ये त्यांनी चार नवे मॉडेल बाजारात आणले आहेत.

iPhone च्या चाहत्यांसाठी खूशखबर! या तीन स्मार्टफोनच्या किमतीत मोठी कपात
iPhone 11: ग्रेट इंडियन फेस्टिव्हलमध्ये अ‍ॅमेझॉन iPhone 11 ला 50,000 किंवा त्यापेक्षाही कमी किंमतीमध्ये विकण्याच्या तयारीत आहे. iPhone 11 हा सध्या 68,300 रुपयांच्या MOP विकला जात आहे. म्हणजेच अ‍ॅमेझॉनमध्ये ग्राहकांना हा स्वस्तात मिळू शकतो. (Photo Credit : Amazon)
Follow us on

मुंबई : मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणं बनवणारी अमेरिकेतील मोठी कंपनी असलेल्या अॅप्पलने काल (मंगळवारी) त्यांच्या बहुप्रतीक्षित आयफोन 12 सिरीजचं अनावरण केलं. यामध्ये त्यांनी चार नवे मॉडेल बाजारात आणले आहेत. Iphone 12 लाँच करताच अॅप्पलने त्यांच्या तीन स्मार्टफोनच्या किमतीत कपात केली आहे. अॅप्पलने iPhone 11, iPhone SE (2020), आणि iPhone XR च्या किमतीत मोठी कपात केली आहे. कंपनीकडून तब्बल 13 हजार रुपयांपर्यंतची कपात जाहीर करण्यात आली आहे.

Iphone 11 च्या किमतीत अॅप्पलने तब्बल 13 हजार 400 रुपयांची कपात केली आहे. आयफोन 11 च्या 64 जीबी स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत आता 54 हजार 900 रुपये इतकी झाली आहे. लाँचिंगच्या वेळी या स्मार्टफोनची किंमत 68 हजार 300 रुपये होती. आयफोन 11 च्या 128 जीबी स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत 59 हजार 900 रुपये इतकी झाली आहे तर 256 जीबी स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत 69 हजार 900 रुपये इतकी झाली आहे.

नवीन iPhone SE च्या किमतीत 2600 रुपयांची कपात करण्यात आली आहे. या कपातीमुळे आयफोन एसईच्या 64 जीबी स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत 39 हजार 900 रुपये इतकी झाली आहे. 128 जीबी स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत 44 हजार 900 रुपये तर 256 जीबी स्टोरेज असलेल्या मॉडलची किमत 54 हजार 900 रुपये इतकी झाली आहे.

Iphone 11 आणि iphone SE प्रमाणे iPhone XR च्या किंमतीतही घट करण्यात आली आहे. iPhone XR च्या किमतीत 4600 रुपयांची घट करण्यात आली आहे. iPhone XR च्या 64 जीबी स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत 47 हजार 900 रुपये तर 128 जीबी स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत 52 हजार 900 रुपये इतकी झाली आहे.

iPhone 11 सीरिजमध्ये खास काय?

iPhone 11 मध्ये तुम्हाला दोन कॅमेरे मिळतात (iPhone 11 series spesifications), तर iPhone 11 Pro आणि iPhone 11 Pro Max मध्ये तीन रिअर कॅमेरे मिळतील. iPhone 11 Pro आणि iPhone 11 Pro Max मधील फरक म्हणजे, Max ची स्क्रिन ही Pro च्या तुलनेत मोठी आहे. या तीनही iPhone मध्ये Apple चा नवा चिपसेट Apple A13 Bionic लावण्यात आला आहे. नेहमीप्रमाणे हा आतापर्यंतचा सर्वात फास्ट आणि चांगला iPhone असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

iPhone 11 चे स्पेसिफिकेशन्स

iPhone 11 हा ब्लॅक (काळा), व्हाईट (पांढरा), लॅवेंडर, रेड (लाल), ग्रीन (हिरवा) आणि येलो (पिवळा) इत्यादी कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे.
iPhone 11 मध्ये 6.1 इंचाचा LCD IPS HD डिस्प्ले देण्यात आला आहे.
या फोनमध्ये A13 बायोनिक प्रोसेसर आहे.
iPhone 11 फास्ट फेस आईडीला सपोर्ट करतो.
iPhone XR च्या तुलनेत iPhone 11 ची बॅटरी एक तास जास्त चालेल, असा दावा Apple ने केला आहे.
हा फोन 30 मिनटांपर्यंत 2 मीटरपर्यंत वॉटर रेजिस्टेंट आहे.
iPhone 11 च्या फ्रंटमध्ये 12 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. तर याच्या बॅकमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. फोनच्या बॅकमध्ये 12-12 मेगापिक्सलचे दोन कॅमरे देण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या

Samsung Galaxy M31 Prime भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन

बॉयकॉट चायनीजचा नुसताच दिखावा, भारतात चिनी मोबाईल्सची तुफान विक्री

भारतात चायनीज वस्तूंच्या विक्रीत वाढ, Mi India कडून 50 लाखांपेक्षा अधिक टीव्हींची विक्री

बहुप्रतीक्षित Samsung Galaxy S20 FE चं प्री-बुकिंग सुरु, आठ हजार रुपयांपर्यंतच्या ऑफर्स

iPhone 11, iPhone 11 Pro आणि iPhone 11 Max लाँच, भारतातील किंमत तब्बल…