क्रोमटास्टिक सेलमध्ये आयफोन 16 वर मोठी सूट, खूपच कमी किमतीत उपलब्ध

क्रोमा क्रोमॅटॅस्टिक डिसेंबर सेल दरम्यान आयफोन 16 वर मोठी सूट मिळत आहे. बँक ऑफर्स आणि एक्सचेंजनंतर कमी किमतीत हा फोन खरेदी करता येणार आहे. चला आजच्या लेखात जाणून घेऊयात ऑफर्सनंतर आयफोन 16 ची किंमत किती स्वस्त झाली आहे...

क्रोमटास्टिक सेलमध्ये आयफोन 16 वर मोठी सूट, खूपच कमी किमतीत उपलब्ध
iphone-16
Image Credit source: TV 9 Marathi
| Edited By: | Updated on: Dec 24, 2025 | 11:28 PM

रिटेल इलेक्ट्रॉनिक्स चेन क्रोमाने त्यांचा खास क्रोमटास्टिक डिसेंबर सेल सुरू केला आहे. हा सेल 15 डिसेंबर ते 4 जानेवारी पर्यंत चालेल. क्रोमाचे ऑफलाइन स्टोअर्स प्रीमियम स्मार्टफोनवर उत्तम डील देत आहेत. तुम्ही जर बऱ्याच दिवसांपासून नवीन आयफोन खरेदी करण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी हा सेल एक उत्तम संधी घेऊन आला आहे.

आयफोन 16 वर मोठी सूट

या सेलमधील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे आयफोन 16 वरील मोठी सूट. आयफोन 16 ची लाँच किंमत सामान्यतः स्टोअरमध्ये 65 हजार 990 रूपये आहे. परंतु बँक ऑफर्स आणि एक्सचेंजचा फायदा घेतल्यास त्याची किंमत सुमारे 40 हजार 990 रूपयापर्यंत येते. याव्यतिरिक्त, निवडक बँक कार्ड पेमेंटवर 3 हजार पर्यंत कॅशबॅक देखील उपलब्ध आहे.

एक्सचेंज ऑफर्सवरही उत्तम डिस्काउंट मिळणार

क्रोमा उत्तम एक्सचेंज डिस्काउंट देखील देत आहे. ग्राहकांना त्यांच्या जुन्या स्मार्टफोनसाठी 16,000 रूपयांपर्यंत एक्सचेंज व्हॅल्यू मिळू शकते, तसेच 6000 पर्यंत एक्सचेंज बोनस देखील मिळू शकतो. एकत्रित केल्यावर आयफोन 16 ची किंमत लक्षणीयरीत्या कमी होते, ज्यामुळे चाहत्यांना तो खरेदी करणे सोपे होते.

A18 प्रोसेसर मिळणार

उल्लेखनीय बाब म्हणजे या आयफोनमध्ये Apple चा A18 प्रोसेसर आहे, जो दैनंदिन कामे, गेमिंग आणि नवीन AI वैशिष्ट्ये सहजतेने हाताळतो. Apple च्या दीर्घकालीन सॉफ्टवेअर सपोर्ट धोरणामुळे या फोनला अनेक वर्षे अपडेट्स मिळत राहतील.

कॅमेरा आणि बॅटरी देखील शक्तिशाली आहेत

कॅमेऱ्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर या आयफोन 16 मध्ये 48 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आणि सुधारित अल्ट्रा-वाइड लेन्स आहे, जे दैनंदिन फोटोग्राफीसाठी चांगले काम करते. शिवाय, बॅटरी ऑप्टिमायझेशन सुधारित केले आहे, ज्यामुळे एकाच चार्जवर फोन खूप वेळ वापरता येतो.

क्रोमाच्या क्रोमटास्टिक डिसेंबर सेलमध्ये आयफोन 16 हा कमी किमतीत प्रीमियम अॅपल फोन मिळवू इच्छिणाऱ्यांसाठी एक उत्तम ऑफर आहे. जर तुम्ही नवीन वर्षाच्या आधी स्मार्टफोन अपग्रेड करण्याची प्लॅन करत असाल तर ही ऑफर नक्कीच उपयोगाची आहे.