iPhone 18 Pro चे भारतीय दिवाणे, रात्रीपासूनच मुंबईत APPLE स्टोअर बाहेर लागली रांग
Apple iPhone 18 Pro: ॲपलचा आयफोन 18 Pro खरेदीसाठी स्टोअरसमोर मोठी गर्दी झाली. आयफोनचे वेड यानिमित्ताने समोर आले. अनेक भारतीय आयफोनचे दिवाणे आहेत हे दिसून आले. रात्रीपासूनच मुंबईसह दिल्लीतील स्टोअरसमोर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा दिसल्या.

ॲपलचा बहुप्रतिक्षित iPhone 18 Pro ची क्रेझ पुन्हा दिसली. दिल्लीसह मुंबईतील ॲपल स्टोअरसमोर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा दिसल्या. काही युझर्सनी तर रात्रीच स्टोअरसमोर मुक्का ठोकला. आयफोनचे भारतीय दिवाणे असल्याचे दिसले. दिल्लीतील साकेतमधील प्रसिद्ध सिलेक्ट सिटीवॉक मॉलमध्ये ॲपल स्टोरबाहेर iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max खरेदीसाठी एकच गर्दी उसळली. ग्राहकांच्या, खरेदीदारांच्या लांबच लांब रांगा दिसल्या. तर खरेदीसाठी पहिल्या दहात येण्यासाठी काहींनी रात्रीच स्टोअरसमोर मुक्काम ठोकला.
पहाटेपासूनच ग्राहक रांगेत
ॲपल स्टोअरबाहेर आज भल्या पहाटेपासूनच लांबच लांब रांगा दिसल्या. अनेक जणांनी रात्र जागून काढली. तर काहींनी भल्या पहाटेच मुंबई आणि दिल्लीतील स्टोअरबाहेर हजेरी लावली. ॲपल स्टोअरमध्ये सकाळी 8 वाजेपासूनच आयफोनच्या अधिकृत विक्रीला सुरुवात होणार आहे. पण त्यापूर्वीच आयफोन प्रेमींनी खरेदीसाठी गर्दी केली. टेक रिव्ह्युअर्स, कंटेंट क्रिएटर्स यांनी तर रात्रीपासूनच या स्टोअरसमोर मुक्काम ठोकला. काही जण भल्या पहाटे या ॲपल स्टोअरसमोर दाखल झाले. ॲपलच्या या नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोनमधील प्रगत कॅमेरा फीचर्स, अपग्रेटेड परफॉर्मन्स आणि नव्या डिझाईनविषयी ग्राहकांमध्ये मोठी उत्सुकता असल्याचे दिसले.
मुंबईत ॲपल स्टोअरसमोर जत्राच भरली
दिल्लीतच नव्हे तर मुंबईतील ॲपल स्टोअरबाहेरही खरेदीदारांची एकच गर्दी दिसली. स्टोअरचे दरवाजे उघडण्यापूर्वीच ग्राहकांची मोठी गर्दी झाली. जणू या स्टोअरसमोर ग्राहकांची जत्राच भरली. अनेक जण रांगेत उभे होते. अनेक ग्राहकांनी आधीच ऑनलाईन प्री-बुकिंग केले होते. ते आता त्यांच्या ड्रिम फोनची डिलव्हरी घेण्यासाठी आणि स्टोअर उघडण्याची वाट पाहत भल्या पहाटेपासून रांगेत उभे आहेत.
iPhone 17 सह iPhone 16 ची नवीन किंमत काय?
iPhone 17 हा भारतात 82,900 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. तर 256GB चे व्हेरिएंट 99900 रुपयांना आहे. 512 जीबी मॉडलसाठी 1 लाख 24 हजार 900 रुपये मोजावे लागतील. कंपनीने बेस व्हेरिएंटमध्ये 17 हजार रुपयांची वाढ केली आहे. iPhone 16 ची किंमत 79,900 रुपये आहे. तर 128GB मॉडेल आता 89900 रुपये इतकी आहे. दोन्ही फोनच्या किंमतीत कंपनीने जवळपास 10 हजार रुपयांची वाढ केली आहे. नवीन आयफोनसह जुन्या मॉडलच्या खरेदीसाठी ग्राहक उत्सुक असल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी रोख रक्कम घेऊन अनेक जण तयार आहेत. तर काही जण ईएमआयचा पर्याय शोधत आहेत.