
इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा काही भरवसा नसतो. आज घेतलेली वस्तूही टिकेल की नाही याची गॅरेंटी नसते. त्यामुळे या वस्तू घेताना काळजी घेणं गजरेचं आहे. कोणताही स्मार्टफोन, घड्याळ किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू घेताना त्याच्या फीचरचा अभ्यास करूनच घेतली जातात. दुकानदारांने सांगितलं आणि घेतलं असं होत नाही. यासाठी त्या डिव्हाईसची शहनिशा केली जाते. तसेच त्याला किती रेटिंग मिळालं आहे याचा अभ्यास केला जातो. यापैकी एक फिचर आपण कायम पाहतो तो म्हणजे वॉटरप्रूफ आहे की वॉटर रेसिस्टंट.. अनेक कंपन्या आपलं प्रोडक्ट वॉटरप्रूफ किंवा वॉटर रेसिस्टंट असल्याचं सांगतात. पण या दोघांमध्ये नेमका फरक काय आहे? हे अनेकांना माहिती नाही. वॉटर रेसिस्टंट मोबाईल पाण्यात टाकू शकतो का? वॉटरप्रूफ म्हणजे पाण्यात पूर्ण सुरक्षित असतो का? असे प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. जर तुम्हालाही असाच प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर तुम्हाला पुढे मिळेल.
वॉटर रेसिस्टंट म्हणजे तुमच्याकडे असलेला डिव्हाईस पाण्यापासून काही अंशी वाचू शकतो. म्हणजेच पूर्णपणे सुरक्षित नाही. दुसरं वॉटरप्रूफ म्हणजे काय? जर तुमचं डिव्हाईस पाण्याच्या आतही गेलं तर त्याला काही नुकसान होतं नाही. त्यामुळे तुमच्या डोक्यात असलेली पहिली शंका दूर झाली. वॉटर रेसिस्टंटपेक्षा वॉटरप्रूफ डिव्हाईस घेणं चांगलं ठरेल. आता वॉटरप्रूफ आणि वॉटर रेसिस्टंट डिव्हाईस कसे तयार होतात? हा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. तर यासाठी कंपन्या आयपी रेटिंग सिस्टमचा वापर करतात. म्हणजेच इनग्रेस प्रोटेक्शनच्या माध्यमातून कळतं डिव्हाईस पाणी आणि धुळीपासून किती सुरक्षित आहे.
जर तुमच्या स्मार्टफोनची रेटिंग आयपी67 आहे. तर तुमचा फोन काही काळ पाण्यात राहू शकतो. पण डिव्हाइसची रेटींग आयपीएक्स8 असेल तर डिव्हाईसला पाण्यात काहीच होणार नाही. मग आता कोणतं डिव्हाइस घेणं फायद्याचं ठरेल. तर ज्यांचं जाणं येणं पाण्याच्या ठिकाणी नाही. अशा लोकांनी वॉटर रेसिस्टंट फोन घ्यायला हरकत नाही. पण जे लोकं स्विमिंग किंवा आसपास पाणी असलेल्या ठिकाणी राहत असतील तर त्यांनी वॉटरप्रूफ डिव्हाइस घ्यावं. पण हे गोष्ट लक्षात ठेवा कोणतंही प्रोडक्ट हे 100 टक्के वॉटरप्रूफ नसतं. पाण्यात दीर्घकाळ राहिलं तर खराब होऊ शकतं.