या कंपन्यांचं सिम वापरत असाल तर पॉर्न साईट चुकूनही पाहू नका

| Updated on: Jun 22, 2021 | 3:12 PM

मुंबई : रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन या दूरसंचार कंपन्यांनी काही प्रमुख पॉर्न साईटवर बंदी घातली आहे. सरकार आणि कोर्टाच्या आदेशानंतर रिव्हेंज पॉर्न आणि चाईल्ड पॉर्न रोखण्यासाठी कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे. एकीकडे पॉर्न साईट बंद झाल्या असून त्यावर बंदीही घालण्यात आली आहे. तर दुसरीकडे पॉर्न पाहणं देशात अजून तरी बेकायदेशीर मानण्यात आलेलं नाही. बंदी […]

या कंपन्यांचं सिम वापरत असाल तर पॉर्न साईट चुकूनही पाहू नका
Follow us on

मुंबई : रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन या दूरसंचार कंपन्यांनी काही प्रमुख पॉर्न साईटवर बंदी घातली आहे. सरकार आणि कोर्टाच्या आदेशानंतर रिव्हेंज पॉर्न आणि चाईल्ड पॉर्न रोखण्यासाठी कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे. एकीकडे पॉर्न साईट बंद झाल्या असून त्यावर बंदीही घालण्यात आली आहे. तर दुसरीकडे पॉर्न पाहणं देशात अजून तरी बेकायदेशीर मानण्यात आलेलं नाही.

बंदी घातलेल्या साईटवर पॉर्न पाहिल्यास काय होणार?

अनेक पॉर्न साईटवर बंदी घातलेली असली तरी शौकीन व्हीपीएन किंवा प्रॉक्सी बदलून व्हिडीओ पाहतातच. त्यामुळे हा खटाटोप करुन पॉर्न साईट पाहिल्या तर काय होईल हा मोठा प्रश्न आहे. हा कोर्टाच्या आदेशाचा अवमान आहे का? तुरुंगवास होऊ शकतो का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र याबद्दल अजून कोणतीही सूचना जारी करण्यात आलेली नाही.

भारतात पॉर्न पाहणं बेकायदेशीर नसल्यामुळे असे व्हिडीओ पाहिल्यामुळे गुन्हा दाखल होऊ शकत नाही. पण चाईल्ड पॉर्न आणि रिव्हेंज पॉर्न पाहणं मात्र गुन्हा आहे. त्यामुळे या प्रकारचे व्हिडीओ पाहणं आणि ते शेअर करणंही युझर्सना अडचणीत आणू शकतं.

केंद्र सरकारने 2015 मध्ये 857 पॉर्न साईट डाऊन करण्याचे आदेश दिले होते. सायबर क्राईम रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. पण मोठी टीका झाल्यानंतर या निर्णयात बदल करण्यात आला. ज्या साईटवर चाईल्ड पॉर्न नाही त्यांना यात सूट देण्यात आली.