Jio Google AI Offer : जिओची आता नवी क्रांती, फ्रीमध्ये वापरता येणार…आणली भन्नाट ऑफर!

जिओ कंपनीने आता भन्नाट अशी ऑफर आणली आहे. या कंपनीने गुगलसोबत करार केला असून जिओच्या ग्राहकांना मोफत एआय वापरता येणार आहे.

Jio Google AI Offer : जिओची आता नवी क्रांती, फ्रीमध्ये वापरता येणार...आणली भन्नाट ऑफर!
jio customer google ai offer
| Updated on: Oct 31, 2025 | 3:39 PM

Jio AI Plan : काही दिवसांपूर्वी एअरटेलने आपल्या प्रिपेड युजर्सना 1 वर्षासाठी Free Perplexity Pro हे एआय टूल वापरायला देण्यास सुरुवात केली आहे. आता या शर्यतीत जिओ या टेलिकॉम कंपनीनेही उडी घेतली आहे. आता जिओने थेट गुगल कंपनीशी हातमिळवणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता जिओ आपल्या प्रिपेड ग्राहकांना 18 महिन्यांसाठी Google AI Pro हे एआय टूल मोफत वापरण्यास देणार आहे. हे टुल तुम्हाला खरेदी करायचे असेल तर त्यासाठी 35100 रुपये मोजावे लागतात. आता जिओ कंपनी आपल्या प्रिपेड ग्राहकांना या एआय टुलचा अॅक्सेस मोफत देणार आहे.

नेमका कोणाला मिळणार फायदा?

ज्या ग्राहकांकडे Jio Unlimited 5G Plan हा प्लॅन आहे, त्यांना पुढच्या 18 महिन्यांसाठी 35100 रुपयांचे गुगल एआय प्रोचा अॅक्सेस मिळणार आहे. हा अॅक्सेस सुरुवातीला सर्वांनाच नसेल. सध्यातरी ज्या युजर्सचे वय 18 ते 25 वर्षांदरम्यान आहे त्यांनाच हा लाभ घेता येणार आहे. नंतरच्या काळात जिओ कंपनी आपल्या सर्व युजर्सना ही सुविधा उपलब्ध करून देणार आहे.

नेमका काय काय मिळणार?

पात्र असलेल्या जिओच्या प्रिपेड ग्राहकांना Google AI Pro तसेच Google Gemini 2.5 Pro एआयचा अॅक्सेस मोफत मिळेल. यासह युजर्सना एआयचा वापर करून इमेज तसेच व्हिडीओ तयार करण्यासाठी Nano Banana आणि Veo 3.1 मॉडलचाही मोफत अॅक्सेस मिळेल. यासह जिओच्या ग्राहकांना गुगलच्या NotebookLM या एआय रिसर्च टुलचाही वापर करता येणार आहे.

Google Gemini Pro AI टुलला अॅक्टिव्हेट कसं करायचं?

जिओ युजर्सना आता लवकरच 2TB गुगल क्लाऊड स्टोअरजेही मिळणार आहे. या स्टोअरेजचा वापर अँड्रॉईड युजर्स गुगल फोटोज, गुगल ड्राईव्ह, व्हॉट्सअॅप चॅटिंग बॅकअप करण्यासाठी करता येईल. जिओच्या या सुविधेचा वापर करण्यासाठी MyJio अॅपमध्ये जाऊन तुम्हाला लॉग ईन करावे लागेल. त्यानंतर गुगल AI प्रोचा प्लॅन अॅक्टिव्हेट करावा लागेल. तुम्ही माय जिओ अॅप चालू केल्यावर लगेच समोर तुम्हाला एक बॅनर दिसेल. यावर Google Gemini Free असा ऑप्शन दिसेल. तुम्हाला या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. त्यानंतर तुम्हला जिओची ही नवी सुविधा वापरता येईल.

Follow Us