AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jio चा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन, फक्त 123 रुपयांत डेटा, अनलिमिटेड कॉल सर्व सोयी मिळणार, प्लॅन कसा अ‍ॅक्टिव्ह करायचा?

Jio Reacharge: जिओच्या ग्राहकांसाठी अतिशय स्वस्त रिचार्ज प्लॅन बाजारात उपलब्ध आहे. प्लॅनची किमत किती आहे ते जाणून घ्या...

Jio चा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन, फक्त 123 रुपयांत डेटा, अनलिमिटेड कॉल सर्व सोयी मिळणार, प्लॅन कसा अ‍ॅक्टिव्ह करायचा?
| Updated on: Oct 05, 2026 | 1:00 PM
Share
Jio Plan: मोबाईल रिचार्जच्या वाढत्या खर्चामुळे ग्राहक खूप त्रस्त असतात. यामुळे स्वस्त आणि उपयोगी प्लॅनच्या शोधात असलेल्या ग्राहकांसाठी Jioचा अगदी स्वस्त रिचार्ज  उपल्बध आहे. ₹123 चा 4G फीचर फोन प्लॅन उपयोगी ठरू शकतो. या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता असून दररोज 0.5GB हाय-स्पीड डेटा, अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि 300 SMS मिळू शकतात. Jioच्या अधिकृत माहितीनुसार हा प्लॅन फक्त JioBharat/4G फीचर फोनसाठी आहे.
या रिचार्जची किंमत  फक्त ₹123 असून त्याची वैधता 28 दिवसांची आहे. म्हणजेच जवळपास एका महिन्यासाठी ग्राहकांना या प्लॅनचा पूरेपूर लाभ घेता येऊ शकतो. प्लॅनमध्ये दररोज 0.5GB म्हणजेच 500MB हाय-स्पीड डेटा मिळणार. 28 दिवसांचा विचार केला तर एकूण 14GB डेटा मिळणार. इंटरनेट ब्राउझिंग, मेसेजिंग आणि दैनंदिन ऑनलाइन कामांसाठी हा डेटा वापरु शकतात. तर फक्त डेटाच नाही मिळत तर त्यासोबत या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगही सोय देण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक तसेच इतर ठिकाणी फोन करण्यासाठी इतर वेगळ्या कोणत्या प्लॅनवर अवलंबूवनन राहण्याची गरज नाही. Jioच्या माहितीनुसार या प्लॅनमध्ये कॉलिंगचाही तुम्ही फायदा घेऊ शकतात. या रिचार्ज प्लॅन मध्ये 300 SMSची सुविधाही मिळते. त्यामुळे ज्यांना कॉलिंगसोबत SMSचा वापरही जास्त करावा लागतो, त्यांच्यासाठी ही सुविधा महत्त्वाची ठरू शकते.

 कोणासाठी आहे हा प्लॅन?

₹123चा हा प्लॅन प्रत्येक स्मार्टफोनसाठी सहज उपलब्ध आहे, असे समजणे चूकीचे आहे. Jioच्या अधिकृत माहितीनुसार हा प्लॅन 4G फीचर फोन म्हणजेच JioBharat प्रकारच्या बटन फोनसाठीच फक्त उपल्बध आहे. त्यामुळे Android स्मार्टफोन किंवा iPhone वापरणाऱ्या ग्राहकांनी रिचार्ज करण्यापूर्वी त्यांच्या डिव्हाईससाठी हा प्लॅन उपल्बध आहे का, हे तपासणे महत्त्वाचे आहे.

मनोरंजनासाठीही सुविधा

Jioच्या फीचर फोन प्लॅन्समध्ये काही Jio अॅप्सच्या सुविधा किंवा सबस्क्रिप्शनचाही समावेश असण्याची शक्यता आहे. मात्र उपलब्ध असलेले फायदे प्लॅन आणि डिव्हाइसनुसार बदलू शकतात. त्यामुळे रिचार्ज करण्यापूर्वी MyJio किंवा Jioच्या अधिकृत वेबसाइटवर सध्याचे फायदे तपासून करणं योग्य ठरेल.

Follow Us
MPSC च्या आंदोलनासाठी बारामतीतून गाड्या आणल्या म्हणत थेट व्हिडीओच...
MPSC च्या आंदोलनासाठी बारामतीतून गाड्या आणल्या म्हणत थेट व्हिडीओच दाखवला; रोहित पवारांवर गंभीर आरोप
नवरात्रीचा खर्च कमी करून दुष्काळग्रस्तांसाठी मोठी मदत; 18 लाख...
इतर खर्च कमी करून दुष्काळग्रस्तांसाठी मोठी मदत; 11 लाख देण्याचा निर्णय, भाजप नेत्याचा पुढाकार
बोरिवलीतील सावरकर उद्यानात गुजराती बॅनरवरून मनसेचे आंदोलन, मराठी...
बोरिवलीतील सावरकर उद्यानात गुजराती बॅनरवरून मनसेचे आंदोलन, मराठी-गुजराती मुद्द्यावरून वाद
भोरमध्ये भातशेती संकटात; पावसाअभावी जमिनीला भेगा, हातातोंडाशी आलेलं...
भोरमध्ये भातशेती संकटात; पावसाअभावी जमिनीला भेगा, हातातोंडाशी आलेलं पीक करपलं
रोहित पवार आमच्यासोबत कॅबिनेटमध्ये मंत्री होतील; नितेश राणेंचं विधान
रोहित पवार आमच्यासोबत कॅबिनेटमध्ये मंत्री होतील अन्... नितेश राणेंचं मोठं विधान चर्चेत
आदिवासी विद्यार्थ्यांचा मुंबई मोर्चा पोलिसांनी रात्रीच अडवला...
आदिवासी विद्यार्थ्यांचा मुंबई मोर्चा पोलिसांनी रात्रीच अडवला, विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी...
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी जाणार
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा अन्...
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उमेदवार
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उभा केला उमेदवार, सामना'तून दिली माहिती
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान...
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान व्हायरल