रिलायन्स जिओ Disney+ Hotstar प्रीपेड प्लॅन्स बदलणार, जाणून घ्या कसे असतील नवे प्लॅन्स

| Updated on: Sep 01, 2021 | 8:28 AM

स्ट्रीमिंग सर्व्हिस डिस्ने + हॉटस्टार उद्यापासून म्हणजेच 1 सप्टेंबरपासून आपल्या प्रीपेड योजनांमध्ये सुधारणा करणार आहे. 1 सप्टेंबरपासून कंपनी डिस्ने + हॉटस्टार तीन नवीन प्लॅन ऑफर करेल.

रिलायन्स जिओ Disney+ Hotstar प्रीपेड प्लॅन्स बदलणार, जाणून घ्या कसे असतील नवे प्लॅन्स
Follow us on

मुंबई : स्ट्रीमिंग सर्व्हिस डिस्ने + हॉटस्टार उद्यापासून म्हणजेच 1 सप्टेंबरपासून आपल्या प्रीपेड योजनांमध्ये सुधारणा करणार आहे. उद्यापासून डिस्ने + हॉटस्टार तीन नवीन प्लॅन ऑफर करेल ज्यात वार्षिक मोबाईल प्लॅन 499 रुपयांपासून सुरू होईल, सुपर प्लॅन 899 रुपये प्रति वर्ष आणि प्रीमियम 1499 रुपये प्रति वर्ष असेल. कंपनी येथे आपला 399 रुपयांचा व्हीआयपी सबस्क्रिप्शन प्लॅन बंद करत आहे, ज्यामध्ये वापरकर्त्यांना सर्व कंटेंट पाहता येत होता आणि तो सुद्धा एका वर्षासाठी. (Jio to revise Disney + Hotstar prepaid plans from September 1, kbow all new updated plans)

आत्तापर्यंत, Disney+ Hotstar ने दोन प्रकारच्या सबस्क्रिप्शन ऑफर सादर केल्या होता, ज्यामध्ये व्हीआयपी आणि प्रीमियम सबस्क्रिप्शनची किंमत 399 रुपये आणि 1499 रुपये प्रति वर्ष इतकी होती. व्हीआयपी ग्राहकांना येथे लिमिटेड अॅक्सेस देण्यात आला होता, त्यांना कोणत्याही इंग्लिश शो आणि डिस्ने ओरिजिनल्सचा अॅक्सेस देण्यात आला नव्हता. त्यात जाहिरातीही होत्या.

अशा अनेक टेलिकॉम कंपन्या आहेत ज्या डिस्ने + हॉटस्टारची कॉम्प्लिमेंट्री सेवा देतात. त्याच वेळी, जिओच्या वेबसाइटवर डिस्ने + हॉटस्टार व्हीआयपी प्लॅनसाठी एक स्वतंत्र विभाग आहे. यात शंका नाही की 1 सप्टेंबरपासून आता या प्लॅनची ​​किंमत 100 रुपयांनी वाढेल. याआधी डिस्ने + हॉटस्टार प्लॅनची ​​किंमत 401 रुपये, 598 रुपये, 777 रुपये आणि 5988 रुपये होती.

परंतु आता टेलिकॉम टॉकच्या रिपोर्टनुसार, या प्रीपेड प्लॅनची ​​किंमत वाढणार आहे. जिओने अद्याप त्यांच्या वेबसाइटवर ही माहिती अपडेट केलेली नाही. पण ताज्या अहवालानुसार, जिओ येथे डिस्ने + हॉटस्टार प्लॅनची ​​प्रारंभिक किंमत 499 रुपये ठेवेल, ज्यामध्ये तुम्हाला 28 दिवसांसाठी दररोज 3 जीबी डेटा मिळेल.

त्याचबरोबर पुढील प्लॅनची ​​किंमत 666 रुपये आहे, ज्यामध्ये तुम्हाला 2 जीबी दैनिक डेटा आणि 56 दिवसांची वैधता मिळेल. या प्लॅननंतर, पुढील प्लॅनची ​​किंमत 888 रुपये आहे, ज्यामध्ये तुम्हाला 2 जीबी दैनिक डेटा आणि 84 दिवसांची वैधता मिळेल.

कंपनीचा एक वार्षिक प्लॅनदेखील आहे, जो डिस्ने + हॉटस्टार लाभांसह येईल. येथे तुम्हाला 365 दिवसांची वैधता मिळेल आणि दररोज 2 जीबी डेटा उपलब्ध होईल. त्याची किंमत 2599 रुपये असेल. या सर्व प्लॅन्समध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 SMS दररोज उपलब्ध असतील.

जिओ येथे आणखी एक डेटा प्लॅन ऑफर करत आहे ज्याची किंमत 549 रुपये आहे आणि ज्यामध्ये तुम्हाला दररोज 1.5 जीबी डेटा मिळेल आणि तोही 56 दिवसांसाठी. जे युजर्स सध्या हे प्लॅन्स वापरत आहेत, ते वैधता पूर्ण होईपर्यंत या प्लॅन्सचा लाभ घेऊ शकतात कारण, नंतर त्यांना पुन्हा प्लॅन्स अपग्रेड करावे लागतील.

इतर बातम्या

6GB/128GB, 108MP ट्रिपल कॅमेरा, मोटोरोलाचा Edge 20 Fusion बाजारात

17 सप्टेंबरपासून Iphone 13 ची विक्री, 30 सप्टेंबरला नव्या एअरपॉड्सचं लाँचिंग, लीक्समधून खुलासा

30 फिटनेस मोड, SpO2 मॉनिटरिंग फीचरसह Mi Band 6 भारतात लाँच, किंमत…

(Jio to revise Disney + Hotstar prepaid plans from September 1, kbow all new updated plans)