JioBook: जिओचा सर्वात स्वस्त लॅपटॉप; साध्या स्मार्टफोन ऐवढी किंमत

| Updated on: Oct 03, 2022 | 8:59 PM

जिओचा हा स्वस्त लॅपटॉप टॅब्लेटला ऑप्शन ठरणार आहे.

JioBook: जिओचा सर्वात स्वस्त लॅपटॉप; साध्या स्मार्टफोन ऐवढी किंमत
Follow us on

मुंबई : एचपी, डेल, लिनोव्हा या सारख्या तगड्या लॅपटॉपला टक्कर देण्यासाठी जिओ सर्वात स्वस्त लॅपटॉप(JioBook) लाँच करण्याच्या तयारीत आहे. या लॅपटॉपची किंमत बजेट स्मार्टफोन ऐवढी असणार आहे. रिलायन्स जिओ सध्या टेलिकॉम क्षेत्रात आघाडीवर आहे.

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओ स्वतःचा लॅपटॉप लाँच करणार आहे. या लॅपटॉपची किंमत सुमारे 15,000 रुपये इतकी असणार आहे.

रिलायन्सने जिओबुकसाठी क्वॉलकॉम आणि मायक्रोसॉफ्टसोबत भागीदारी केली आहे.क्वॉलकॉम कंपनी जिओच्या लॅपटॉपसाठी आर्म लिमिटेडच्या तंत्रज्ञानातून तयार केलेला चिपसेट उपलब्ध करून देणार आहे.

विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम बनवणारी मायक्रोसॉफ्ट कंपनी जिओ लॅपटॉपला अॅप सपोर्ट देणार आहे.

या लॅपटॉप 4जी सपोर्ट असणार आहे. जिओचा हा स्वस्त लॅपटॉप टॅब्लेटला ऑप्शन ठरणार आहे. मात्र, जिओने या लॅपटॉप बाबात अधिकृतरित्या याबाबत कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही.

रिलायन्स जिओचे भारतात 42 कोटींहून अधिक कस्टमर आहेत. लवकरच जिओचा 5G स्मार्टफोनही लॉन्च होणार आहे.

ऑक्टोबर 2022 पर्यंत JioBook शाळा आणि सरकारी संस्थांसाना उपलब्ध करुन दिला जाणार  आहे. यानंतर पुढील तीन महिन्यांत तो ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे.