Koo अ‍ॅपचा जगभर डंका, एशिया पॅसिफिक क्षेत्रातल्या लोकप्रिय डिजिटल ब्रँड्समध्ये स्थान

| Updated on: Nov 18, 2021 | 5:25 PM

'कू' (Koo) ने नुकताच एशिया पॅसिफिक (एपीएसी) क्षेत्रातल्या लोकप्रिय 5 उत्पादनांमध्ये स्थान मिळवण्याचा बहुमान पटकावला आहे. 'अॅम्प्लिट्यूड'च्या 2021 च्या प्रॉडक्ट रिपोर्टमध्ये हे जाहीर करण्यात आले आहे.

Koo अ‍ॅपचा जगभर डंका, एशिया पॅसिफिक क्षेत्रातल्या लोकप्रिय डिजिटल ब्रँड्समध्ये स्थान
Koo
Follow us on

मुंबई : ‘कू’ (Koo) ने नुकताच एशिया पॅसिफिक (एपीएसी) क्षेत्रातल्या लोकप्रिय 5 उत्पादनांमध्ये स्थान मिळवण्याचा बहुमान पटकावला आहे. ‘अॅम्प्लिट्यूड’च्या 2021 च्या प्रॉडक्ट रिपोर्टमध्ये हे जाहीर करण्यात आले आहे. (Koo among top 3 hottest social media products in APAC)

‘कू’हा भारतीय बहुभाषिक मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आहे. प्रत्येकाला आपल्या मातृभाषेत खुलेपणाने व्यक्त होण्याची संधी देणारा ‘कू’ हा एक खास मंच आहे. एपीएसी (APAC) युएस (US) आणि इएमइए (EMEA) क्षेत्रामधून या अहवालात मानांकन मिळवणारा ‘कू’ हा एकमेव सोशल मीडिया ब्रॅन्ड ठरला आहे. भारतीय ब्रॅन्ड्सपैकी दोनच ब्रॅन्ड्सना हा बहुमान मिळालेला आहे. ‘कू’सोबतचा दुसरा ब्रॅन्ड आहे कॉइनसीडीएक्स (CoinDCX).

अॅम्प्लिट्यूडच्या बिहेविअरल ग्राफमदील डेटा, आपलं डिजीटल जगणं घडवणाऱ्या नव्या आणि आगळ्यावेगळ्या डिजीटल उत्पादनांना समोर आणतो. याविषयीच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, “हा एक असा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे, जो भारतीयांना आपापल्या भाषांमध्ये व्यक्त होण्याची संधी देतो. कू 1 अब्जाहून जास्त भारतीयांचे आवडते ॲप बनण्यासाठी अगदीच तत्पर आहे.” मातृभाषेत व्यक्त होण्यासाठी भारतीय बनावटीचे ॲप असलेल्या ‘कू’चा प्रवास सुरू झाला तो मार्च 2020 मध्ये. नऊ भाषांमध्ये सेवा देत ‘कू’ने केवळ 20 महिन्यांच्या अल्पकाळात दीड कोटी युजर्सची पसंती मिळवली आहे. दर्जेदार तंत्रज्ञान आणि कल्पक अनुवाद सुविधांमुळे ‘कू’ ने पुढच्या वर्षभरात 10 कोटी डाऊनलोड्सचा टप्पा पूर्ण करणे अपेक्षित आहे.

‘अॅम्प्लिट्यूड रिपोर्ट 2021’बाबत बोलताना ‘कू’चे सहसंस्थापक आणि सीईओ अप्रमेय राधाकृष्णन म्हणाले, “कू’ला या सन्मान्य जागतिक अहवालात स्थान मिळणे ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. सोबतच ‘कू’ एशिया पॅसिफिक क्षेत्रातील सर्वाधिक पसंतीच्या पाच डिजीटल प्रॉडक्ट्सपैकी एक म्हणूनही निवडले गेले आहे. यामध्ये आम्ही एकमेव सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहोत, ज्याला एपीएसी (APAC) युएस (US) आणि इएमइए (EMEA) क्षेत्रामधून मानांकन मिळाले आहे.

अॅम्प्लिट्यूड ही कॅलिफोर्नियातील प्रॉडक्ट अॅनॅलिटिक्स आणि ऑप्टिमायजेशन करणारी फर्म आहे. या अहवालात ब्रॅन्ड्सची निवड करताना वेगाने विस्तारणाऱ्या उत्पादनांची नोंद घेतली गेली आहे. त्यासाठी महिनाभरातील एकूण युजर्सच्या डेटाचे विश्लेषण केले गेले. अॅम्प्लिट्यूडने विशेषत: अशा कंपन्यांना विचारात घेतले, ज्या उच्च दर्जाचा डिजीटल अनुभव देतात. सोबतच जून 2020 ते जून 2021 या 13 महिन्यांच्या कालावधीत ज्यांनी आधिकाधिक सक्रीय युजर्स मिळवत वेगवान वाढ दर्शवणाऱ्या या कंपन्या आहेत.

काय आहे कू?

‘कू’ची स्थापना मार्च 2020 मध्ये भारतीय भाषांमध्ये बहुभाषिक मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म म्हणून झाली. अनेक भारतीय भाषांमध्ये उपलब्ध, ‘कू’ विविध क्षेत्रांतील भारतीय लोकांना त्यांच्या मातृभाषेत व्यक्त होण्याचा सोपा मार्ग मिळवून देते. ज्या देशातील फक्त 10% लोक इंग्रजी बोलतात, तिथे अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची खूप गरज आहे जे भारतीय युजर्सना त्यांच्या भाषेतला अनुभव देऊ शकेल, त्यांना एकमेकांशी जोडून ठेवेल. भारतीय भाषांमध्ये संवाद साधायला प्राधान्य देणाऱ्या भारतीयांच्या आवाजासाठी ‘कू’ एक मंच मिळवून देतो.

इतर बातम्या

48MP कॅमेरा आणि दमदार फीचर्स, नोकियाचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन लाँच, किंमत…

50MP कॅमेरा आणि आकर्षक डिझाईनसह Poco M4 Pro 5G स्मार्टफोन बाजारात, जाणून नव्या स्मार्टफोनमध्ये काय आहे खास

64MP क्वाड कॅमेरा, मीडियाटेक प्रोसेसर, स्टाँग बॅटरीसह Lava चा पहिला 5G फोन बाजारात, कंपनीकडून 2000 रुपयांचा डिस्काऊंट

(Koo among top 3 hottest social media products in APAC)